Drone Subsidy Yojana 2024: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन अनुदान योजना सुरू; ड्रोनसाठी किती टक्के अनुदान मिळेल? जाणून घ्या सविस्तर माहिती मराठी मध्ये.

Drone Subsidy Yojana: शेतकरी बांधवांना ड्रोन खरेदी करण्यासाठी सरकारकडून भरपूर अनुदान मिळत आहे. सरकारद्वारे शेतकरी बांधवांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत आहे त्यातीलच एक योजना म्हणजे ड्रोन अनुदान योजना या योजनेच्या माध्यमातून शेती उपकरण अनुदान तत्त्वावर ड्रोन उपलब्ध करून दिले जातात. शेतीत औषधे फवारणीसाठी ही ड्रोन अनुदान योजना ही शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आली आहे.

Drone Subsidy
Drone Subsidy

ड्रोन अनुदान योजना माहिती (Drone Subsidy Details)

योजनेचे नाव कृषी ड्रोन अनुदान योजना (Drone Subsidy Scheme)
विभाग कृषी विभाग
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग
लाभ 5 लाखाचे अनुदान व त्यापेक्षा अधिक 
उद्देश शेतकरी बांधवांनाकृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
Drone Subsidy Details

शेती करण्यासाठी ड्रोनचा फायदा कसा होणार?

  • शेती करण्यासाठी ड्रोनचा वापर करून शेतकऱ्यांना शेतातील पिकांची पाहणी करता येणार आहे. 
  • ड्रोनद्वारे शेतीची पाहणी करून पिकांवर आलेल्या रोगांची तपासणी करण्यासाठी देखील ड्रोन फायदेशीर ठरणार आहे.
  • पिकांवर फवारणी करण्याकरिता अत्यंत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त शेतीतील क्षेत्रावर ड्रोनच्या साहाय्याने कमी वेळेत फवारणी करता येणार आहे. या मुळे शेतकरी बांधवांचा वेळ आणि कष्ट कमी होतील.
  • ड्रोनला खालून कॅमेरे लावलेले असतात त्या कॅमेऱ्याच्या मदतीने पिकांवर आलेले कीड व रोगांची माहिती यांचा तपशील ठेवणे शेतकरी बांधवांना शक्य होणार आहे. 

ड्रोन अनुदान या योजनेमध्ये ड्रोन खरेदीवर किती टक्के अनुदान मिळणार? 

  • ड्रोन खरेदीवर शेतकरी उत्पादक संस्थांना सात लाख 50 हजार रुपये म्हणजेच 75% टक्के अनुदान मिळणार आहे. 
  • विद्यापीठे व सरकारी संस्थाना ड्रोन खरेदीवर दहा लाख रुपयांपर्यंत म्हणजेच १००% शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. 
  • कृषी पदवीधारकांना ड्रोन खरेदीवर पाच लाख रुपयांपपर्यंत अनुदान मिळणार आहे.
  • तसेच इतर शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीवर 40% अनुदान किंवा 4 लाख रुपये मिळणार आहेत. 

कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

  • आधार कार्ड
  • फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंहस्ताक्षरीत प्रत
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • ईमेल आयडी
  • 10 अंकी मोबाईल क्रमांक 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत
  • जो ड्रोन खरेदी करायचा आहे त्या ड्रोन चे कोटेशन / ड्रोन विक्रेत्याची संपूर्ण माहिती
  • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व त्यांचा तपशील 
  • अर्जदार संस्था असल्यास संस्थेचा पुरावा
  • स्वयंघोषणापत्र
  • पूर्व संमतीपत्र

ड्रोन अनुदान योजनेच्या अटी (Drone Subsidy Terms)

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या ड्रोन अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ड्रोन खरेदीसाठी अर्जदार हा कृषी पदवीधारक असल्यास कृषी पदवी प्रमाणपत्र किंवा इतर त्यासंबंधित प्रमाण सादर करणे आवश्यक आहे.
  • यापूर्वी अर्जदार शेतकरी बांधवांने केंद्र किंवा सरकारद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत ड्रोन अनुदानाचा लाभ घेतला असेल तर अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • ड्रोन खरेदी करण्यासाठी अर्जदार शेतकरी हा सरकारी नोकर नसावा अन्यथा असे शेतकरी या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • प्रत्येकी एका घरात फक्त एकाच व्यक्तीस कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
  • कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

कृषी ड्रोन कसे चालवावे?

महाराष्ट्र राज्यातील भरपूर शेतकरी बांधवांना ड्रोन खरेदी करायची इच्छा असेल परंतु त्यांच्या मनात एक शंका नक्की असणारच ती म्हणजे ड्रोन चा वापर कसा करावा म्हणजेच याला आपण कसं चालवू शकतो. या सर्व गोष्टींची चिंता करणे सोडून द्या कारण शासनच ड्रोन प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. 

या ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांवर फवारणी करता यावी व शेतात फवारणी करताना ड्रोन कशाप्रकारे हाताळावा व याचा वापर कसा करावा या बद्दलची सविस्तर माहिती शासनाकडून देण्यात येणार आहे. याचप्रमाणे शेतात फवारणी करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी याचे देखील प्रशिक्षण शेतकरी बांधवांना शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

ड्रोन खरेदी करण्यासाठी कोणाशी संपर्क साधावा? 

शेतकरी बांधवांनो तुम्हाला देखील ड्रोन खरेदी करायचा आहे आणि या ड्रोन अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला संबंधित कृषी सहाय्यक कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा लागेल आणि या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला तेथे मिळून जाईल.

निष्कर्ष

आजच्या या लेखामध्ये आपण ड्रोन अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेतली आहे. या साठी अर्ज कसा करावा, या योजनेचा लाभ कोणाला मिळतो तसेच या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात इत्यादी सर्व माहिती जाणून घेतली आहे. जर तुम्हाला आजचा हा लेख उपयुक्त वाटला असेल तर हा लेख आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. धन्यवाद..