Home Loan 2024: होम लोनसाठी पात्रता, कागदपत्रे, बँका, व्याजदर, सर्व माहिती एका क्लिकवर!

Home Loan : आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असायला हवे हे स्वप्न असते. सद्यस्थितीमध्ये कुठलेही घर घ्यायचा विचार केला तरी आपल्या डोळ्यासमोर सर्वात अगोदर जी गोष्ट येते ती म्हणजे घराची किंमत आणि सद्यस्थितीमध्ये घराच्या किमती ह्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना घर खरेदी करणे खूप कठीण बाब झालेली आहे. अशावेळी आपण बँकेच्या आधारे Home Loan घर घेण्याचे स्वप्न बघत असतो. ते कशा प्रमाणे घर घेण्याकरता आपल्याला होम लोन देण्यात येते. याची सविस्तर माहिती आपल्याला असणे खूप गरजेचे आहे.Home Loan

Home Loan
Home Loan

सर्वात अगोदर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे होम लोन म्हणजे काय? तसेच होम लोन घेण्याकरता कोणत्या डॉक्युमेंट ची गरज आपल्याला लागते? याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. त्याचप्रमाणे होम लोन घेणे किती उपयोगी आहे याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणे गरजेचे आहे.Home Loan

गृह कर्ज म्हणजे काय? (Home Loan)

गृह कर्ज म्हणजे एक अशी सुविधा आहे ज्या सुविधेमध्ये बँकेद्वारे आपल्याला ठराविक रक्कम ही कर्ज स्वरूपात आपल्या घराशी आवश्यक वेगवेगळ्या कामांकरिता प्रदान करत असते. या रकमेला आपण (EMI)स्वरूपामध्ये बँकेकडे परत द्यायचे असतात. या सर्व प्रक्रियेलाच आपण होम लोन किंवा गृह कर्ज असे म्हणतो.

होम लोन हे फक्त घर विकत घेण्याकरताच नाही तर नवीन घर बांधण्याकरता तसेच घर दुरुस्ती करण्याकरता सुद्धा आपल्याला बँक लोन देत असते. आपल्याला होम लोन घेण्याचे विविध प्रकारचे फायदे होतात. त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर बांधण्याकरता सरकार 2 ते 3 लाखापर्यंत सुद्धा गृह कर्ज देत असते. तुम्ही कुठल्या सरकारी योजनेसाठी पात्र आहात याकरता तुम्हाला सर्वात अगोदर तुमची पात्रता चेक करणे खूप गरजेचे आहे.Home Loan

होम लोन चे किती प्रकार आहेत?

  • गृह खरेदी करता कर्ज
  • जमीन खरेदी करता कर्ज
  • भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय व्यक्तींकरता गृह कर्ज
  • घराच्या बांधकामाकरिता किंवा घर बांधण्यासाठी कर्ज
  • गृह विस्तार कर्ज
  • ब्रिज कर्ज
  • गृह सुधारणे करता कर्ज
  • गृह रूपांतर कर्ज
  • बॅलन्स ट्रान्सफर होम लोन
  • स्टॅम्प ड्युटी कर्ज

होम लोन घेण्याकरता कुठली पात्रता आवश्यक आहे?

होम लोन देत असताना काही विशिष्ट संस्था आणि एजन्सी काम करत असतात. त्यांच्याकडून गृह कर्ज देण्याकरता काही अटी तसेच नियम दिलेले असतात. ते आज आपण जाणून घेऊया. यामध्ये प्रत्येक नियम व अट ही वेगवेगळी असू शकते.

  • गृह कर्ज घेण्याकरता भारतीय असणे आवश्यक आहे. ( येणारा असेल तरीसुद्धा गृह कर्ज मिळते पण त्यासाठी वेगळ्या अटी व नियम लागू आहेत)
  • स्वतःकडे मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.
  • व्यक्तीचे वय हे 18 वर्षे ते 70 वर्षे यामध्ये असणे गरजेचे आहे.
  • होम लोन घेण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
  • नोकरी करत असलेल्या व्यक्तीकडे दोन वर्षाच्या अनुभव असणे गरजेचे आहे.
  • होम लोन घेणाऱ्या व्यक्तीचे महिन्याचे उत्पन्न हे 25 हजार ते 50 हजार रुपये असावे त्याचप्रमाणे किमान उत्पन्न हे 20000 ते 25 हजार रुपये इतकी असणे आवश्यक आहे.
  • स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या व्यक्तींकरता कमीत कमी 3 ते 4 वर्षाचा व्यवसाय अनुभव आणि तीन-चार वर्ष जुन्या व्यवसायासने गरजेचे आहे.

होम लोन घेण्याकरता आवश्यक कागदपत्रे काय आहे?

