Kisan Credit Card Yojana 2024: शेतकरी बांधवांनो किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत मिळवा ३ लाख रुपयापर्यंतचे कर्ज | जाणून घ्या सविस्तर माहिती मराठी मध्ये.

Kisan Credit Card Yojana: भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो हे सर्वांनाच माहित आहे. आजही आपल्या देशातील ग्रामीण भागातील नागरिक शेती करूनच आपला घर खर्च व इतर गरजा शेती करूनच पूर्ण करतात. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती आहे. आपल्या देशातील बहुसंख्य शेतकरी हे आर्थिक परस्थितीला सामोरे जातात त्यामुळे त्यांना शेतीसाठी पुरेसे भांडवल मिळवण्यासाठी गावातील सावकारांवर अवलंबून किंवा जास्त व्याजदराने शेतीसाठी कर्ज घ्यावे लागते. जास्त व्याज दराने कर्ज घेणे हे शेतकरी बांधवांसाठी इतके लाभदायक ठरत नाही. बऱ्याच वेळा कर्ज घेण्याच्या बाबतीत शेतकरी बांधवांसोबत फसवणूक सुद्धा केली जाते. 

Kisan Credit Card Yojana: शेतकरी बांधवांच्या अशा अनेक प्रकारच्या समस्या सोडविण्याकरिता शासन नेहमीच तत्पर असते आणि शेतकरी बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना आहे.शेतकरी बांधवांना शेतीसाठी कमी व्याजदरावर आणि कमी वेळेत कर्ज उपलब्ध व्हावे याकरिता शासनाद्वारे ही किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे.

Kisan Credit Card Yojana
Kisan Credit Card Yojana

Kisan Credit Card Details

योजनेचे नाव किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Yojana)
योजना सुरू करण्यात आली केंद्र सरकारद्वारे
मुख्य उद्देश शेतकरी बांधवांना कमी व्याजदरात जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देणे.
कर्जाची रक्कम 3लाख रूपये व त्यापेक्षा अधिक
अधिकृत संकेतस्थळhttps://pmkisan.gov.in/
Kisan Credit Card Details

किसान क्रेडिट कार्ड काय आहे?

किसान क्रेडिट कार्ड ही योजना सन 1998 मध्ये शेतकरी बांधवांना अतिरिक्त कर्ज देण्यासाठी तयार करण्यात आली होती. शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी सरकारद्वारे विविध प्रकारच्या सरकारी योजना सुरू करण्यात येतात. त्यातीलच ही एक योजना आहे ज्याने शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने ही किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे.

किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना क्रेडिट कार्ड दिले जातात, या क्रेडिट कार्डचा उपयोग शेतकरी बांधव शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी करू शकतात. किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकरी बांधव 3 लाखांपर्यंत कर्ज मिळवू शकतात. या क्रेडिट कार्ड वरून शेतकरी बांधव कमी व्याज दरात कर्ज घेऊ शकतात. त्याचप्रमाणे हे क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना ATM मधून पैसे काढण्यासाठीही उपयोगी पडेल.

किसान क्रेडिट कार्डची उद्दिष्टे 

किसान क्रेडिट कार्ड या योजनेचे उद्दिष्ट खालील प्रमाणे आहेत – 

  • शेतकर्‍यांच्या सर्वसमावेशक कर्जाच्या गरजांसाठी त्यांच्या लागवडीसाठी आणि पिकांच्या लागवडीसाठी अल्पकालीन कर्जाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी. 
  • शेतकरी बांधवांच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच
  • शेतातील मालमत्तेच्या देखभालीसाठी शेतकरी बांधवांकडे पुरेसे भांडवल ऊपलब्ध रहावे.
  • शेतीशी निगडीत खर्च जसे की: दुग्धजन्य प्राणी, मत्स्यपालन, फुलशेती, फलोत्पादन इत्यादी व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते भांडवल शेतकरी बांधवांना मिळाले पाहिजे.
  • फवारणी, दुग्धजन्य प्राण्यांचा खर्च, फुलांची शेती, फलोत्पादन इत्यादी शेती संबंधित व्यवसाय करण्यासाठी गुंतवणूक क्रेडिटची आवश्यकता व इतर अल्पकालीन कर्जाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी.

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल ती कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत–

  • अर्जदार शेतकरीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 
  • ड्रायव्हिंग लायसन्स.
  • वीज बिल.
  • आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते.
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पॅन कार्ड ई.

