Bank Of Maharashtra Personal Loan 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेद्वारे आपण वैयक्तिक कर्ज कसे घेऊ शकतो बँक ऑफ महाराष्ट्र दहा लाख रुपयांपर्यंत आपल्याला वैयक्तिक कर्ज देत आहे आणि हे कर्ज आपण कसे घेऊ शकतो, तसेच हे कर्ज घेण्यासाठी पात्रता काय असणे आवश्यक आहे कागदपत्रे काय काय लागतील इत्यादी सर्व गोष्टी आपण आजच्या या लेखात समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोनची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आम्ही आपणास सविस्तरपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. (Bank Of Maharashtra Personal Loan Information In Marathi)
पर्सनल लोन म्हणजे काय? (Bank Of Maharashtra Personal Loan)
पर्सनल लोन हे इंग्रजी भाषेमध्ये वापरले जाते याचाच अर्थ मराठी मध्ये वैयक्तिक कर्ज असा होतो. वैयक्तिक कर्ज हे एक अशा प्रकारचे कर्ज आहे जे आपण विविध कारणांसाठी घेऊ शकतो. जसे की: वैद्यकीय खर्च, घरगुती खरेदी, शैक्षणिक कामासाठी तसेच इतर वैयक्तिक कारणांसाठी आपण पर्सनल लोन घेऊ शकतो. वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित असतात याचा अर्थ असा की कर्जदाराला कर्ज घेण्यासाठी कोणतेही कारण देण्याची आवश्यकता नसते त्यामुळे याला पर्सनल लोन असे म्हणतात.
वैयक्तिक कर्ज व्याजदर (Personal Loan Interest Rate)
मित्रांनो वैयक्तिक कर्ज हे प्रत्येक सरकारी खाजगी बँक किंवा वित्तीय संस्था देत असतात परंतु वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी जो लागणारा व्याजदर आहे तो प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्थांचा हा वेगवेगळा असतो. आजच्या या लेखात आपण बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन कसे घ्यायचे यावरती माहिती जाणून घेत आहोत त्यामुळे तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राचे पर्सनल लोन व्याजदर (Bank of Maharashtra Personal Loan Interest Rate) 9.52% पासून ते 15% टक्के पर्यंत व्याजदर लागू शकतो. तसेच हा व्याजदर बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन एकदा तपासावे कारण महाराष्ट्र बँक किंवा इतर कोणत्याही बँकेचे नियम कधीही बदलत असतात त्यामुळे एकदा यांच्या अधिकृत संकेतस्थळाला जाऊन चौकशी नक्की करावी.
बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन पात्रता (Eligibility Criteria)
जर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र मधून वैयक्तिक कर्ज घ्यायचे आहे तर तुमच्याजवळ खालील पात्रता असणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला पर्सनल लोन मिळणार नाही त्यामुळे खालील पात्रता एकदा नक्की वाचा-
- वैयक्तिक किंवा इतर कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- बँक ऑफ महाराष्ट्र मधून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्याजवळ या बँकेचा अकाउंट असणे आवश्यक आहे. तुम्हालाही बँक कसे कर्ज देते त्यामुळे तुमच्याजवळ या बँकेचे खाते असणे अत्यंत आवश्यक आहे.
- जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज हे खूप लवकर मिळू शकते.
- पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचे मासिक उत्पन्न 25000 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तेव्हा तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी पात्र असाल.
- बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुमचे वय 21 ते 65 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमच्याजवळ बँकेद्वारे मागितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- इतर अधिक पात्रता जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील बँक शाखेत किंवा यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ते जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
बँक ऑफ महाराष्ट्र मधून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्याजवळ खाली दिलेले कागदपत्रे असणे आवश्यक आहे –
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवासी पुरावा जसे की:
- विज बिल
- मतदान कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- आधार कार्ड
- पासपोर्ट इ. यांपैकी कोणतेही एक
- नोकरी करत असलेल्या व्यक्तींसाठी कागदपत्रे:
- अर्ज क्रमांक 16 सह मागील दोन वर्षाचा आयटी रिटर्न कागदपत्रे
- मागील 06 महिन्याचा अकाउंट स्टेटमेंट
- मागील 03 महिन्याची सॅलरी स्लीप
- पगार नसलेल्या व्यक्तींसाठी कागदपत्रे:
- मागील एक वर्षाचे बँक खाते स्टेटमेंट
- व्यवसायिक असाल तर कर नोंदणी प्रमाणपत्र किंवा कंपनीच्या नोंदणीचा परवाना सादर करावा लागेल.
