नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आजच्या या लेखामध्ये Milk Business Information म्हणजेच दूध व्यवसाय माहिती जाणून घेणार आहोत ती पण मराठी भाषेमध्ये, तुम्हाला शेतीसोबत जोडधंदा म्हणून हा दूध व्यवसाय करता येईल, त्यामूळे शेतकरी मित्रांनो आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की दूध हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. सकाळ झाली की लोकांना चहा लागते आणि चहा साठी दूध तर पाहिजेच त्यामुळे दुधाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचा शेतीमध्ये वाढणारा अधिक प्रमाणात खर्च, मजुरांची कमतरता, दिवसेंदिवस वाढणारा मजुरांचा रोजगार त्यात नैसर्गिक आपत्ती किंवा वातावरणात बदल इत्यादि कारणांमुळे शेतीमध्ये मिळणारा नफा हा कमी कमी होत चालला आहे. त्यामुळे दूध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून केला जाऊ शकतो.(Milk Business Information)
Milk Business Information: दूध व्यवसाय म्हणजे काय?
दूध व्यवसाय करण्याचे दोन मार्ग आहेत:
- घरोघरी जाऊन दूध विकणे
- दूध डेअरीमध्ये जाऊन दूध विकणे
दूध व्यवसाय म्हणजे तूम्ही शेतीसोबत गायी म्हशी पाळून त्यांचं जे दिवसाचं दूध निघेल त्या दुधाला तूम्ही बाजारात विकून पैसे कमवू शकता हा एकप्रकारे व्यवसायच आहे.किंवा तूम्ही तुमच्या गावातील दूध संकलन केंद्रात सुध्दा दूध देऊन आठवड्याला त्या दुधाचे पैसे घेउ शकता. दूध व्यवसाय म्हणजे फक्त दूध विकणे नाही तूम्ही त्या दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवून जास्त भावात सुध्दा विकु शकता. जसे की: पनीर, खवा, बटर, तूप, इत्यादि अनेक पदार्थ बनवून सुध्दा तूम्ही हा व्यवसाय करु शकता.
दूध व्यवसाय किती प्रकारे केले जाते?
मित्रांनो दुग्ध व्यवसाय विविध प्रकारे केला जातो जसे की: दूध घरोघरी जाऊन विकणे किंवा गावातील दूध डेअरी मध्ये दूध विकणे, दुधापासून अनेक पदार्थ बनवून सुध्दा तूम्ही हा व्यवसाय करु शकता दुधापासून तूम्ही पनीर, दही, तूप, खवा इत्यादी दुग्धजन्य पदार्थ विकून तूम्ही हा व्यवसाय करु शकता.
दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणुक किती करावी लागेल?
जर तुम्हाला गायी आणि म्हशींच्या दुधाचा व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला साधारणतः दूध व्यवसाय करण्यासाठी 50हजार ते 1लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करावी लागेल. तसेच जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ विक्री करून पैसे कमवू इच्छिता तर तुम्हाला दुकान उघडणे दुधाचे पदार्थ बनवून विकण्यापर्यंत अंदाजे एकूण 2 लाख ते 5लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करावी लागेल.
दूध व्यवसायाची नोंदणी कशी करतात?
शेतकरी मित्रांनो जर तुम्ही गायी व म्हशींच्या दुधाचा कमी प्रमाणात व्यवसाय करत आहात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. परंतु जर तुम्ही दुधावर आधारित मोठे व्यवसाय म्हणजेच दूध डेअरी, दुग्धजन्य पदार्थांची कंपनी इत्यादी व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. अन्यथा तुमच्यावर काही विपरीत प्रकार झाला तर कार्यवाही देखील होऊ शकते.
दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या जातीच्या गाई निवडल्या पाहिजे?
दुध व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खालील जातीच्या गायींची निवड करावी लागेल –
- गिरगाय
- डज्जल गाय
- नागोरी गाय
- लाल सिंधी गाय
- निमाडी गाय
- लाल कंधारी गाय
- सहिवाल
- मालवी
- थारपारकर
दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या जातीच्या म्हशी निवडल्या पाहिजे?
दुध व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खालील जातीच्या म्हशींची निवड करावी लागेल –
- जाफराबादी
- मुरा
- सुरती
- मेहसाना
वरील गायी आणि म्हशींच्या जाती दुग्ध व्यवसाय आणि दुधासाठी योग्य असतात.तसेच वरील जातीच्या गाई व म्हशी निवडण्याअगोदर त्या जातीच्या गाई व म्हशी आपल्या वातावरणात सुट होतील अश्याच जातीच्या गाई व म्हशी निवडल्या पाहिजे.
चारा व्यवस्थापन कसे करावे?
दुग्ध व्यवसायामध्ये चाऱ्याचे व्यवस्थापन योग्य ठेवणे गरजेचे असते. उन्हाळी वातावरणात पुरेल एवढा कडबा एकत्रित करून साठून ठेवणे. आपल्या शेतामध्ये गवत, घास, चारा इत्यादी करावा जेणेकरून तुम्हाला या गोष्टीत जास्त पैसे लावावी लागणार नाही आणि गायी व म्हशी यांच्या आहारात सकस व पौष्टिक आहार दिल्याने त्यांच्या दुधाची क्षमता पण वाढते. यामुळे कडबा, मका, हिरवा चारा इत्यादी गोष्टी शेतात नक्की करावी.
दूध व्यवसाय साठी आवश्यक असणारी चाऱ्याची निर्मिती स्वतःच्या शेतीमध्ये केली तर या व्यवसायात खर्च खूप कमी होतो आणि या व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो.
निष्कर्ष
शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखात Milk Business Information दूध व्यवसाय बद्दल माहिती जाणून घेतली आहे. जर तुम्हाला आजचा हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेयर करा जेणकरून त्यांना सुद्धा या माहितीचा उपयोग होईल व ते शेतीसोबत स्वतःचा जोडधंदा सुरू करतील.