Car Insurance Information: कार इन्शुरन्स म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

Car Insurance Information In Marathi: आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी आपण जसा त्यांचा जीवन विमा काढतो त्यानुसार आपण चार चाकी दोन चाकी वाहनांचा सुद्धा एक जीवन विमा सारखाच एक विमा काढू शकतो आणि हा कार विमा तुम्हाला काढणे अत्यंत आवश्यक आहे.

सध्याच्या युगात अपघातांचा प्रमाण हा दिवसेंदिवस कमी होण्यापेक्षा याचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे कार विमा करणे हे आता खूप महत्त्वाचे झाले आहे. ज्यावेळी तुम्ही नवीन वाहन खरेदी करता त्यावेळी त्या वाहनाचा वाहन विमा नक्की काढा. आजच्या या लेखात आपण Car Insurance Information या विषयावर संपुर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Car Insurance Information
Car Insurance Information

कार इन्शुरन्स म्हणजे काय? (What is car insurance?)

आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांचा ज्या प्रकारे त्याचा जीवन विमा काढतो तश्याच पद्धतीने चार चाकी, दुचाकी, मोटार वाहन इत्यादी वाहनांचा विमा करणे म्हणजेच कार इन्शुरन्स काढणे होय. कार इन्शुरन्स हे एक आपल्या वाहनाला एकप्रकारे विमा कवच आहे. Car Insurance केल्यामुळे वाहन धारकाला आर्थिक सहाय्य मिळते.

Car Insurance केल्यामुळे आपल्याकडे असलेल्या महागड्या गाड्या यांचा अपघात झाला तर हा धोका टाळण्यास संरक्षण मिळते. कार इन्शुरन्स मध्ये चोरी असो किंवा त्या वाहनाचे महत्वाचे पार्टस असो किंवा आपल्या वाहनांना अनेकदा पाण्यापासून सुध्दा नुकसान होत असते. इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश हा कार इन्शुरन्स मध्ये असतो. तसेच वाहनाला असलेला धोका किंवा वाहणापासून होणारे मोठे नुकसान या कार विम्या मुळे शक्य होते. याच कारणामुळे कार इन्शुरन्स करणे कधीही फायद्याचे ठरते.

कार इन्शुरन्स काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Car Insurance Documents)

कार इन्शुरन्स काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत-

  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रहिवासी पुरावा
  • वाहनाचे आरसी बुक व इत्यादी कागदपत्रे.

कार इन्शुरन्स मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश नसतो?

  • जर तुम्ही ड्रिंक करुन गाडी चालवत असाल आणि अनपेक्षित तुमच्याकडून अपघात झाला तर तूम्ही कार इन्शुरन्स करू शकत नाही. कारण तूम्ही मद्यपान केलेले असते.
  • वाहन चालवत असलेल्या व्यक्तीकडे वाहन परवाना नसेल आणि अपघातात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असल्यास अश्या वेळी हे कार इन्शुरन्स चालणार नाही.

Car Insurance Claim कसा करावा?

  • सध्या ऑनलाईन पद्धतीने अनेक जण कार इन्शुरन्स विमा खरेदी करतात. जर तुम्ही कार इन्शुरन्स केला असेल आणि समजा अनपेक्षित अपघातात तुमची दुर्घटना झाली तर तुम्ही क्लेम करू शकता. ऑनलाइन पद्धतीने ज्या लोकांनी कार विमा विकत घेतला आहे ते त्यांच्या त्या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन हा विमा क्लेम करू शकता.
  • जर तुमचा अपघात झाला आहे किंवा तुमच्या गाडीचे अपघातात नुकसान झाले आहे तर लवकरात लवकर तुम्हाला कार इन्शुरन्स कंपनीला या सर्व गोष्टी कळवायच्या आहेत अन्यथा तुमचा दावा फेटाळला जाऊ शकतो.
  • गाडीचे अपघात किंवा नुकसान झाले असल्यास तुम्हाला ही माहिती तुम्ही ज्या विमा कंपनीशी कार किंवा बाईक इन्शुरन्स केला आहे त्या विमा कंपनीला 24 ते 48 तासात या सर्व गोष्टी सांगणे गरजेचे आहे.

FAQ’S- Car Insurance

चला तर जाणून घेऊयात लोकांद्वारे कार इन्शुरन्स बद्दल विचारले प्रश्न आणि त्यांची उत्तरे-

प्रश्न.01- गाडीचा इन्शुरन्स कसा काढतात?

उत्तर: गाडीचा इन्शुरन्स काढण्यासाठी दोन पद्धती आहेत एक ऑनलाईन आणि दुसरा म्हणजे ऑफलाइन तुम्ही या दोन्ही पद्धतीने कार इन्शुरन्स करण्यासाठी विविध प्रकारच्या कंपन्यांना अर्ज करू शकता.

प्रश्न.02- कार विमा काढताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

उत्तर: कार विमा काढताना तुमच्या गाडीच्या बजेटनुसार कार विमा इन्शुरन्स कंपनी द्वारे काढून घ्यावा. कार विमा तुम्ही तुमच्या आवडीच्या कंपनी मध्ये करु शकता.

प्रश्न.03- कार विमा करणे बंधनकारक आहे का?

उत्तर: कारचा विमा करणे बंधनकारक नाही पण गरजेचे आहे.

प्रश्न.04- इन्शुरन्स हा फक्त चार चाकी गाड्यांचा होतो का?

उत्तर: इन्शुरन्स हा दुचाकी चार चाकी बारा चाकी अन्य कोणतेही वाहन असू द्या सर्व वाहनांचे इन्शुरन्स करता येते.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण Car Insurance बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की तुम्ही आपल्या गाडीचा विमा काढताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कार विमा काढताना कोणकोणते कागदपत्रे लागतील इत्यादि गोष्टी आपण आजच्या या लेखात सविस्तरपणे जाणून घेतल्या आहेत.

जर तुम्हाला आमच्याद्वारे कार इन्शुरन्स वरती दिलेली माहिती उपयुक्त वाटली असल्यास हि माहिती खाली दिलेल्या शेअर बटन वरती क्लिक करून इतरांना देखील शेअर करा.