किसान क्रेडिट कार्डचे फायदे (Kisan Credit Card Benefits)

किसान क्रेडिट कार्डचे निमनलिखीत फायदे तुम्ही खाली दिलेल्या माहितीनुसार जाणून घेऊ शकता-

  • किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकरी बांधव त्यांच्या शेतीच्या कामांसाठी जर त्यांना आर्थिक मदत लागली तर ते या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सहज कर्ज घेऊ शकतात.
  • या क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेऊन शेतकरी बांधव बी-बियाणे, खते व कीटक नाशके किंवा शेतीसाठी आवश्यक ती उपकरणे खरेदी करू शकतील.
  • किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी बांधव विना तारण 1लाख 60हजार रुपयांचे कर्ज घेऊ शकतात.
  • किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत शेतकरी तीन वर्षामध्ये 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
  • किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणारे शेतकरी बांधव सुद्धा या किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
  • किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ देशातील 14 कोटी शेतकरी बांधवांना मिळणार आहे.
  • किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना कोणत्याही बँकेच्या शाखेतून कर्ज मिळू शकते.
  • शेतकरी बांधव या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ३ वर्षांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 9 % व्याजदराने कर्ज मिळते आणि त्यात भारत सरकार घेतलेल्या कर्जावर 2 % व्याजदर अनुदान देते.
  • शेतकरी बांधव जर वेळेवर कर्जाची परतफेड करू शकले नाही तर त्यांना व्याजदरामध्ये 3 % टक्यांपर्यंत सूट दिली जाते.

किसान क्रेडिट कार्डसाठी पात्रता (Eligibility Criteria)

  • किसान क्रेडिट कार्डसाठी अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 75 वर्षांच्या आत असावे.
  • ज्यांच्याकडे शेतीसाठी मुबलक जमीन आहे असे सर्व शेतकरी या क्रेडिट कार्डसाठी पात्र असतील.
  • ज्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर जमीन आहे ते शेतकरी Kisan Credit Card साठी  अर्ज करू शकतात.
  • अर्जदार शेतकरी हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
  • देशातील छोटे आणि अत्यल्प भूधारक शेतकरी सुद्धा Kisan Credit Card या योजनेसाठी पात्र असतील.
  • मत्स्यव्यवसाय करणारे सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • पट्टेदार आणि भाडेकरू शेतकऱ्यांना सुद्धा या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळू शकतो.

किसान क्रेडिट कार्ड कसे बनवावे? | How To Apply Kisan Credit Card?

Kisan Credit Card तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन काढू शकता त्यासाठी तुम्ही बँकेत गेल्यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अर्ज संबंधित बँक कर्मचाऱ्यांकडून घ्यावा लागेल. अर्ज घेतल्यानंतर अर्जात विचारलेली सर्व आवश्यक ती माहिती त्यात सविस्तरपणे भरावी. अर्ज व्यवस्थितपणे भरून झाल्यावर त्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी आणि त्यावर अर्जदाराची स्वाक्षरी करून अर्ज बँक अधिकाऱ्याकडे जमा करावा.

संबंधित बँकेत अर्ज जमा केल्यानंतर तुम्ही जमा केलेले अर्ज व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्ही या क्रेडिट कार्डसाठी पात्र असाल तर हे Kisan Credit Card काही दिवसांतच तुम्हाला मिळून जाईल.

FAQ’S- Kisan Credit Card Yojana 2024

चला तर जाणून घेऊयात की किसान क्रेडिट कार्ड योजना बद्दल लोकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे-

प्रश्न.०१- किसान क्रेडिट कार्ड किती दिवस वैध राहील?

उत्तर: किसान क्रेडिट कार्ड एकदा काढल्यावर ते क्रेडिट कार्ड ५ वर्षांसाठी वैध राहील.

प्रश्न.०२- किसान क्रेडिट कार्ड चे काय-काय फायदे आहेत?

उत्तर: किसान क्रेडिट कार्डचा वापर करून शेतकरी बांधव शेतीसाठी कमी व्याजदरावर कर्ज घेऊ शकतात तसेच या कार्डच्या माध्यमातून ATM मधून पैसे सुद्धा काढू शकतात.

प्रश्न.०३- किसान क्रेडिट कार्डसाठी कोण-कोण पात्र आहे?

उत्तर: किसान क्रेडिट कार्डसाठी सर्व शेतकरी बांधव / संयुक्त शेती करणारे शेतकरी, भाडेकरू शेतकरी, तोंडी भाडेपट्टेदार आणि शेअर क्रॉपर्स इत्यादी सर्व या कार्डसाठी पात्र असतील.

प्रश्न.०४- किसान क्रेडिट कार्ड ही योजना कोणी सुरू केली?

उत्तर: भारतीय बँक आणि NABARD यांनी मिळून किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू केली आहे.

प्रश्न.०५- किसान क्रेडिट कार्डद्वारे किती कर्ज मिळते?

उत्तर: किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

प्रश्न.०६- कोणती बँक किसान क्रेडिट कार्ड देते?

उत्तर: सर्व भारतीय बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक आणि सहकारी बँकांमध्ये किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला मिळू शकते.