Balika Samridhi Yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित रहावे तसेच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही आपणास सरकारचे एक महत्त्वकांक्षी योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत ती योजना म्हणजे बालिका समृद्धी योजना.
बालिका समृद्धी योजना ही 1997 मध्ये महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. सध्याच्या घडीला देशभरातील अनेक मुली बालिका समृद्धी या योजनेचा लाभ घेत आहेत. ही योजना विशेषतः दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेमार्फत गरीब कुटुंबातील मुलींना सरकारकडून शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते.
बालिका समृद्धी योजना या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्माच्या वेळी मुलीच्या आईला 5000 रुपये आर्थिक मदत मिळते तसेच मुलगी मोठी झाल्यानंतर म्हणजेच दहावीत प्रवेश करेपर्यंत त्या मुलीला ठराविक रक्कम सरकारद्वारे मिळते. हीच रक्कम त्या मुलींना प्रशिक्षणासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम करते. जर तुमच्या घरी सुद्धा मुलीचा जन्म झाला असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आजच्या या लेखात आम्ही Balika Samridhi Yojana या योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत जसे की: या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील तसेच इत्यादी सर्व महत्त्वाचे मुद्दे आजच्या या लेखात मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
बालिका समृद्धी योजना म्हणजे काय?
बालिका समृद्धी योजना ही खास मुलींसाठी केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येत आहे. ही योजना सन 1997 मध्ये महिला व बालविकास विभागामार्फत सुरू करण्यात आली होती. तसेच 15 ऑगस्ट 1997 नंतर ज्या मुली जन्मलेले आहेत त्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेद्वारे जो लाभ मिळणार आहे तो लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील दुर्बल घटकांतील कुटुंबातील जन्मलेल्या सर्व मुलींना होणार आहे.
Balika Samridhi Yojana Details
योजनेचे नाव | बालिका समृद्धी योजना (Balika Samridhi Yojana) |
योजना कोणी सुरू केली | भारत सरकार |
योजनेची लाभार्थी | देशातील मुली |
योजनेचा आरंभ | 500 रुपये प्रति वर्ष |
विभाग | 700 रुपये प्रत्येक वर्ग/ मानकांसाठी वार्षिक |
योजनेचा उद्देश | मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करणे. |
श्रेणी | केंद्र सरकार योजना |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | https://wcd.nic.in/ |
बालिका समृद्धी योजनेमार्फत किती शिष्यवृत्ती मिळते?
- वर्ग 1 ते 3- प्रती वर्ष 300 रुपये
- वर्ग 4- 500 रुपये
- वर्ग 5- 600 रुपये
- वर्ग 6 आणि 7- प्रती वर्ष 700 रुपये
- वर्ग 8- 800 रुपये
- वर्ग 9 आणि 10- प्रती वर्ष 1000 रुपये
बालिका समृद्धी योजना अर्ज प्रक्रिया
- Balika Samridhi Yojana या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला गावातील सीएससी सेंटर किंवा महा-ई-सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल तिथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला जवळच्या अंगणवाडी मध्ये जाऊन तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल तसेच जर तुम्ही शहरी भागातील असाल तर तुम्हाला आरोग्य विभागाकडून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- ग्रामीण आणि शहरी भागातील अर्ज हे वेगवेगळे असतील याची नोंद घ्यावी.
- आपण पद्धतीने जरा अर्ज करायचा असेल तर तुम्ही वरती दिलेले संबंधित कार्यालयातून अर्ज घेऊ शकता आणि तो अर्ज भरून त्याच संबंधित कार्यालयात तुम्ही हा अर्ज जमा करू शकता.
बालिका समृद्धी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत-
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक खाते पासबुक
- पालकांचे ओळखपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते तपशील
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शाळेत प्रवेश घेतलेला दाखला
- अर्जात नमूद केलेले मुलीचे शैक्षणिक कागदपत्रे ई.
बालिका समृद्धी योजना पात्रता
- Balika Samridhi Yojana ही योजना फक्त मुलींसाठीच आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुली या भारतीय नागरिक असल्या पाहिजे.
- या योजनेसाठी फक्त मुलीचा अर्ज करू शकतात.
- भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार सर्व बीपीएल कार्डधारक या योजनेसाठी पात्र आहेत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म हा 15 ऑगस्ट 1997 किंवा त्यानंतरचा झालेला असावा.
- या योजनेचा लाभ फक्त कुटुंबातील दोन मुलींनाच मिळणार आहे याची नोंद घ्यावी.
बालिका समृद्धी योजनेचे फायदे
बालिका समृद्धी योजना ही भारत सरकारची महत्त्वकांशी योजना आहे याचे फायदे खालील प्रमाणे आहेत-
- शैक्षणिक लाभ: या योजनेअंतर्गत जेव्हा मुलीचा जन्म होईल त्यावेळी मुलीच्या आईला 5000 रुपये दिले जातात. यासोबतच मुलीला पुढील शिक्षणासाठी तीनशे रुपये ते हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते यामुळे मुलगी पुढे चालून उच्च शिक्षण घेणे सोपे होते.
- आर्थिक मदत: या योजनेअंतर्गत मुलीच्या पुढील उच्च शिक्षणासाठी कर्ज सुद्धा दिले जाते. हे कर्ज कमी व्याज दारात उपलब्ध करून दिले जाते तसेच मुलीला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज सुध्दा मिळते.
- स्त्री सशक्तीकरण: या योजनेअंतर्गत सरकारकडून मुलींना शिक्षण आणि आर्थिक संधी दिल्यामुळे त्या मुली सशक्त बनतील तसेच स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःच अस्तित्व निर्माण करतील.
- बालविवाह: सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेमुळे मुलींना शिक्षण तसेच व्यवसाय करण्याची मोठी संधी मिळते. त्यामुळे मुली उच्च शिक्षण येऊ शकते याच कारणामुळे त्यांचे बालविवाह भरपूर प्रमाणात कमी होतील.
FAQ’S- Balika Samridhi Yojana
चला तर जाणून घेऊयात की लोकांद्वारे विचारलेले बालिका समृद्धी योजनेबद्दल प्रश्न आणि त्यांची उत्तरे-
प्रश्न.01- बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी एका कुटुंबातील किती मुली पात्र असतील?
उत्तर: बालिका समृद्धी योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका कुटुंबातील कोणत्याही दोन मुली पात्र असतील.
प्रश्न.02- बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीची जन्मतारीख किती पाहिजे?
उत्तर: 15 ऑगस्ट 1997 नंतर ज्या मुली जन्मलेल्या आहेत त्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
प्रश्न.03- बालिका समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: Balika Samridhi Yojana या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला गावातील सीएससी सेंटर किंवा महा-ई-सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल तिथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला जवळच्या अंगणवाडी मध्ये जाऊन तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल तसेच जर तुम्ही शहरी भागातील असाल तर तुम्हाला आरोग्य विभागाकडून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि तो संपुर्ण भरून त्याच संबंधित विभागात अर्ज जमा करावा.
निष्कर्ष
आजच्या या लेखामध्ये आम्ही Balika Samridhi Yojana (बालिका समृद्धी योजना) या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपणास सविस्तरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला आमचे द्वारे बालिका समृद्धी योजनेचा हा लेख उपयुक्त वाटला असल्यास आजच्या या लेखाला आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा खाली शेअर बटन दिले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हा लेख शेअर करू शकता.