Janani Suraksha Yojana: आजच्या या लेखात आपण जननी सुरक्षा योजना या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.नवजात बाळ आणि गर्भवती महिलांची स्थिती सुधारण्यासाठी आपलं सरकार वेळोवेळी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. त्यापैकी ही एक जननी सुरक्षा योजना आहे.
आजच्या या लेखामध्ये तुम्हाला ज्यांनी सुरक्षा योजनेबद्दल संपूर्ण माहिती म्हणजेच या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते या योजनेची पात्रता काय आहे या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती द्यावी लागतील इत्यादी सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या लेखांमध्ये मिळणार आहे त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Janani Suraksha Yojana Details
योजनेचे नाव | जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र |
योजनेचे लाभार्थी | ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील गर्भवती महिला |
योजनेची सुरुवात | 12 एप्रिल 2005 |
योजना कोणाद्वारे सुरू करण्यात आली | जननी सुरक्षा योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली. |
विभाग | सार्वजनिक आरोग्य विभाग |
श्रेणी | केंद्र व राज्य सरकार योजना |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | nhm.gov.in |
जननी सुरक्षा योजना म्हणजे काय?
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सरकारद्वारे गर्भवती महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेची सुरुवात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. या योजनेचा लाभ हा दारिद्र्यरेषेखालील महिलांना मिळणार आहे. गर्भवती महिला आणि नवजात बालकांची स्थिती सुधारण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना किती मदत मिळते?
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील गर्भवती महिलांना खालील प्रमाणे आर्थिक मदत दिली जाते-
- या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गर्भवती असलेल्या महिलांना (प्रसूतीच्या वेळी) तसेच दारिद्र रेषेखालील महिलांना सरकारकडून 1400 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच आशा सहयोगीना प्रसूती प्रोत्साहनासाठी 300 रुपये आणि प्रसूतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी 300 रुपये दिले जातात.
- या योजनेअंतर्गत शहरी भागातील गर्भवती असलेल्या महिलांना (प्रसूतीच्या वेळी) सर्व गर्भवती महिलांना सरकारकडून 1000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच आशा सहयोगीना प्रसूती प्रोत्साहनासाठी 200 रुपये आणि प्रसूतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी 200 रुपये दिले जातात.
जननी सुरक्षा योजना अर्ज प्रक्रिया (Janani Suraksha Yojana)
जननी सुरक्षा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला खालील पद्धतीने अर्ज करावा लागेल-
- या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास सर्वप्रथम अर्जदार महिलेला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- यानंतर ते अधिकृत संकेतस्थळाचे होमपेज तुमच्यासमोर उघडेल.
- होम पेज वरती तुम्हाला जननी सुरक्षा योजनेसाठी एक अर्ज डाऊनलोड करायचा आहे तिथे त्या अर्जाची लिंक किंवा तुम्हाला तिथे तो अर्ज मिळून जाईल.
- मुख्यपृष्ठावरून तुम्हाला तो अर्ज डाऊनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे.
- यानंतर त्या अर्जामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरायचे आहे जसे की त्यात अर्जदार महिलेचे नाव, वडील किंवा पतीचे नाव, वय, गर्भधारणेची तारीख इत्यादी गोष्टी तुम्हाला त्या अर्जामध्ये अचूक भरायचे आहेत.
- त्यानंतर तुम्हाला या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील. त्या कागदपत्रांची यादी तुम्हाला खाली दिलेली आहे त्यानुसार तुम्ही ती कागदपत्रे या अर्जासोबत जोडू शकता.
- त्यानंतर संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर एकदा तुम्ही त्या अर्जाची पुन्हा चौकशी करा की आपल्याकडून काही चूक राहिली आहे का किंवा काही गोष्टी आपण भरायची राहिली आहे ई. या गोष्टी एकदा नक्की तपासा.
- अर्ज तपासल्यानंतर तुम्हाला हा अर्ज आपल्या जवळील खाजगी आरोग्य केंद्रात किंवा अंगणवाडी केंद्रात हा अर्ज जमा करायचा आहे.
- यानंतर तुम्ही सादर केलेला अर्ज तपासला जाईल त्यासोबतच तुम्ही ती कागदपत्रे जोडले आहेत त्यांना सुद्धा तपासले जाईल आणि मग तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला कळवले जाईल जर तुम्ही पात्र असाल तर ती योजनेची रक्कम तुम्हाला मिळून जाईल.
- अशाप्रकारे तुम्ही जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र यासाठी अर्ज करू शकता.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
जननी सुरक्षा योजना अर्ज करण्यासाठी तुमच्याजवळ खाली दिलेले कागदपत्रे असणे आवश्यक आहे –
- बीपीएल रेशन कार्ड (BPL Reation Card)
- रहिवासी पुरावा
- आधार कार्ड
- दहा अंकी मोबाईल नंबर
- जननी सुरक्षा कार्ड
- बँक खाते पासबुक झेरॉक्स
- शासकीय रुग्णालयातून डिलिव्हरी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो इ. कागदपत्रे
जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
जननी सुरक्षा योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ खालील पात्रता असणे आवश्यक आहे-
- जननी सुरक्षा या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील गर्भवती महिला या योजनेसाठी पात्र मानल्या जातील.
- लाभार्थी महिलेचे वय हे 19 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. 19 वर्षापेक्षा खाली वय असल्यास त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- या योजनेचा लाभ फक्त शासनाने निवडलेल्या शासकीय रुग्णालय व संस्थांमध्ये मिळणार आहे.
- जननी सुरक्षा या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेच्या दोन अपत्यांच्या जन्मापर्यंतच तिला मोफत तपासणी आणि मोफत प्रसूतीची मदत दिली जाणार आहे.
- ज्यांच्याकडे बीपीएल शिधापत्रिका आहे म्हणजेच पिवळे रेशन कार्ड आहेत त्या गर्भवती महिला या योजनेसाठी पात्र असतील.
जननी सुरक्षा योजनेचे मुख्य उद्दिष्टे
- राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र रेषेखालील महिलांना तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील महिलांचे आरोग्य संस्थेमध्ये होणारे प्रसूतीचे प्रमाण वाढवणे तसेच अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहेत.
निष्कर्ष
आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासोबत Janani Suraksha Yojana (जननी सुरक्षा योजना) या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता याची पात्रता काय आहे इत्यादी संपूर्ण गोष्टी आम्ही आपणास सविस्तरपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला आमच्याद्वारे लिहिलेला जननी सुरक्षा योजना बद्दल हा लेख उपयुक्त वाटला असल्यास खाली दिलेल्या शेअर बटन वरती क्लिक करून हा लेख इतरांना देखील शेअर करा.