New Car Details In Marathi: आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की New Car म्हणजेच नवीन गाडी खरेदी करताना आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामूळे आजचा New Car Details हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
New Car: जर तुम्ही पण नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टीची काळजी घ्यावी लागेल यामुळे तुमच्यावर पश्चात्तापाची वेळ येणार नाही. नवीन कार खरेदी करताना अनेकजण काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेत नाहीत त्यामुळे त्यांना नंतर भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे आज आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही नवीन कार खरेदी करताना लक्षात ठेवून नवीन गाडी खरेदी करायला पाहिजे.
आपली स्वतःची नवीन गाडी (New Car) घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक कार उपलब्ध आहेत. कारची निवड करण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे एकदा सर्व मॉडेलची टेस्ट ड्राईव करुन पहा.
New Car Details In Marathi
नविन कार खरेदी करण्यापूर्वी खालील गोष्टीची माहिती तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे –
New Car Budget
नवीन गाडी खरेदी करताना आधी आपल्याला बजेट ठरवावे लागते. यानंतर तुमच्या बजेटनुसार तुम्हाला जी Car आवडत आहे त्या कारची निवड करा. नवीन कार खरेदी केल्यानंतर इंधन, नोंदणी, देखभाल, विमा, EMI चा खर्च हा स्वतंत्रपणे जोडला जातो. त्यामुळे नवीन गाडी खरेदी करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
नवीन गाडी घेताना कसला विचार करावा?
मित्रांनो ज्यावेळी तुम्ही नविन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तेव्हा त्या कारचे बजेट, कार मॉडेल आणि भविष्यातील त्या गाडीच्या खर्चाचा विचार करूनच नवीन कार घेण्याचा विचार करा. तुम्ही जर कर्जावर कार खरेदी करत असाल तर ती गाडी घेताना किती व्याज लागेल आणि एखाद्यावेळी EMI वेळेवर भरण्यात आला नाही तर त्यामूळे किती पैसे जास्त द्यावे लागतील इत्यादी सर्व गोष्टींची माहिती नक्की जाणून घ्या.
मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतःसाठी नवीन गाडी निवडता तेव्हा निश्चितपणे त्या कार सोबत इतर कंपन्यांच्या कार मॉडेल्सची देखील तुलना कररून नक्की पहा. तसेच सर्व पर्याय निवडण्यासाठी तुम्ही मायलेज, जी कार खरेदी करत आहात त्या कारची वैशिष्ट्ये, इंजिन क्षमता इत्यादींची तुलना करुन नक्की पहा.
New Car खरेदी करताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये-
नविन गाडी खरेदी करण्याच्या अती उत्साहात पुढील गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका -आगाऊ ईएमआय, सेवा कर, विमा, नोंदणी शुल्क, वितरण शुल्क आणि इतर करांचा समावेश असलेल्या इतर खर्चांकडे दुर्लक्ष करू नका त्या सर्वांची शांतपणे सविस्तर माहिती जाणून घ्या.
कार खरेदी करण्यापूर्वी कारची माहिती ऑनलाइन तपासणे
मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही जी कार खरेदी करण्याचा विचार करत आहे त्या कारची माहिती ऑनलाईन Search करून जाणून घ्या, Online Search केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील कार खरेदी करण्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज मिळू शकतात. एवढेच नाही तर तुम्ही ऑनलाइन निवडलेल्या कारसोबत इतर कारची तुलना देखील करू शकता.
भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी (Maruti Suzuki), ह्युंदाई (Hundai), टाटा (Tata ), महिंद्रा (Mahindra), फोर्ड (Ford), किया (KIA), टोयोटा (Toyota), होंडा (Honda), निसान (Nisan), रेनॉल्टसह इत्यादी अनेक कार कंपन्या आहेत त्यामुळे तुम्ही नविन कार खरेदी करण्यापूर्वी तुमच्या आवडीची कंपनी काळजीपूर्वक निवडा त्यानंतरच कार खरेदी करा.
कुटुंबातील सदस्य संख्येनुसार कार निवडणे
मित्रांनो तुमच्या आवडीची नवीन कार निवडण्याच्या वेळी तुम्ही एकदा नक्की खात्री करून घेतली पाहिजे की ती कार तुमच्या कुटुंबासाठी योग्य आहे का, ती कार खरेदी केल्यानंतर कुटुबातील सर्व व्यक्ती सोयीस्कर बसतील का. त्यामूळे कुटूंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार योग्य कार निवडा. त्यामूळे नंतर तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. जर तुमचे कुटुंब लहान असल्यास हॅचबॅक कार ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. तर दुसरीकडे, जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या 5 पेक्षा अधिक असेल, तर तुम्ही 7 सीटर कारची निवड करु शकता ज्यामध्ये तुम्ही एकावेळी संपूर्ण कुटुंबासह आनंद घेऊ शकता.
Car Maintenance: कारच्या मेंटेनन्स खर्चाबद्दल माहिती जाणून घेणे –
नवीन कार खरेदी केल्यानंतर आपल्याला त्या कारचा मेंटेनन्स खर्च आणि मायलेज खर्च यांचा भार तुम्हाला उचलावा लागतो, त्यामुळे तुमच्या आवडीची कार निवडताना त्या नवीन कारचे मायलेज आणि मेन्टेनन्स खर्च नक्की समजून घ्या त्यामूळे तुम्हाला नंतर गाडीसाठी जास्त खर्च कमी होण्यास मदत होईल, तसेच डिझेल कारचा मेंटेनन्स पेट्रोल कारपेक्षा अधिक असतो त्यामुळे नवीन कार खरेदी करताना त्या कारची मेंटेनन्स आणि मायलेजची पुरेपूर माहिती घ्यावी त्यानंतरच योग्य ती परवडेल अशी कार निवडावी.
निष्कर्ष:
आजच्या या लेखामध्ये आम्ही New Car Details In Marathi नवीन कार खरेदी करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती मराठी भाषेमध्ये आपणास सविस्तरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन कार खरेदी करताना कोणती कार निवडली पाहिजे, कोणती कार आपल्या कुटुंबासाठी सोयीस्कर असेल कारची किंमत नुसार कोणती कार आपल्याला परवडेल इत्यादि सर्व गोष्टी आजच्या या लेखामध्ये समजुन सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
जर तुम्हाला नवीन कार खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती आवडली असल्यास तुम्ही हि माहिती आपल्या संपर्कातील व्यक्तींशी नक्की शेअर करा.