Mahila Bachat Gat Loan: बचत गटातील महिलांसाठी आता कर्ज घेणे सोपे झाले! 2024 मध्ये महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा?

महिला व्यवसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक कडून महिलांसाठी ही महिला समृद्धी कर्ज योजना म्हणजेच Mahila Bachat Gat Loan योजना राबवली जात आहे. राज्यातील महिला पुढे जावे व समाजात आपली एक नवीन ओळख निर्माण करावी यामुळे भारत सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवीत असते. यातीलच एक योजना म्हणजे महिला समृद्धी कर्ज योजना.

राज्यातील महिला स्वतःचा उद्योग सुरू करतील आणि स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारू शकतील या उद्देशाने भारत सरकारने ही बचत गट कर्ज योजना सुरू केलेली आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत की तुम्ही महिला बचत गट कर्ज योजना या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता. तसेच अर्ज करण्यासाठी याची पात्रता काय आहे तसेच अर्ज करण्यासाठी नियम व अटी काय आहेत. या सर्वांची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. (Mahila Bachat Gat Loan)

Mahila Bachat Gat Loan
Mahila Bachat Gat Loan Yojana

महिला समृद्धी कर्ज योजनेचे स्वरूप

  • महिला समृद्धी कर्ज योजना या योजनेद्वारे महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 05 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • या योजनेचा मुख्य हेतू ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे.
  • महिला समृद्धी बचत गट कर्ज योजनेचा व्याजदर हा 4% टक्के आहे.
  • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना ९५% हे राष्ट्रीय महामंडळाकडून आणि ५% कर्ज हे राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते.

Mahila Bachat Gat Loan कर्ज योजनेचे लाभार्थी

Mahila Bachat Gat Loan योजना म्हणजेच बचत गट कर्ज योजना या योजनेचे लाभार्थी फक्त बचत गटातील महिला घेऊ शकतात.

महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा?

महिला समृद्धी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अर्ज करावा लागेल कसा करायचा ते खालील प्रमाणे आपणास स्टेप बाय स्टेप सांगितले आहे-

  • सर्वप्रथम तुम्हाला आपल्या नजिकच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागात जाऊन तुम्हाला महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी लागेल.
  • यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरल्यानंतर तुम्हाला खाली दिलेले आवश्यक ते कागदपत्रे त्या अर्जासोबत त्यांचे छायांकित प्रत जोडावी लागेल.
  • यानंतर भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा.
  • अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोच पावती घ्यावी.
  • अर्ज सादर केल्यानंतर तुमचा हा अर्ज जिल्हास्तरावरील समितीद्वारे तपासला जाईल.
  • यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासले जाईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज मंजूर होईल.
  • तसेच कर्जाची रक्कम हे तुमचे व्यवसायावर अवलंबून असेल.

महिला बचत गट कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ आवश्यक ते कागदपत्रे असणे आवश्यक आहे ती आवश्यक कागदपत्रे तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही ते कागदपत्रे सादर करू शकता.

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • मतदान कार्ड
  • ई-मेल आयडी
  • बचत गट सदस्यत्व आयडी कार्ड
  • बचत गटाचा शिफारस पत्र
  • अर्जदार महीलेकडे बँक खाते असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रहिवासी असल्याचा पुरावा जसे की वीज बिल रेशन कार्ड इत्यादी.
  • आधार कार्ड आणि बँक खाते सोबत लिंक असलेला 10 अंकी मोबाईल नंबर
  • मासिक बैठकीत जमा करण्यात येणाऱ्या बचतीची महिला बचत गटाची मासिक वर्गणीच्या नोंदीची छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक असेल.

महिला समृद्धी कर्ज योजना पात्रता

महिला समृद्धी बचत गट कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ खालील पात्रता असणे आवश्यक आहे –

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांना मिळेल. इतर राज्यातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
  • अर्जदार महिला बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे. तसेच त्या बचत गटाचा स्थापन दिवस म्हणजेच दोन वर्ष चा कालावधी पूर्ण असला पाहिजे तेव्हाच त्या बचत गटातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला अनुसूचित जाती किंवा मागासवर्गीय जातीचे असले पाहिजे.
  • बचत गटातील आणि मागासवर्गीय महिला उद्योजक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला बीपीएल श्रेणीतील म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलाचे वय १८ वर्षापेक्षा जास्त आणि ५० वर्षापेक्षा कमी असावे.
  • वय ५० वर्षापेक्षा अधिक असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये अन्यथा त्या महिला या योजनेपासून वंचित राहतील याची काळजी घ्यावी.
  • ग्रामीण भागातील कर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न 98 हजार रुपये असावे.
  • शहरी भागातील कर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये असावे.

Mahila Bachat Gat Loan अर्ज करताना घ्यावयाची काळजी

  • अर्ज करताना सर्वप्रथम तुम्ही जो अर्ज भरला आहे तो बरोबर आहे का याची खात्री करा.
  • अर्ज हा अचूक आणि स्पष्ट असावा.
  • अर्ज करताना दिलेली वरती सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत व्यवस्थित जोडावी.
  • अर्ज वेळेवर जमा करावा.

महिला समृद्धी कर्ज योजनेचे फायदे

महिला समृद्धी कर्ज योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत-

  • महिला समृद्धी कर्ज योजना या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील गरीब महिलांची आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होईल.
  • या योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यात मदत होईल.
  • महिला बचत गट या योजनेमुळे राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • गरीब कुटुंबातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास ही योजना उपयुक्त ठरेल.
  • या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांचा आर्थिक व सामाजिक विकास होईल.
  • या योजनेचा व्याजदर अत्यंत कमी आहे त्यामुळे महिलांना स्वतःचा एक व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त व्याज दराने कोणाकडूनही कर्ज घ्यावा लागणार नाही.
  • या योजनेअंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी हा 3 वर्षे ठेवण्यात आलेला आहे यामुळे घेतलेले कर्ज फेडण्यास भरपूर वेळ मिळेल.
  • महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.

FAQ’S- Mahila Samruddhi Bachat Gat Loan

चला तर जाणून घेऊयात लोकांद्वारे महिला समृद्धी बचत गट कर्ज योजना या योजनेबद्दल विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे-

प्रश्न ०१- महिला समृद्धी कर्ज योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

उत्तर: महिला समृद्धी बचत गट कर्ज या योजनेचा लाभ फक्त बचत गटातील महिलांना मिळतो.

प्रश्न ०२- महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा?

उत्तर: महिला समृद्धी कर्ज योजना अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपल्या नजिकच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागात जाऊन तुम्हाला महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. आणि तो अर्ज अचूक भरल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो अर्ज संबंधीत कार्यालयात जमा करावा.

प्रश्न ०३- महिला समृद्धी बचत गट कर्ज योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी किती कर्ज मिळते?

उत्तर: महिला समृद्धी बचत गट कर्ज योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी ०५ लाख ते २० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

निष्कर्ष:

महिला समृद्धी कर्ज योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. आम्ही आजच्या या लेखामध्ये Mahila Bachat Gat Loan Yojana या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये सांगितली आहे. आजचा हा लेख कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.