Pradhanmantri Svanidhi Yojana: सरकारद्वारे मिळणार छोट्या दुकानदारांसाठी विनातरण कर्ज

Pradhanmantri Svanidhi Yojana: आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की प्रधानमंत्री स्वनिधी योजना काय आहे आणि या योजनेचे लाभ कोणाला मिळणार आहेत तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात इत्यादी माहिती आपण आजच्या या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

स्वनिधी योजना काय आहे? (Pradhanmantri Svanidhi Yojana)

PM Svanidhi Yojana ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. स्वानिधी योजनेंतर्गत रस्त्यावर किरकोळ विक्री करणाऱ्या आणि फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायानुरूप आर्थिक मदत म्हणुन त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी लाभार्थीला कोणतेही तारण ठेवण्याची गरज नसते.

कोरोना महामारीच्या काळात सरकारद्वारे आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत Svanidhi Yojana ची सुरुवात करण्यात आली आहे.Svanidhi Yojana या योजनेंतर्गत सरकारद्वारे रोडच्या कडेला व्यापार करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना कोणत्याही तारणाशिवाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते. PM Svanidhi Yojana ही योजना जून 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सुरू करण्यात आली. शहरातील / गावातील मजुरी करणारे मजूर आणि छोटी मोठी नोकरी करणारे नोकरदार यांनी नोकरी गमावल्यामुळे त्यांचे कोरोना काळात फार हाल झालेत त्यामुळे अशा लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा याकरिता स्वनिधी कर्ज योजना या योजनेद्वारे कर्ज उपलब्ध करू दिले जाते.

pradhanmantri svanidhi yojana
pradhanmantri svanidhi yojana

Pradhanmantri Svanidhi Yojana Details

योजनेचे नावPM Svanidhi Yojana (प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधि योजना)
योजना कोणद्वारे सुरू करण्यात आलीकेंद्र सरकार
योजना सुरु झाल्याचे वर्ष2020
योजनेचे लाभार्थीरस्त्यावर किरकोळ विक्री करणारे हातगाडीवाले आणि फेरीवाले दुकानदार
कर्ज किती मिळेल₹10 हजार पर्यंत विनातारण कर्ज मिळेल.
अधिकृत संकेतस्थळ https://www.pmsvanidhi.mohua.gov.in/
Pradhanmantri Svanidhi Yojana Details

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे मुख्य उद्दिष्टे

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत –

  • कोरोना व्हायरस या आजारामुळे आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती, लोक काम करण्यासाठी घराबाहेर पडू शकले नाहीत आणि छोट्या छोट्या व्यवसायिकांची स्थिती दयनीय झाली. अशा परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करणाऱ्यांना, फळे व भाज्या विक्रेत्यांना तसेच अन्य छोट्या उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्ट्रीट व्हेंडर सेल्फ-रिलायंट फंड म्हणजेच स्वनिधी ही योजना सुरू केली.
  • स्वनिधी या योजनेअंतर्गत या लोकांना पुन्हा काम सुरु करण्यास आर्थिक मदत मिळणार आहे. काम पुन्हा सुरु करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारकडून यांना १०,००० रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.
  • या लोकांना स्वावलंबी आणि सशक्त बनविणे म्हणजे पीएम स्वनिधी योजना योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. जेणेकरुन त्यांना पुन्हा आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.
  • केंद्र सरकारने या सर्व बाबींचा विचार करून पंतप्रधान स्वनिधी योजनेची सुरुवात केली आहे.

स्वनीधी योजनेअंतर्गत प्राप्त होणारी सबसिडी

Pradhanmantri Svanidhi Yojana या योजनेच्या माध्यमातून देशातील फेरीवाल्यांना ₹10 हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. स्वनिधी योजना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आली होती. जे नागरिक रस्त्यांवर छोट्या-मोठ्या सामानाची विक्री करून आपला उद्योग सुरू करण्यास इच्छुक असतील अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 7% व्याज दराने सबसिडी दिली जाईल. सबसिडीची रक्कम कर्जदार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक तीन महिन्यांनी जमा केली जाईल.

स्वनिधी योजनेअंतर्गत प्राप्त होणारी सबसिडी –

Pradhanmantri Svanidhi Yojana योजनेच्या माध्यमातून देशातील फेरीवाल्यांना केंद्र सरकारद्वारे ₹10 हजार पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. स्वनिधी योजना कोरोना महामारीच्या काळात सुरू करण्यात आली आहे. जे नागरिक रस्त्यांवर छोट्या-मोठ्या सामानाची विक्री करून स्वतःचा उद्योग सुरू करण्यास इच्छुक असतील अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 7% व्याज दराने सबसिडी दिली जाईल. सबसिडीची रक्कम कर्जदार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक तीन महिन्यांनी जमा करण्यात येइल.

