Bank Of India Personal Loan: आजच्या या लेखात आपण बँक ऑफ इंडिया कडून 20 लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन कसे घेऊ शकतो तसेच या बँकेतून कर्ज घेण्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागतील आणि कर्ज घेण्यासाठी पात्रता काय हवी इत्यादी संपूर्ण माहिती सविस्तरपणे आम्ही आजच्या या लेखात सांगितली आहे त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
बँक ऑफ इंडिया हि बँक तुम्हाला 20,00,000 रुपया पर्यंत personal loan देत आहे. वैयक्तिक कर्ज म्हणजे तुम्ही हे कर्ज घेऊन तुमच्या कोणत्याही कारणासाठी वापरू शकता. समजा तुमच्या घरी लग्न आहे किंवा कोणी आजारी आहे किंवा घरातील अनेक समस्या निर्माण होतात त्या समस्यांचा सामना करण्यासाठी तुम्हाला पैशाची अडचण आहे तर तुम्ही बँक ऑफ इंडिया कडून वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात.
बँक ऑफ इंडिया कडून किती कर्ज मिळते?
मित्रांनो तुम्ही बँक ऑफ इंडिया या बँकेकडून वीस लाख रुपये पर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. हे पर्सनल लोन घेऊन तुम्ही तुमचे वैयक्तिक खर्च जसे की लग्न समारंभ, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, घराचे नूतनीकरण इत्यादी अनेक गोष्टींसाठी हे पैसे दोन्ही वापरू शकता.
बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन व्याजदर (Interest Rate)
जर तुम्ही बँक ऑफ इंडिया या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेत असाल तर तुम्हाला या बँकेचे व्याजदर माहित असणे खूप गरजेचे आहे. कर्ज घेता वेळेस सर्वात प्रथम तुम्ही व्याजदर नक्कीच आणून द्या कारण कर्ज परतफेडीच्या वेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये यामुळे सर्वप्रथम घेतलेल्या कर्जाचा व्याजदर नक्की विचारावा. तर बँक ऑफ इंडिया या बँकेचा व्याजदर हा 9.75% प्रति वर्ष पासून असतो यात कमी जास्त देखील होऊ शकते तर तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचे अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन एकदा नक्की चौकशी करा.
Bank Of India Personal Loan Types
बँक ऑफ इंडिया या बँकेचे वैयक्तिक कर्ज देण्यासाठी विविध प्रकार आहेत तर ते प्रकार कोणते आहेत तर ते प्रकार खालीलप्रमाणे आहेत –
- स्टार पर्सनल लोन
- स्टार पेन्शनर लोन
- स्टार मित्र पर्सनल लोन
- स्टार सुविधा एक्सप्रेस पर्सनल लोन
- स्टार पर्सनल लोन-डॉक्टर प्लस
बँक ऑफ इंडिया वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी पात्रता (Eligibility Criteria)
बँक ऑफ इंडिया मधून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्याजवळ खालील पात्रता असणे आवश्यक आहे-
- बँक ऑफ इंडिया मधून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही सर्वप्रथम भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमचे वय 21 ते 60 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही नोकरदार असाल तर तुमचा पगार 15000 किंवा त्यापेक्षा अधिक असला पाहिजे.
- जर तुम्ही स्वयंरोजगार आहात तर तुमचे वार्षिक उत्पन्न दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
- कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर हा 750 किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
- तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
बँक ऑफ इंडिया कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
बँक ऑफ इंडिया बँक वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्याजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे-
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- विज बिल
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा पुरावा जसे की: पगार स्लिप किंवा बँक अकाउंट स्टेटमेंट
- पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज कसा करावा?
घरचा मला सुद्धा बँक ऑफ इंडिया बँकेमधून पर्सनल लोन घ्यायची आहे तर तुम्ही खालील पद्धतीने अर्ज करू शकता-
- सर्वप्रथम तुम्हाला बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल
- अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करुन जाऊ शकता.
- वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बँक ऑफ इंडियाच्या एक होम पेज उघडेल.
- त्या होम पेज वरती तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतील. त्या पर्यायांपैकी तुम्हाला Personal Loan हा पर्याय निवडायचा आहे.
- हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल तेथे तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल त्या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती सविस्तरपणे भरायची आहे.
- अर्जामध्ये भरलेली माहिती एकदा तपासा आणि Next बटन वरती क्लिक करून विचारलेले सर्व कागदपत्रे तेथे अपलोड करा.
- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर खाली Submit बटन वरती क्लिक करून अर्ज सादर करा.
- अशाप्रकारे तुम्ही बँक ऑफ इंडिया वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन चे फायदे (Loan Benefits)
बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन चे फायदे खालील प्रमाणे आहेत-
- बँक ऑफ इंडिया कडून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता
- तसेच या बँकेकडून अर्ज लवकर मंजूर करण्यात येतात.
- या बँकेतून तुम्हाला 20 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज सहजासहजी मिळून जाते.
- जर तुम्हाला पैशाची खूपच अडचण आहे तर तुम्ही या बँकेमध्ये अर्ज करून त्वरित कर्ज घेऊ शकता.
- या बँकेचा वैयक्तिक कर्जावर व्याजदर हा कमी बघायला मिळतो. परंतु हे व्याजदर आणि परतफेड कालावधी कधीही बदलू शकतात. यामुळे कर्ज घेण्याआधी सर्वप्रथम तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळाला एकदा अवश्य भेट द्या आणि तिथे जाऊन एकदा चौकशी करा की आपण किती कर्ज घेतल्यावर आपल्याला किती दिवसात हे परत करायचे आहेत आणि हा कालावधी किती दिवसाचा असेल ही चौकशी केल्यानंतरच कर्ज घेण्यासाठी अर्ज करावा.