आयुष्यमान भारत कार्ड: आता मिळवा 05 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार!(Aayushman Bharat Card)

आजच्या या लेखामध्ये आम्ही आयुष्यमान भारत कार्ड कसे काढायचे तसेच या कार्डचे उपयोग काय काय आहेत.Aayushman Bharat Card काढण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील व याची पात्रता काय असेल या सर्वांची माहिती आजच्या या लेखामध्ये आम्ही सविस्तरपणे सांगितली आहे त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

आजच्या धकाधकीच्या आणि अनिश्चित जीवनशैलीत आरोग्य विमा हा किती महत्त्वाचा आहे हे आपणास सर्वांना माहीत आहे. परंतु आपल्या देशातील अनेक लोक या गोष्टींपासून वंचित राहतात. त्यांना विमा हा काय आहे हेच माहीत नसतं. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे देशातील अनेक असे परिवारात आहेत जे इच्छा असूनही आरोग्य वीमा करू शकत नाही. कारण त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे हा विम्याचा खर्च त्यांना परवडत नसतो.

आयुष्यमान भारत कार्ड (Aayushman Bharat Card)
आयुष्यमान भारत कार्ड (Aayushman Bharat Card)

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी शासन वेळोवेळी वेगवेगळ्या आरोग्य योजना राबवत असते. कारण देशातील कोणताही नागरिक त्याच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे वेळोवेळी उपचारापासून वंचित राहू नये. याच अनुषंगाने केंद्र सरकारने Aayushman Bharat Card ही योजना सुरू केलेली आहे. आयुष्यमान भारत कार्ड या योजनेअंतर्गत 05 लाखांपर्यंतचा मोफत वैद्यकीय उपचार दिला जातो.

Pradhanmantri Aayushman Bharat Card Yojana Details

योजनेचे नावप्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड योजना
योजना कोणाद्वारे सुरू झालीपंतप्रधान नरेंद्र मोदी
योजनेची सुरुवात१४-०४-२०१८
योजनेचे लाभार्थीभारतीय नागरिक
योजनेची उद्दिष्टेआर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणे.
अधिकृत संकेतस्थळhttps://pmjay.gov.in/
Pradhanmantri Aayushman Bharat Card Yojana Details

आयुष्यमान भारत कार्ड योजनेचे उद्दिष्टे

आयुष्यमान भारत कार्ड योजनेचे उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत-

  • देशातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस मोठा आजार झाल्यास अशा परिस्थितीत गरीब कुटुंबातील व्यक्तींना मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे शक्य नसते. सामान्य जनतेचे हीच मुख्य समस्या दूर करण्यासाठी सरकारने आयुष्यमान भारत कार्ड (Aayushman Bharat Card) या योजनेची सुरुवात केली.
  • आयुष्यमान भारत कार्ड या योजनेच्या माध्यमातून देशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या गरीब कुटुंबांना आरोग्य विमा प्रदान करून आर्थिक सहाय्य करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

आयुष्यमान भारत कार्ड या योजनेअंतर्गत कोणकोणत्या सुविधा मिळतात?

आयुष्यमान भारत का या योजनेअंतर्गत खालील प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत-

  • वैद्यकीय तपासणी आणि उपचार
  • औषधे आणि वैद्यकीय उपयोगी वस्तू
  • रुग्ण देखभाल सेवा
  • रुग्ण रुग्णालयात दाखल होणे
  • वैद्यकीय मलमपट्टी उपचार सेवा
  • क्लीनिकल तसेच प्रयोगशाळा चाचण्या
  • विद्यमान रोगावर उपचार
  • रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पंधरा दिवसापर्यंत फॉलोअप
  • अन्नसेवा, आवास लाभ

