7/12 Utara Download : शेतकऱ्यांना 7/12 उतारा ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला सुद्धा काढायचा असेल तर या लेखामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. महाराष्ट्र शासनाद्वारे 7/12 हा उतारा, 8-अ, भू – नकाशा तसेच फेरफार आणि अशा अनेक प्रकारच्या सुविधांसाठी ऑनलाइन पोर्टल वर ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधील ऑनलाइन पद्धतीने सातबारा बघू शकता हे ऑनलाइन पोर्टल द्वारे अगदी सोपे झालेले आहे. या ऑनलाइन पद्धतीमुळे सर्वसामान्य व्यक्ती आपल्या घरामध्ये बसून सुद्धा या सुविधांचा लाभ घेऊ शकतात, कारण तुम्ही सातबारा उतारा घरबसल्या आपल्या मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीने सुद्धा काढू शकता.
शेतकरी मित्रांनो शासनाद्वारे महाराष्ट्र सरकारने भुमी लेख नावाचे पोर्टल सुरू केलेले आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही सातबारा ऑनलाइन पद्धतीने बघू शकतात. आणि तुम्हाला तो सातबारा उतारा डाऊनलोड करायचा असेल तर तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकतात. आज या लेखामध्ये आपण पोर्टल बद्दल जाणून घेणार आहोत सातबारा कशा पद्धतीने शोधायचा त्याचप्रमाणे सातबारा कशा पद्धतीने डाऊनलोड करायचा व सातबारा डिस्ट्रिक्ट नुसार कशा पद्धतीने शोधायचा अगदी एकदम सोप्या पद्धतीने आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहोत. आमच्या द्वारे दिलेली माहिती वाचून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सातबारा काढू शकता तुम्हाला कोणत्याही सेवा केंद्रात जायची आवश्यकता भासणार नाही. चला तर आपण 7/12 Utara बद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया.
7/12 उतारा म्हणजे नेमके काय? 7/12 Utara Download
7/12 उतारा हा आपल्या स्वतःच्या जमिनीचा एक प्रकारचा आरसा असतो. 7/12 उतारा डाऊनलोड केल्यानंतर प्रत्यक्षरीत्या जमिनीवर न जाता त्या जमिनीची संपूर्ण माहिती आपण घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करून बघू शकतो. यामुळे महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1981 च्या माध्यमातून शेत जमिनीच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जात असतात.7/12 Utara Download
याकरता वेगवेगळी नोंदणी पुस्तके वापरली जातात. त्याला आपण रजिस्टर बुक सुद्धा म्हणत असतो. आपल्याला या रजिस्टर बुकमध्ये कुडांचे मालकी हक्क आणि शेत जमिनीचे हक्क तसेच त्यामधील पिकांचे हक्क यांचा सुद्धा समावेश केलेला असतो.तसेच या रजिस्टर बुक मध्ये 21 वेगवेगळ्या प्रकारच्या गावाचे नमुने सुद्धा ठेवलेले असते. यापैकी गावाचा नमुना नंबर सात आणि गावाचा नमुना नंबर 12 हे दोन्ही मिळून सातबारा 7/12 हा उतारा तयार होत असतो म्हणून या उताऱ्याला आपण 7/12 उतारा असे म्हणतो.
गावाचा नमुना नंबर 7 आणि गाव नमुना नंबर 12 यामधील हा उतारा असतो. त्यामध्ये बरोबरीने सातबारा उताऱ्यात गावाचा नमुना नंबर 6अ मधील माहिती सुद्धा समाविष्ट केलेली असते.
7/12 उतारा ऑनलाईन ७/१२ Utara Online in marathi
चला तर आपण बघूया 7/12 उतारा ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे शोधायचा.7/12 Utara Download
सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महाभुलेख या अधिकृत संकेतस्थळ वरती भेट द्यावी लागेल आणि तेथून तुम्ही सातबारा बघू शकता. यामध्ये खालील दिलेल्या प्रमाणे माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे.
- 7/12 उतारा ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर तुमचा विभाग निवडायचा आहे. यामध्ये तुम्हाला उजव्या बाजूला बॉक्समध्ये तुमचा विभाग निवडून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे.
- आता तुमच्यासमोर तुम्हाला दोन पर्याय दिसतील.
- 7/12 उतारा
- 8-अ
- वरती दिलेल्या पर्यायापैकी तुम्हाला जे काही हवे असेल ते तुम्हाला तिथे निवडायचे आहे.
- दिलेले पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तेथे जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला सर्वे नंबर आणि गट नंबर टाकावा लागेल किंवा तुम्ही तुमच्या नावानुसार सुद्धा तेथे Search करू शकता.
- सर्व माहिती सविस्तर भरल्यानंतर तुम्हाला खाली आता शोधा या बटणावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर तुमचा त्या जमिनीचा सातबारा दिसेल.
वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जमिनीचा सातबारा एकदम सोप्या पद्धतीने घरी बसून स्वतःच्या मोबाईल वरती डाऊनलोड करू शकता किंवा या उताऱ्याचा तुम्ही स्क्रीन शॉट सुद्धा मोबाईल मध्ये घेऊ शकता. याबरोबर तुम्हाला त्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सर्व माहिती भरल्यानंतर खाली Download PDF या बटणावर क्लिक करून pdf सुद्धा डाऊनलोड करता येणार आहे.
सातबारा बद्दल प्रश्न उत्तरे FAQ
चला तर जाणून घेऊया सातबारा बद्दल विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे-
7/12 उतारा ऑनलाईन कशाप्रकारे वाचावा?
उत्तर : वरील दिलेल्या स्टेप वापरून तुम्ही तुमचा सातबारा डाऊनलोड करून वाचू शकता.
7/12 उतारा म्हणजे काय?
उत्तर : सातबारा उतारा म्हणजे जमिनीच्या एक प्रकारचा आरसा होय. हा सातबारा उतारा वाचून आपल्याला प्रत्यक्षरित्या जमिनीवर न जाता त्या जमिनीची संपूर्ण माहिती घरबसल्या आपल्या मोबाईल वरती बघता येऊ शकते. महाराष्ट्र शासनाद्वारे जमीन महसूल कायदा 1981 च्या अंतर्गत शेत जमिनी आणि त्यांच्या हक्काबाबत विविध नोंदी ठेवलेल्या असतात त्यात ठेवलेल्या नोंदीलाच आपण सातबारा उतारा असे म्हणतो.
निष्कर्ष : आम्ही आशा करतो की तुम्हाला ऑनलाईन सातबारा कसा शोधायचा तुमच्या मोबाईल मध्ये कशाप्रकारे डाऊनलोड करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असेल. जर तुम्हाला सातबारा उतारा डाऊनलोड करण्याबद्दल कुठलीही समस्या येत असेल तर तुम्ही आम्हाला तुमची प्रक्रिया कमेंट मध्ये सुद्धा विचारू शकता.