- ताळेबंद लेखापरीक्षण अहवालसह मागील तीन वर्षाचा आयटीआय रिटर्न नफा तोटाइत्यादी खाते सादर करावी लागतील.
बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा? (How To Apply Personal Loan)
जर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून वैयक्तिक कर्ज घ्यायचे आहे तर तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकता एक ऑनलाईन आणि दुसरा म्हणजे ऑफलाइन या दोन्ही प्रकारे तुम्ही पर्सनल लोन साठी अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेनंतर मला वैयक्तिक कर्ज घ्यायचे असल्यास सर्वप्रथम तुम्हाला या बँकेचे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- यानंतर यांच्या मुख्य पृष्ठावर तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी.
- यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेले आवश्यक कागदपत्रे तेथे अपलोड करायचे आहेत.
- संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर एकदा अर्ज पुन्हा तपासावा की काही त्रुटी राहिली का नाही जर सर्व बरोबर असेल तर अर्ज सबमिट या बटन वरती क्लिक करून अर्ज तुम्हाला सादर करून द्यायचा आहे.
- अशाप्रकारे तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन कर्जासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता –
- बँक ऑफ महाराष्ट्र या बँक शाखेतून तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळील बँक शाखेत जावे लागेल.
- त्यानंतर बँक शाखेच्या एखाद्या कर्मचारीला वैयक्तिक कर्ज संबंधित माहिती विचारा.
- बँकेचे कर्मचारी तुम्हाला वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून सांगते.
- यानंतर बँक कर्मचाऱ्याकडून तुम्हाला कर्ज घेण्यासाठी अर्ज घ्यावा लागेल.
- कर्ज घेण्यासाठी चा अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला त्यात विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरायचे आहे.
- माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे त्यांची छायांकित प्रत त्या अर्जासोबत जोडायचे आहे.
- यानंतर संपूर्ण भरलेला अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे या दोन्ही गोष्टी तुम्हाला बँक कर्मचाऱ्याला द्यायचे आहे.
- यानंतर हा अर्ज बँकेद्वारे तपासला जाईल.
- अर्ज तपासल्यानंतर तुम्हाला कळविण्यात येईल की तुम्ही या कर्जासाठी पात्र आहेत की नाही यानंतर तुमची पुढील प्रक्रिया होईल.
- अशाप्रकारे तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
पर्सनल लोन घेण्याचे फायदे (Personal Loan Benefits)
पर्सनल लोन घेण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत-
- जर तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता आहे तर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.
- पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणतेही तारण ठेवावे लागत नाही.
- काही आवश्यक कागदपत्रे जमा करून पर्सनल लोन तुम्हाला खूप लवकर मिळते.
- पर्सनल लोन तुम्ही वैयक्तिक खर्च, लग्न कार्य, शैक्षणिक खर्च, आरोग्य तसेच इतर कोणत्याही कारणासाठी वापरू शकता.
- वैयक्तिक कर्ज हे कोणत्याही बँक शाखेतून सहजासहजी मिळून जाते.
निष्कर्ष
आजच्या या लेखात Bank of Maharashtra Personal Loan 2024 याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र मधून वैयक्तिक कर्ज कसे घेऊ शकता तसेच वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी पात्रता काय आहे, वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोण कोणती कागदपत्रे लागतील इत्यादी सर्व गोष्टी आपण आजच्या या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेतल्या आहे. जर तुम्हाला आमच्या द्वारे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून लोन कसे घ्यायचे याबद्दल दिलेली माहिती उपयुक्त वाटली असल्यास ही माहिती इतरांना नक्की शेअर करा.