Mukhyamantri Solar Pump Yojana: शेतकरी बांधवांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली. सोलर पंप योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांना आपल्या शेतात सिंचन करण्यासाठी राज्य सरकार सोलर पंप उपलब्ध करून देणार आहे.
मुख्यमंत्री सौर पंप योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना नवीन सौर कृषी पंप बसवण्यासाठी अनुदान मिळणार आहे. तसेच जुने डिझेल पंप आणि इलेक्ट्रिक पंप यांना सुद्धा सौर पंप मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. आजच्या या लेखांमध्ये आम्ही आपणास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
मुख्यमंत्री सौर पंप या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांना सरकारद्वारे एक लाख सौर पंप वाटप करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. या योजनेला अटल सौर कृषी पंप योजना या नावाने सुद्धा ओळखले जाते.
सौर कृषी पंप म्हणजे काय?
सौर पंप म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे पंप. पारंपरिक उर्जेवर चालणारे पंप किंवा डीझेल वरती चालणारे पंपाच्या विरुध्द हे सौर पंप सूर्यप्रकाशापासून निर्माण होणाऱ्या विजेच्या ऊर्जेवर काम करतात. सर्वसाधारणपणे सौर ऊर्जेच्या विजेवर चालणारे सौर पंप सोलर पॅनल , डी.सी. उपकरणे तसेच इत्यादी अनेक उपकरणे असतात.
मुख्यमंत्री सौर पंप योजनेचे उद्दिष्टे
या योजनेअंतर्गत सौर पंप खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून 95 टक्के अनुदान मिळते.तसेच राज्यातील अनेक शेतकरी बांधव आपल्या शेतात जुने डिझेल पंप आणि इलेक्ट्रिक पंपांचा वापर अजूनही करत आहेत. इलेक्ट्रिक आणि डिझेल पंपामध्ये खूप खर्च येतो याच उद्देशाने सरकारने सौर पंप योजनेची सुरुवात केली. सौर पंपाचा वापर केल्याने शेतकरी बांधवांना कमीत कमी खर्चात शेतातील कामे होतील.
Mukhyamantri Solar Pump Yojana Details
योजनेचे नाव | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र सरकार |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील शेतकरी बांधव |
योजनेचा उद्देश | राज्यातील शेतकरी बांधवांना सौर कृषी पंप उपलब्ध करून देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन पद्धत |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.mahadiscom.in/ |
मुख्यमंत्री सौर पंप योजना साठी अर्ज कसा करावा?
मुख्यमंत्री सौर पंप योजना अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा-
- सौर पंप योजना अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- यानंतर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर होम पेजवर तुम्हाला यावं लागेल.
- या होम पेजवर तुम्हाला काही पर्याय दिसेल त्यातील तुम्हाला New Consumer हा पर्याय निवडायचा आहे.
- New Consumer हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तरपणे त्यात भरायचे आहे त्यासोबतच तुम्हाला अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
- सर्व माहिती सविस्तरपणे भरल्यानंतर तुम्हाला खाली अर्ज सादर करा किंवा सबमिट करा हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे.
- अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेले कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे-
- अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचा ओळखपत्र
- अर्जदाराची शेतीची कागदपत्रे
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ खालील पात्रता असणे आवश्यक आहे-
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असावा.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना होणार आहे. याची नोंद घ्यावी.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाण्याचा उत्तम स्त्रोत असणे आवश्यक आहे.
- पारंपारिक वीज जोडणी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना सोलर एजी पंपाचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदाराने यादी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा अन्यथा अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
सौर कृषी पंप योजनेचे फायदे
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत-
- सौर कृषी पंप योजनेचा फायदा हा फक्त महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना होणार आहे.
- या योजनेअंतर्गत पाच एकर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकरी बांधवांना 3HP आणि जास्त शेती असलेल्या शेतकरी बांधवांना 5HP पंप मिळतील.
- अटल सौर कृषी पंप योजना अंतर्गत सरकार पहिल्या टप्प्यात 25000 सौर पंपचा वाटप करणार आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात पन्नास हजार पेक्षा जास्त सौर पंपचा वाटप करण्यात येणार आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यात सरकार 25000 सौर पंपाचा वाटप करणार आहे.
- राज्यात जुने डिझेल पंप बदलून नवीन सौर पंपामध्ये त्याचे रूपांतर करण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरणातील प्रदूषणही दूर होईल.
- सौर कृषी पंप योजना अंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांना सिंचनासाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप दिले जाणार आहे.
FAQ’S- Mukhyamantri Solar Pump Yojana
चला तर जाणून घेऊयात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेबद्दल लोकांद्वारे विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे –
प्रश्न.01- सौर कृषी पंप साठी शेतकरी बांधवांना किती रुपये भरायचे आहेत?
उत्तर: सौर कृषी पंप घेण्यासाठी शेतकरी बांधवांना 05 टक्के रक्कम भरायचे आहे तसेच 95 टक्के रक्कम सरकारकडून अनुदान म्हणून मिळणार आहे.
प्रश्न.02- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही कोणत्या राज्यात चालू आहे?
उत्तर: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही सध्या महाराष्ट्र राज्यात चालू आहे.
प्रश्न.03- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शेतकरी बांधव महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात किंवा गावातील सीएससी सेंटर मध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
निष्कर्ष
आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासोबत Mukhyamantri Solar Pump Yojana या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जसे की या योजनेचे फायदे या योजनेसाठी अर्ज पात्रता या योजने साठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतील इत्यादी सर्व गोष्टी आम्ही आपणास सविस्तरपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेबद्दल दिलेली माहिती उपयुक्त वाटली असल्यास तुम्ही हा लेख आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा नक्की शेअर करा. हा लेख शेअर करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या बटन वरती क्लिक करून हा लेख इतरांना शेअर करू शकता.