PM Suryodaya Yojana: अयोध्येतील भगवान राम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी एक नवीन योजनेची घोषणा केली आहे. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री सूर्योदय योजना आहे.
आजच्या या लेखामध्ये आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींद्वारे ज्या योजनेची घोषणा केलेली आहे त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. प्रधानमंत्री सूर्योदय सोलर रूफ टॉप योजना या योजनेसाठी तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे तुम्ही यासाठी खरंच पात्र आहात की नाही या सर्व गोष्टींचा आजच्या या लेखात संपूर्ण सविस्तरपणे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्यामुळे आजचा पर्यंत नक्की वाचा. (Suryoday Yojana 2024)
प्रधानमंत्री सूर्योदय योजना म्हणजे काय?
पीएम सूर्योदय योजना ही योजना केंद्र सरकारची एक नवीन योजना आहे. पीएम सूर्योदय योजना ही भारतातील गरीब घरांमध्ये सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देते. या योजनेची घोषणा 22 जानेवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथे भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर प्रसार माध्यमांद्वारे या योजनेची घोषणा करण्यात आली.
भारताच्या 1 कोटींपेक्षा अधिक घरांच्या छतांवरती सोलर रुफ टॉप पॅनल बसवणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या वीज बिलामध्ये होणारा खर्च कमी होईल तसेच भारताला ऊर्जा आत्मनिर्भर बनवण्यास मदत होईल.
PM Suryodaya Yojana Details
योजनेचे नाव | पंतप्रधान सूर्योदय योजना |
योजना कोणी सुरू केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
योजना कधी सुरू करण्यात आली | 22 जानेवारी 2024 |
योजनेचे उद्देश | भारताच्या 1 कोटींपेक्षा अधिक घरांच्या छतांवरती सोलर रुफ टॉप पॅनल बसवणे |
लाभार्थी | भारतीय नागरिक |
वर्ष | 2024 |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | https://solarrooftop.gov.in/ |
पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र पीएम सूर्योदय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करायचा आहे-
- पंतप्रधान सूर्योदय योजना या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास सर्वप्रथम तुम्हाला यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- अधिकृत संकेतस्थळाची लिंक तुम्हाला वरती दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करा.
- यानंतर त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल.
- होमपेज वरती तुम्हाला Apply असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
- यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडे त्या अर्जात विचारलेले संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे.
- अर्जामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे जिल्हा निवडायचा आहे. तसेच तुम्हाला त्या अर्जामध्ये विचारलेले इतर माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे.
- अर्जामध्ये तुम्हाला वीज बिलाचा क्रमांक सुद्धा द्यायचा आहे. याची नोंद घ्यावी.
- वीज बिलाचा तपशील भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या छताचे क्षेत्रफळ तिथे टाकायचे आहे.
- छताचे क्षेत्रफळ भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताच्या क्षेत्रफळाच्या आकाराचे एवढे सोलर पॅनल निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला अनुदानाची रक्कम बँकेमध्ये घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती तिथे भरायची आहे.
- यानंतर तुम्हाला मागितलेली आवश्यक कागदपत्रे तिथे अपलोड करायचे आहे.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्ही एकदा अर्ज बरोबर भरला आहे की नाही ते एकदा नक्की तपासा आणि अर्ज तपासल्यानंतर हा अर्ज सबमिट बटन वरती क्लिक करून अर्ज सादर करा.
- जर या योजनेसाठी पात्र असाल तर अनुदानाची जी रक्कम असेल ती तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल.
- अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री सूर्योदय योजना महाराष्ट्र या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
पंतप्रधान सूर्योदय योजना या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुमच्याजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे-
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- विज बिल
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी वरती दिलेले कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
जर तुम्हाला सुद्धा प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ खालील पात्रता निकष असणे आवश्यक आहे-
- पंतप्रधान सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी उमेदवार हे भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या नागरीकांना होणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख ते दीड लाखापेक्षा जास्त नसावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे सर्व आवश्यक ती कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- अनुदानाची रक्कम बँकेमध्ये घेण्यासाठी अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदाराकडे खाली दिलेले सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- प्रधानमंत्री रूफ टॉप सोलर योजना अर्ज करण्यासाठी त्यादी पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजना महाराष्ट्र योजनेचे फायदे
प्रधानमंत्री सूर्योदय योजना महाराष्ट्र या योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत –
- पंतप्रधान सूर्योदय योजना या योजनेअंतर्गत भारतातील गरीब घरांमध्ये सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान मिळणार आहे.
- प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजनेचा लाभ भारतातील नागरिकांना मिळणार आहे.
- या योजनेचा लाभ मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना दिला जाणार आहे.
- पीएम सूर्योदय योजना ही भारतातील गरीब घरांमध्ये सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देते.
- प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या वीज बिलामध्ये होणारा खर्च हा कमी होईल.
- सोलर पॅनल मुळे भारताला ऊर्जा आत्मनिर्भर बनवण्यास मदत होईल.
- या योजनेच्या माध्यमातून भारताच्या 1 कोटींपेक्षा अधिक घरांच्या छतांवरती सोलर रुफ टॉप पॅनल बसविण्यात येणार आहे.
- सोलर पॅनलची ऊर्जा ही पर्यावरणासाठी एक अनुकूल ऊर्जा स्त्रोत आहे यामुळे ही योजना एक पर्यावरण संरक्षणासाठी सुद्धा योगदान देते.
निष्कर्ष
आजच्या या लेखांमध्ये आम्ही PM Suryodaya Yojana (प्रधानमंत्री सूर्योदय योजना महाराष्ट्र या योजनेची संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या योजनेसाठी तुम्ही कसा अर्ज करू शकता या योजनेसाठी तुमच्याकडे कोण कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे इत्यादी माहिती आम्ही आजच्या या लेखामार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
जर तुम्हाला आमच्याद्वारे प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजनेबद्दल दिलेली माहिती उपयुक्त वाटली असल्यास हा लेख खाली दिलेल्या शेअर बटन वरती क्लिक करून इतरांना देखील शेअर करा.