प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधि योजनेसाठी पात्रता (Eligibility Criteria)

  • प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधि योजनेसाठी ते रस्त्यावरील विक्रेते पात्र असतील ज्यांच्याकडे व्हेंडिंग प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र आहेत.
  • सर्वेक्षणात अधोरेखित झालेले विक्रेते किंवा त्यांचा विक्रीचा / ओळखीचा पुरावा अजूनही जारी करण्यात आलेला नाही. अशा सर्व विक्रेत्यांसाठी अंतिम व्हेंडिंग प्रमाणपत्र तयार केले जातील.
  • शहरी किंवा स्थानिक संस्थेच्या भौगोलिक कक्षेत विक्री करणारे विक्रेते आणि यासाठी त्यांना ULB किंवा TVC द्वारे शिफारस पत्र जारी केले आहे अशा विक्रत्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

स्वनिधी योजनेचे पात्र लाभार्थी विक्रेते कोण आहेत?

  • न्हाहीची दुकाने (कटिंग दुकान)
  • सुपरीची दुकाने
  • मोची
  • चहा टपरी
  • पानटपरी
  • लॉन्ड्री (धोबी)
  • भाजी विक्रेते
  • फळ विक्रेते
  • रेडी टू इट स्ट्रीट फूड
  • ब्रेड, पकोडे आणि अंडी विकणारे विक्रेते
  • कपडे विकणारे ( फेरीवाले )
  • पुस्तके/स्टेशनरी विक्रेते
  • कारागीर उत्पादने इत्यादि.

स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेले निमलिखित कागदपत्रे आवश्यक आहे-

  1. अर्जदाराचे आधार कार्ड (Aadhar Card)
  2. मतदार ओळखपत्र (Voter ID Card)
  3. बँक खाते पासबुक (Bank Passbook)
  4. मोबाईल नंबर (Mobile Number)
  5. पासपोर्ट आकाराचा फोटो (Passport Size Photo)

प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत कोणत्या शाखा कर्ज देऊ शकते?

  • बचत गट बँका
  • सहकारी बँक
  • स्मॉल फायनान्स बँक
  • शेड्यूल्ड कमर्शियल बँक
  • प्रादेशिक ग्रामीण बँक
  • नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या
  • मायक्रोफायनान्स संस्था
  • महिला निधी इत्यादी.

स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

पीएम स्वानिधी योजना अर्ज करण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री स्वानिधीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://pmsvanidhi.mohua.gov.in/ नोंदणी करू शकता.

याव्यतिरिक्त तूम्ही प्रधानमंत्री स्वानिधी मोबाइल ॲप च्या साहाय्याने तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे फायदे (Scheme Benefits)

  • Pradhanmantri Svanidhi Yojana या योजनेंतर्गत देशातील 50 लाखाहून अधिक लोकांना या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ मिळणार आहे.
  • केंद्र सरकारद्वारे फेरीवाल्यांना व छोट्या व्यावसायिकांना प्रधानमंत्री स्वानिधी योजनेचा लाभ मिळतो.
  • रस्त्याच्या कडेला विक्री करणारे शहरी आणि ग्रामीण भागात राहणारे लोक स्ट्रीट वेंडर सेल्फ – रिलायंट फंड योजनेअंतर्गत लाभार्थी मानले जातील.
  • पिएम स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील फुटपाथ विक्रेते ₹10 हजार पर्यंत भांडवली कर्ज घेऊ शकतात.
  • स्वनिधी योजना या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतले असेल आणि त्या कर्जाची रक्कम वेळेपूर्वी परत केली आहे तर केंद्र सरकार यांना 7% टक्के वार्षिक व्याज त्यांच्या बँक खात्यात अनुदान म्हणून जमा करते.
  • या योजनेमुळे कोरोना संकटाच्या काळात बंद पडलेले व्यवसाय सुधारण्यासाठी ही योजना भरपूर पुढे जाईल आणि सामान्य नागरीकांचे व्यवसाय नव्याने सुरू होतील आणि स्वावलंबी भारत मोहिमेला वेग येईल.
  • Pradhanmantri Svanidhi Yojana ही तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून तसेच क्षमता वाढविण्याबरोबर कोरोना महामारीच्या संकटातील नागरीकांना पंतप्रधान स्वनिधी योजना हि व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आणि व्यवसाय नूतनीकरणासाठी खूप मोलाची ठरणार आहे.

निष्कर्ष

आजच्या या लेखामध्ये आम्ही Pradhanmantri Svanidhi Yojana या योजनेबद्दल संपुर्ण माहिती सविस्तरपणे आपणास समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे तसेच या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय असणार आहे तसेच या योजनेसाठी अर्ज करताना कागदपत्रे कोणती लागतात इत्यादी संपुर्ण आवश्यक ते मुद्दे सविस्तरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.