Free Sewing Machine Yojana Maharashtra: मोफत शिलाई मशीन योजना 2024-25

नमस्कार आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला Free Sewing Machine Yojana Maharashtra म्हणजेच तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळेल याची सविस्तर माहिती आज आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट अद्याप बनवलं नसेल तर तुम्ही आमच्या या ब्लॉग वरती जाऊन मॅरेज सर्टिफिकेट कसा काढतात याची माहिती जाणून घेऊ शकता या विषयावर आम्ही लेख लिहला आहे तो लेख नक्की वाचा.

Free Sewing Machine Yojana Maharashtra
Free Sewing Machine Yojana Maharashtra

शिलाई मशीन योजना काय आहे?

Free Silai Machine Yojana ही महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरी बसुन स्वतःचा एक उद्योग सुरु करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली ही एक महत्वाची योजना आहे ती म्हणजे फ्री शिलाई मशीन योजना. या योजनेचा लाभ घेऊन गरीब कुटुंबातील महिला शिलाई मशीन वरती आपल्या परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून एकप्रकारे पैसे कमवू शकतील व त्या महिला स्वतःच्या कुटुंबाचा सुरळीतपणे सांभाळ करू शकतील.

महाराष्ट्र शासनाचा एकच उद्देश आहे की राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा व त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी जेणेकरून त्या महिला स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील या उद्देशाने सरकारद्वारे मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येत आहे.

Free Sewing Machine Yojana Maharashtra Details

योजनेचे नाव Free Sewing Machine Scheme Maharashtra
विभागमहिला व बाल कल्याण विकास विभाग
राज्यमहाराष्ट्र (Maharashtra)
योजना कोणाद्वारे सुरू करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारा
योजनेचे लाभार्थीग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गरीब महिला
योजनेचा लाभमोफत शिलाई मशीन (Free Silai Machine)
योजनेची सुरुवात कधी झाली2019 मध्ये
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन पद्धत
अधिकृत संकेतस्थळ https://www.india.gov.in/
Free Sewing Machine Yojana Maharashtra Details

शिलाई मशीन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

Shilai Machine Yojana या योजनेचा मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहे –

  • शासनाद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.
  • Free Silai Machine या योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनविणे आहे जेणेकरून आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • Free Sewing Machine Scheme Maharashtra अंतर्गत महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे.
  • शासनाचा हाच उद्देश आहे की या योजना अंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट बनवणे.
  • या योजनेअंतर्गत महिलांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  • महिलांचे भविष्य उज्वल बनविण्यासाठी हि योजना राबविली जात आहे.
  • सरकारचा हाच उद्देश आहे की महिलांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणत्याही गोष्टींवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये व त्या स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर महिला बनवणे.
  • या योजनेअंतर्गत महिलांची आर्थिक उन्नती करणे.

शिलाई मशीन योजनेचे वैशिष्ट्ये (Yojana Features)

शिलाई मशीन योजनेचे कोणकोणते वैशिष्ट्ये आहे ते खालीलप्रमाणे आहेत-

  • Free Silai Machine Yojana या योजनेची सुरुवात केंद्र शासनाद्वारे करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.
  • राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने मोफत शिलाई मशीन योजना ही एक प्रकारची महत्वाची योजना ठरणार आहे.
  • शासनाद्वारे राज्यातील 50 हजारांपेक्षा जास्त महिलांना शिलाई मशीन मोफत वाटप करण्याचे लक्ष्य निर्धारित केले गेले आहेत.
  • राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब आणि गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येणार आहे.
  • मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून महिलांना अर्ज करताना जास्त कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी सरकार एक महत्वाची भूमिका बजावणार आहे.
  • शिलाई मशीन योजने अंतर्गत राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास आणि राज्यात महिलांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Free Sewing Machine Yojana Maharashtra Apply Process (अर्ज प्रक्रिया)

  • मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेला आपल्या जवळच्या नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयात किंवा महिला व बालकल्याण विकास विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • जर तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुम्ही अर्ज भरून त्या सोबत योग्य ती आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रती अर्जासोबत जोडून सदर अर्ज आपल्या भागाच्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावी अन्यथा तुम्हाला सदर अर्ज तहसील कार्यालयात जमा करावा लागेल.
  • जर तुम्ही शहरी भागातील रहिवासी असाल तर तुम्ही ज्या वार्डात येत असाल तर त्या वार्डच्या नगरपालिका कार्यालयात अर्ज जमा करावा.
  • जर तुम्हाला अर्ज मिळाला नसेल तर आम्ही अर्जाची डाउनलोड लिंक दिली आहे तेथून तुम्ही सहज अर्ज डाउनलोड करू शकता व अर्जात विचारलेली सर्व माहिती सविस्तर भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज जमा करावा व अर्जाची पावती संबंधीत कार्यालयातून घ्यावी.
  • सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडल्यानंतर अर्ज सादर करावा.
  • यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला कळवण्यात येईल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही.
  • जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला शिलाई मशीन मोफत देण्यात येईल.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेले आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून देणे आवश्यक आहे –

