Government Scheme : सरकार सामान्य नागरिकांकरता नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. मात्र या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पुरेशी माहिती नसल्यामुळे पोहोचत नाहीत. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सरकारच्या महत्त्वाच्या योजना बद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही या सर्व योजनांचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता. तसेच सद्यस्थितीमध्ये कुठल्या योजना सरकार द्वारे सामान्य नागरिकांकरता पारित करण्यात आलेले आहे.
केंद्र सरकार तसेच राज्य सरकार तर्फे सामान्य नागरिकांकरिता नेहमीच वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असतात. या योजनेच्या माध्यमातून बरेच नागरिक योजनांचा लाभ घेत आहेत. परंतु काही नागरिकांपर्यंत अजून या योजना पोहोचलेच नाही. त्यामुळे या योजना बाबतची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. या योजनेचा लाभ घेण्याकरता हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
सरकारी योजना | केंद्र व राज्य सरकारच्या योजना |
आभा कार्ड | https://uidai.gov.in/ |
आयुष्यमान भारत कार्ड | https://pmjay.gov.in/ |
पी एम किसान योजना | https://pmkisan.gov.in/ |
मुख्यमंत्री वयोश्री योजना | https://www.alimco.in/index |
आधार कार्ड /पॅन कार्ड | https://www.incometax.gov.in/ |
आभा कार्ड (Government Scheme)
आभा कार्ड म्हणजे काय?
आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर हे एक डिजिटल हेल्थ कार्ड असून यामध्ये नागरिकांच्या आरोग्य विषयी संबंधित माहिती साठवली जाते. हे कार्ड एक प्रकारे आपल्याला आधार कार्ड सारखे असणार आहे. यावर सुद्धा आपल्याला 14 अंकी नंबर बघायला मिळतो. या नंबरचा वापर करून रुग्णांची सगळी मेडिकल हिस्टरी डॉक्टरांना माहिती होऊ शकते. या कार्डच्या साह्याने कुठल्या आजारा वरती इलाज झाला त्याचबरोबर कुठल्या टेस्ट करण्यात आल्या कोणती औषधे देण्यात आली रुग्णाला आरोग्याच्या कुठल्या समस्या आहेत कोणत्या आरोग्यविषयक योजनांशी जोडलेला आहे ही सर्व माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवली जाणार आहे.
तुम्हाला सुद्धा आभा कार्ड बनवायचे असेल तर अधिकृत संकेतस्थळाला इथे भेट द्या. यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमची संपूर्ण माहिती भरून हे कार्ड ऑनलाइन पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता.
आयुष्यमान भारत कार्ड (Government Scheme)
प्रधानमंत्री आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा सरकार द्वारे मिळवून दिला जातो. या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पॅनलीकृत रुग्णालयाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार मिळवून दिले जातात. देशामधील सर्व नागरिकांचे आरोग्य सुधारण्याकरता ही योजना प्रभावीशाली ठरणार आहे.
तुम्हाला सुद्धा आयुष्यमान भारत कार्ड बनवायचे असेल तर या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या यानंतर स्टेप बाय स्टेप तुमची संपूर्ण माहिती भरून तुम्ही तुमचे आयुष्यमान भारत कार्ड बनवू शकता.
पी एम किसान योजना (Government Scheme)
शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनामध्ये वाढ व्हावी याकरता सरकारकडून (Government Scheme) पी एम किसान योजना तसेच पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळत असतात. यामध्ये पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये तसेच पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे मिळून या योजनेच्या द्वारे शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळवून दिले जातात.
तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळवून घ्यायचा असेल तर अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. स्टेप बाय स्टेप पूर्णतः तुमची माहिती भरून तुम्ही या योजनेचा लाभ मिळू शकता.
मुख्यमंत्री वयोश्री योजना
सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांकरिता नेहमीच नवनवीन(Government Scheme) योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून सर्वांना ज्येष्ठ नागरिकांकरता आता मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून 3000 रुपयाचा सरसकट लाभ मिळवून दिला जाणार आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांकरिता आर्थिक सहाय्यक प्रदान करून देणारी योजना आहे. या योजने करता अर्जदाराचे वय हे 65 वर्षापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर या योजने करता लवकरच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट
तुम्हाला माहिती आहे का सरकारच्या अशा काही खूप सार्या (Government Scheme) योजना आहेत ज्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट असणे खूप गरजेचे आहे. कारण सद्यस्थितीमध्ये तुम्हाला शैक्षणिक कामासाठी सरकार द्वारे मिळत असलेले अनुदानित कर्ज मिळवण्यासाठी तुमच्या आधार कार्ड व पॅन कार्ड अपडेट असणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड अपडेट केले नसेल तर तुम्हाला आता दंड सुद्धा भरावा लागू शकतो. त्यामुळे खालील दिलेल्या लिंकचा वापर करून तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घ्या.
आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट करण्याकरता तुम्हाला इथे अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे. यावरती क्लिक करून तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
निष्कर्ष : आजच्या लेखांमध्ये तुम्हाला भारत सरकारकडून सामान्य नागरिकांकरता मिळवून देण्यात येणाऱ्या पाच योजनांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. वरील दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप या योजनांचा लाभ मिळू शकतात. तुम्हाला याबाबत काही प्रतिक्रिया द्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट द्वारे कळवू शकता.