Cibil Score म्हणजे काय, कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर किती महत्वाचा आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Cibil Score: सिबिल स्कोरला बँकिंग आणि वित्तीय संस्थांमध्ये खूप महत्त्व दिले जाते. सिबिल स्कोर हा तुमच्या बँकिंग इतिहासाची पूर्ण माहिती दाखवतो. तसेच तुमचा बँकिंग इतिहास चांगला आहे की नाही तुम्ही वित्तीय संस्थांकडून किंवा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत जमा करतात की नाही हे सर्व तुमच्या Cibil Credit Score वरून कळते. यामुळे Credit Score ला बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये खूप महत्त्व दिले जाते.

आजच्या या लेखामध्ये आपण Cibil Score In Marathi (सिबिल स्कोर) काय आहे, याचे फायदे काय आहे आणि सिबिल स्कोर कसा वाढवावा या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Cibil Score
Cibil Score

सिबिल स्कोर म्हणजे काय? (What is CIBIL Score?)

सिबिल स्कोर ही एक 3 अंकी क्रेडिट संख्या आहे यावरून तुमचे बँकिंग इतिहास चांगले आहे की वाईट आहे यावरून तपासले जाऊ शकते. जर तुम्हाला बँकिंग किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घ्यायचे आहे तर तुम्हाला सिबिल स्कोर हा खूपच गरजेचे आहे कारण बँकिंग किंवा वित्तीय संस्था सर्वप्रथम तुमच्या सिबिल स्कोर तपासतात कारण सिबिल स्कोर वरती तुमचा मागील बँकिंग इतिहास सर्व त्याचा तपशील त्यांच्या समोर असतो की यांचे मागील व्यवहार कसे होते तसेच यांनी इतिहासात घेतलेले कर्ज वेळेवर जमा केले की नाही हे सर्व त्यांना सिबिल स्कोर वरून कळते त्यामुळे सिबिल स्कोर बँकिंग किंवा वित्तीय क्षेत्रात खूप महत्त्वाचा आहे.

कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर किती असला पाहिजे?

जर तुम्हाला बँकिंग किंवा वित्तीय संस्थेन कडून कर्ज घ्यायचे असेल तर सर्वप्रथम या संस्था तुमचा सिबिल स्कोर तपासतात आणि त्यावरूनच तुम्हाला किती कर्ज द्यायचे आहे हे ठरवतात त्यामुळे सिबिल स्कोर हा खूप महत्त्वाचा आहे सिबिल स्कोर कर्ज घेण्यासाठी तुमचा 300 ते 900 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला कर्ज मिळणार नाही.

जर तुमचा सिबिल स्कोर हा 750 किंवा 750 च्या वर असेल तर हा स्कोर म्हणजेच हा आकडा बँकिंग किंवा वित्तीय संस्थेच्या क्षेत्रात खूप मोलाचा आहे म्हणजे यावरून तुम्ही खूप चांगले ग्राहकात आणि तुम्ही वेळेवर कर्ज परतफेड करतात हे या स्कोर वरून कळते आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त कर्ज मिळवण्याचे मार्ग सोपे होते.

सिबिल स्कोर चे महत्व?

Cibil Score चे महत्व खालीलप्रमाणे आहेत –

  • बँकिंग क्षेत्र किंवा वित्तीय संस्थांमध्ये सिबिल स्कोर ला खूप महत्त्व दिले जाते.
  • सिबिल स्कोर हा कर्ज मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.
  • जर तुम्हाला बँक किंवा इतर वित्तीय संस्थेमार्फत कर्ज घ्यायचे असेल तर सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर तपासला जातो त्यानंतरच तुम्हाला कर्ज मिळते.
  • जर तुमचा शुभेच्छा चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजदरासह जास्तीत जास्त कर्ज मिळते.
  • सिबिल स्कोर हा तुमचे मागील म्हणजे इतिहासात तुम्ही जे काही कर्ज घेतले आहे ते तुम्ही कसे परतफेड केले. तुम्ही घेतलेले कर्ज वेळेवर जमा केले की नाही याची संपूर्ण माहिती त्या सिबिल स्कोर च्या माध्यमातून बँक किंवा वित्तीय संस्थांना कळते आणि त्या सिबिल स्कोरवरती बँक किंवा वित्तीय संस्था ठरवतात की तुम्हाला कर्ज द्यायचे आहे की नाही.
  • वरती दिलेल्या माहितीच्या अनुसार तुम्हाला कळलेच असेल की सिबिल स्कोर हा बँकिंग क्षेत्रात म्हणजेच कर्ज घेण्यासाठी किती महत्त्वाचा आहे त्यामुळे सिबिल स्कोर हा वेळेवर तपासणे तसेच जर तुमचा Cibil Score कमी असेल तर त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा.

सिबिल स्कोर कसा वाढवावा?

सिबिल स्कोर वाढवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा-

  • सिबिल स्कोर वाढवण्याआधी तुम्हाला हे तपासावा लागेल की आपला Cibil Score किती आहे. सिबिल स्कोर तपासण्यासाठी येथे क्लिक करा आणि सर्वप्रथम आपला सिबिल स्कोर जाणून घ्या.
  • तुमचे पैशांचा व्यवहार तसेच यांचा इतिहास हा सिबिल स्कोरवर खूप परिणाम असतो त्यामुळे आपला व्यवहार हा कधीही Clear ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • जर तुम्हाला तुमचा सिव्हिल स्कोर वाढवायचा आहे तर तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर करा नक्कीच तुमचा सिबिल स्कोर वाढवण्यास मदत होईल.
  • जर तुम्ही क्रेडिट कार्ड द्वारे कोणती वस्तू ईएमआय वरती खरेदी केले आहे तर त्याचे एम आय महिन्याला वेळेवर भरत चला एकही महिना चुकवू देऊ नका नाहीतर तुमचा सिबिल स्कोर हा कमी होऊ शकतो.
  • जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे तर त्या क्रेडिट कार्डचा वापर हा नियमितपणे करत चला या क्रेडिट कार्डचा वापरामुळे देखील तुमच्या सिबिल स्कोर मध्ये फरक जाणवतो म्हणजेच सिबिल स्कोर काही प्रमाणात वाढत असतो.
  • क्रेडिट कार्ड द्वारे तुम्ही जर पैसे काढले असेल किंवा त्यावरून खरेदी केली आहे तर त्याची परतफेड ही वेळेवर जमा करा या कारणामुळे तुमच्या सिबिल स्कोर खूप जास्त प्रमाणात वाढेल आणि तुम्हाला पुढे जास्त कर्ज मिळू शकते.

निष्कर्ष

आजच्या या लेखांमध्ये आपण सिबिल स्कोर (Cibil Score) बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. सिबिल स्कोर हा कर्ज घेण्यासाठी इतका का महत्त्वाचा असतो तसेच सिबिल स्कोर कमी किंवा जास्त असल्यामुळे याचे तोटे आणि फायदे काय आहेत या गोष्टी आपण आजच्या या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेतल्या आहे त्यामुळे जर तुम्हाला आमच्याद्वारे लिहिलेला सिबिल स्कोर बद्दल हा लेख उपयुक्त वाटल्यास ही माहिती इतरांना देखील शेअर करा.