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • लाभार्थ्यांचा उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे)
  • जन्म दाखला , जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • अर्जदार महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र.
  • अर्जदार महिलेकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • रेशन कार्ड (शिधापत्रिका)
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शिलाई मशीन ज्ञान प्राप्त असल्याचे प्रमाणपत्र

मोफत शिलाई मशीन साठी आवश्यक पात्रता (Eligibility Criteria)

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे –

  • मोफत शिलाई मशीनचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महीला ही भारतीय नागरीक असणे आवश्यक आहे. जर महिला भारतीय नागरीक नसेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही याची नोंद घ्यावी.
  • केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच शिलाई मशीन या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील इतर महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील व बेरोजगार महिला असणे आवश्यक आहे.
  • 40 वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महिलांनाच देण्यात येईल पुरुषांना मिळणार नाही.
  • या योजनेचा लाभ राज्यातील पुरुषांना दिला जाणार नाही
  • अर्जदार महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार महिलेकडे शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा व अपंग महिलांना या योजनेचा प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • केंद्र / राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या शिलाई मशीन वाटप योजने अंतर्गत अर्जदार महिलेने याआधी लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • सरकारी नोकरीत कार्यरत महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास विधवा महिलेला अर्जासोबत पतीचे मृत्यू प्रमाण झेरॉक्स पत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अर्जासोबत अपंग प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे.
  • एका कुटुंबातील फक्त एकापेक्षा अधिक महिलेला मोफत शिलाई मशीन चा लाभ मिळणार नाही.
  • अर्जदार महिलेने मोफत शिलाई मशीन साठी खोटी माहिती देऊन अर्ज केला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच त्या महिलेला या योजनेमधून रद्द केले जाईल.

शिलाई मशीन योजनेचे फायदे (Sewing Machine Yojana Benefits)

  • शिलाई मशीन योजना महाराष्ट्र या योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप केले जाणार आहे.
  • सरकार यांना मोफत शिलाई मशीन देणार आहे यामुळे राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत महिला शिलाई मशीनच्या सहाय्याने परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून स्वतःसाठी एकप्रकारे स्वतःसाठी घरबसल्या रोजगार मिळवू शकतील ज्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडी फार प्रमाणात वाढ होईल व महिला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील.
  • या योजनेचा उद्देश हाच आहे की राज्यातील महिला स्वावलंबी बनतील.
  • सिलाई मशीन या योजनेच्या सहाय्याने राज्यातील गरीब कुटुंबातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • राज्यातील बेरोजगारी कमी होईल तसेच महिलांसाठी रोजगाराच्या नव नवीन संधी उपलब्ध होतील.
  • या योजनेअंतर्गत महिलांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यास मदत होईल
  • महिला या योजने अंतर्गत सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • या शिलाई मशीन योजनेमुळे महिलांच्या सशक्तीकरणाला चालना मिळेल.
  • Silai Machine Yojana या योजनेच्या सहाय्याने ग्रामीण भागात महिलांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील.

FAQ’S- Free Sewing Machine Yojana Maharashtra

चला तर जाणून घेऊयात लोकांद्वारे विचारण्यात आलेले Silai Machine Yojana संबंधी प्रश्न आणि त्यांची उत्तरे-

Q.1- शिलाई मशीन योजना कोणत्या विभागात मोडते?

Ans- शिलाई मशीन योजना महिला व बाल कल्याण विकास विभाग मध्ये मोडते.

Q.2- शिलाई मशीन योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

Ans- शिलाई मशीन योजनेचा लाभ ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गरीब महिलांना मिळतो.

Q.3- शिलाई मशीन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

Ans- शासनाद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.

Q.4- शिलाई मशीन योजनेची सुरुवात कधी झाली?

Ans- शिलाई मशीन योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली.

निष्कर्ष

आजच्या या लेखामध्ये आम्ही Free Sewing Machine Yojana Maharashtra बद्दल सविस्तरपणे आपल्यासोबत शेअर केली आहे. शिलाई मशीन योजनेचा लाभ, उद्देश, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता इत्यादी महत्वपुर्ण मुद्द्यांचे सविस्तरपणे स्पष्टीकरण करुन संपूर्ण माहिती शेअर केली आहे.

जर तुम्हाला आमच्याद्वारे Free Sewing Machine Yojana Maharashtra बद्दल दिलेली माहिती उपयुक्त वाटल्यास हि माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. धन्यवाद.