आयुष्यमान भारत कार्ड या योजनेअंतर्गत येणारे काही आजार

आयुष्मान भारत कार्ड योजनेमध्ये येणारे आजार खालील प्रमाणे आहेत-

  • कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग
  • डबल व्हॉल्व रिप्लेसमेंट
  • करॉटिड एनजीओ प्लास्टि
  • Pulmonary व्हॉल्व रिप्लेसमेंट
  • इंटेरियर स्पाईन फिक्सेशन
  • टिश्यू एक्सपेंडर
  • Laryngopharyngectomy

आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा

आयुष्यमान भारत काढण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या गावातील किंवा शहरातील महा-ई-सेवा केंद्रात भेट द्यावी लागेल किंवा सीएससी सेंटरला भेट द्यावी लागेल. तेथे जाऊन तुम्ही आयुष्यमान भारत काढण्यासाठी अर्ज करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही आयुष्यमान कार्ड योजनेसाठी अर्ज करू शकता.

आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ खालील पात्रता असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता-

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील कोणताही सदस्य 18 वर्ष ते 60 वर्ष वयोगटातील असावा.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांच्या आत असावे.
  • कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड असावे.

आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत-

  • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • 10 अंकी मोबाईल नंबर
  • पत्त्याचा पुरावा

आयुष्यमान भारत कार्ड योजनेचे फायदे

आयुष्यमान भारत कार्ड योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत-

  • आयुष्यमान भारत कार्डचा लाभ 10 कोटींपेक्षा जास्त BPL शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे हा आयुष्मान कार्ड आहे अश्या नागरिकांना या कार्डद्वारे 05 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहे.
  • आयुष्यमान भारत कार्ड योजनेला जन आरोग्य योजना या नावाने देखील ओळखले जाते.
  • या योजनेअंतर्गत औषधे आणि उपचारांचा खर्च सरकार करणार आहे.
  • या योजनेअंतर्गत 1350 पेक्षा अधिक उपचार करण्यात येणार आहे.
  • आयुष्यमान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.
  • या योजनेमुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने काहींना जीव गमावावा लागतो यामुळे ही आयुष्यमान कार्ड योजना त्या लोकांना अत्यंत महत्त्वाची आहे जे आर्थिक परिस्थितीने कमकुवत आहेत.

FAQ’S- Aayushman Bharat Card Yojana

चला तर जाणून घेऊयात Aayushman Bharat Card Yojana संबंधित लोकांद्वारे विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे –

प्रश्न.01- आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता?

उत्तर: या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील कोणताही सदस्य 18 वर्ष ते 60 वर्ष वयोगटातील असावा.तसेच त्यांच्याकडे BPL शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.

प्रश्न.02- आयुष्यमान भारत कार्डचा काय फायदा आहे?

उत्तर: या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे अश्या नागरिकांना या कार्डद्वारे 05 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहे.

प्रश्न.03- आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात?

उत्तर: आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी तुमच्याजवळ शिधापत्रिका असणे आवश्यक आहे त्यासोबत आधार कार्ड, 10 अंकी मोबाईल नंबर आणि पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

प्रश्न.04- आयुष्यमान कार्ड कसे काढायचे?

उत्तर: आयुष्यमान भारत काढण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या गावातील किंवा शहरातील महा-ई-सेवा केंद्रात भेट द्यावी लागेल किंवा सीएससी सेंटरला भेट द्यावी लागेल. तेथे जाऊन तुम्ही आयुष्यमान भारत काढण्यासाठी अर्ज करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही आयुष्यमान कार्ड योजनेसाठी अर्ज करू शकता.

निष्कर्ष:

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासोबत आयुष्यमान भारत कार्ड योजना या योजनेची संपुर्ण माहिती सविस्तरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या या लेखामध्ये या Aayushman Bharat Card साठी अर्ज कसा करावा तसेच या कार्डसाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आजच्या या लेखामध्ये सांगितली आहे. जर तुम्हाला आजचा हा लेख महत्त्वपूर्ण वाटला असल्यास खाली शेअर बटण दिले आहे त्यावरती क्लिक करून हा लेख आपल्या जवळील व्यक्तींना नक्की शेअर करा.