कुठल्याही प्रकारचे लोन घेण्याकरता बँक तुमच्याकडे काही सरकारी कागदपत्र मागत असते. यांचा वापर करून ते कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची सर्व माहिती स्वतःकडे साठवून ठेवत असते. होम लोन घेण्याकरता अर्ज करत असताना सुद्धा अशाच डॉक्युमेंट ची आवश्यकता आपल्याला भासते. त्याचप्रमाणे नोकरदार तसेच व्यावसायिक या दोघांनाही ते लागू होत असते. खालील दिलेले कागदपत्र तुम्हाला गृह कर्ज घेण्याकरता आवश्यक ठरतील.Home Loan

KYC कागदपत्रे

  • आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा विजा ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक, मतदार ओळखपत्र घराचा पत्ता ( यापैकी कुठल्याही एक)
  • स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो, त्याचबरोबर गृह कर्जासाठी भरलेला आवेदन फॉर्म

शैक्षणिक तसेच निवास पुरावा

  • दहावी किंवा बारावी मार्कशीट पदवी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड,वोटर आयडी,लाईट बिल, टेलीफोन बिल,एलआयसी पॉलिसी घराचे कागदपत्र.

इन्कम प्रूफ दस्तावेज

तुमच्या कर्मचारी ओळखपत्र जिथे तुम्ही नोकरी करत आहात त्यांना कंपनीचा पुरावा

  • मागील तीन महिन्याची सॅलरी स्लिप
  • मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • किमान तीन ते पाच वर्षाच्या व्यवसायाचे पुरावे दस्तावेज ( व्यावसायिक तसेच स्वतःचा रोजगार असणाऱ्या व्यक्तींसाठी )
  • आयकर परतावा ITR
  • याआधी कुठलीही कर्ज घेतले असेल तर सांगशील आणि क्लोजर लेटर द्यावे लागेल
  • दोन किंवा तीन बँक चेक

होम लोन चा व्याजदर किती असतो?

  • पगारदार अर्जदारांकरिता : 6.70% to 14.00%
  • सेम रोजगार अर्जदारांकरिता : 8.25% to 14.00%

होम लोन(Home Loan) घेण्याकरता ऑफलाइन अर्ज कशा पद्धतीने करावा?

तुम्हाला जर गृह कर्ज घेणे असेल तर पूर्वीपेक्षा हे खूप सोपे झाले आहे. आणि ते फक्त डिजिटल सुविधांमुळे ज्या बँकेमध्ये तुम्हाला प्रदान करतात जसे की नेट बँकिंग ई -बँकिंग आणि UPI सुविधा मुळे आपले बँकिंग विश्वामधील प्रत्येक व्यवहार सुरक्षित आणि सोयीस्कर झालेले आहेत.Home Loan होम लोन घेण्याकरता काही पद्धती दिलेल्या आहेत. त्या आपण आज खालील पद्धतीने समजून घेऊया.

नेहमीच पडते व्यक्तीला कामाच्या व्यापामधून बँकेत जाऊन लोन काढणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे घरात सुद्धा तुम्ही गृह कर्ज काढू शकता. अशावेळी बँकेतून ऑनलाईन पद्धतीने Home Loan होम लोन काढण्याची सुविधा दिली जाते.

होम लोन (Home Loan) घेण्याकरता कशा पद्धतीने करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया त्यामुळे तुम्हाला लोन घेण्याकरता कुठलीही अडचण येणार नाही.

  • सर्वात अगोदर तुम्हाला होम लोन बाबत बँकेने दिलेल्या सर्व अटी व्यवस्थित वाचल्या आहेत किंवा नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.
  • तसेच तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत किंवा नाही याची सुद्धा तुम्हाला एक वेळेस खात्री करणे गरजेचे आहे.
  • होम लोन देताना बँक तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पाहत असते. त्यामुळे तुमचे सर्व कागदपत्रावर संपूर्ण नाव पत्ता व्यवस्थित आहे किंवा नाही हे तपासने तुम्हाला गरजेचे आहे.
  • ज्या बँकेमध्ये तुमचे खाते त्या बँकेमध्ये जाऊन गृह कर्ज काढण्याचा फॉर्म घ्या. किंवा तुम्ही त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • तुम्ही जर ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरत असाल तर तुम्हाला तो फॉर्म व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे सुद्धा गरजेचे असेल संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला ठराविक बँकेकडे तो सबमिट करायचा आहे.
  • त्या फॉर्मच्या माध्यमातून बँक तुम्हाला लोन देईल किंवा नाही हे पात्रता ठरवून तुम्हाला काही दिवसाच्या आत मध्ये कळवले जाते.
  • तुम्ही लोन घेण्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला बँकेकडून सूचना दिल्या जातात किंवा तुमच्या बँक खात्यावरती ती रक्कम जमा करून दिली जाते.

तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने होम लोन घेऊ शकता. आमच्या साइटवरून कुठलेही लोन दिले जात नाही होम लोन कशा पद्धतीने घ्यावे याविषयीची सविस्तर माहिती आम्ही या लेखामध्ये तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद.