Mudra Loan In Marathi: प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे? याबद्दल आपण आजच्या या लेखामध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे तूम्ही आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो जर तुम्ही नवीन व्यवसाय करण्याचा विचार करत असाल किंवा याआधीच तूम्ही कोणताही व्यवसाय करत आहात आणि तो व्यवसाय तुम्हाला वाढवायचा असेल तर त्यासाठी तूम्ही pradhanmantri mudra loan yojana या योजनेअंतर्गत तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना या योजनेअंतर्गत हे कर्ज तुम्ही कसे घेऊ शकता याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
मुद्रा योजना काय आहे? (PM Mudra Loan)
प्रधानमंत्री मुद्रा योजना ही भारतातील मध्यम, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे ही प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 08 एप्रिल 2015 साली सुरू करण्यात आली आहे. मुद्रा कर्ज योजना या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना मुद्रा कर्ज कार्ड प्रदान केले जाते. मुद्रा लोन योजना अंतर्गत व्यवसाय करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते.
PM Mudra Loan Scheme Details
योजना नाव | प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना |
योजनेची सुरुवात | 8 एप्रिल 2015 |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
योजनेचे लाभार्थी | लहान व मध्यम उद्योजक |
उद्दिष्टे | व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे. |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.mudra.org.in/ |
मुद्रा कर्ज योजनेचे प्रकार (Types Of Mudra Loan)
मुद्रा कर्ज योजना या योजनेचे तीन प्रकार आहेत-
- शिशू
- किशोर
- तरुण
मुद्रा कर्ज योजनेमध्ये तीन प्रकार आहेत त्या योजने पैकी शिशु योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास हजार रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. तसेच किशोर या योजनेमध्ये तुम्हाला 50 हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते आणि तरुण या योजनेअंतर्गत तुम्हाला पाच लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणाला कर्ज मिळू शकते?
मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत खालील लाभार्थींना कर्ज मिळते –
- सेवा क्षेत्रातील कंपन्या
- सूक्ष्म उद्योग
- अन्न संबंधीत व्यवसाय
- लघू उद्योग
मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा?
जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि या योजनेद्वारे तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे तर मुद्रा कर्ज योजनेसाठी तुम्ही खालील पद्धतीने अर्ज करू शकता-
- मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम कोणत्याही सरकारी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- त्या सरकारी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला मुद्रा कर्ज योजनेसाठी एक अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
- यानंतर डाऊनलोड केलेल्या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
- माहिती भरल्यानंतर त्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रांची यादी खाली दिलेली आहे त्यानुसार तुम्ही कागदपत्रे अर्जासोबत जोडू शकता.
- Reference ID किंवा क्रमांक मिळविण्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करावा लागेल.
- कर्जाची पुढील प्रक्रियेसाठी तुमच्याजवळ Reference आयडी किंवा अर्जाचा क्रमांक असणे आवश्यक आहे त्यामुळे Reference आयडी क्रमांक लक्षात ठेवा किंवा तो लिहून ठेवा.
- यानंतर बँक कर्मचारी संपर्क साधेल आणि तुमच्याकडून अर्जाचा क्रमांक किंवा Reference आयडी मागू शकतो त्यामुळे तुमच्याकडे Reference ID असणे आवश्यक आहे.
- यानंतर बँक कर्मचाऱ्याद्वारे कर्जाची पुढील प्रक्रिया करण्यात येईल जर तुम्ही कर्जासाठी पात्र असाल तर कर्जाची जी रक्कम आहे ती रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
- मुद्रा कर्ज योजनेसाठी कर्जदार उद्योग मित्र पोर्टल वरती देखील अर्ज करू शकतात त्याची लिंक खाली दिलेली आहे. (http://www.udyamimitra.in/)
मुद्रा कर्ज योजना कागदपत्रे (Required Documents)
मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे –
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय आहे त्या ठिकाणचा पत्ता
- अर्जदाराचा पत्ता
- इन्कम टॅक्स आणि सेल्फ टॅक्स रिपोर्ट
- मागील तीन वर्षाचे बॅलन्स शीट
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- व्यवसाय स्थापनेचा पुरावा
- व्यवसायासाठी लागणारे यंत्रसामग्री किंवा मटेरियल यांचे कोटेशन किंवा बिल
मुद्रा लोन पात्रता (Mudra Loan Eligibility)
जर तुम्हाला सुद्धा मुद्रा कर्ज योजना या योजनेअंतर्गत कर्ज हवे असेल तर तुमच्याजवळ खालील पात्रता असणे आवश्यक आहे-
- मुद्रा कर्ज या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्याचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजचे आहे.
- या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कर्जदार हा कोणत्याही बँक शाखेचा थकबाकीदार नसावा अन्यथा त्याला कर्ज मिळणार नाही.
- या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्ही फक्त सरकारी बँकेतच अर्ज करू शकता.
- लहान व्यवसाय सुरू करणारे व्यवसायिक तसेच ज्यांना स्वतःचा व्यवसाय त्यात अजून वाढवायचा आहे असे व्यवसायिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणत्या बँक कर्ज देतात?
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना या योजनेअंतर्गत खालील बँका तुम्हाला कर्ज देतात-
- बँक ऑफ इंडिया (Bank Of India)
- कार्पोरेशन बँक (Corporation Bank)
- बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
- आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
- पंजाब & सिंध बँक (Punjab and Sindh Bank)
- युनिअन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)
- बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)
- देना बँक (Dena Bank)
- आय डी बी आय बँक (IDBI Bank)
- कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
- पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)
- ॲक्सिस बँक (Axis Bank)
- कॅनरा बँक (Canara Bank)
- इंडियन बँक (Indian Bank)
- फेडरल बँक (Federal Bank)
- सेंट्रल बँक आफ इंडिया (Central Bank of India)
- स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)
निष्कर्ष
आजच्या या लेखामध्ये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (Mudra Loan In Marathi) या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून सांगितली आहे. जसे की तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता तसेच या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात इत्यादि सर्व माहिती आजच्या या लेखामध्ये सविस्तरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
जर तुम्हाला आमच्या द्वारे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेबद्दल (Mudra Loan) दिलेली माहिती उपयुक्त वाटली असल्यास ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.