प्रधानमंत्री वय वंदना योजना: 60 वर्षावरील नागरिकांसाठी मोठी बातमी! सरकार देत आहे 15 लाख रुपयांपर्यंत पेन्शन.(Pradhanmantri Vaya Vanadana Yojana)

प्रधानमंत्री वय वंदना योजना ही केंद्र सरकारद्वारे खास साठ वर्षावरील नागरिकांसाठी राबवली जात आहे. वय वंदना योजनेची सुरुवात 2017 मध्ये करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत साठ वर्षावरील नागरिकांना पेन्शन दिले जात आहे. यासोबतच त्यांना दहा वर्षापर्यंत 8% टक्के व्याज सोबत कर्ज सुद्धा दिले जाते. आजच्या या लेखात आम्ही वय वंदना योजने संबंधित संपूर्ण माहिती आपणास सविस्तरपणे खाली दिलेली आहे त्यामुळे हा आजचा जो लेख आहे त्याला शेवटपर्यंत नक्की वाचा.

प्रधानमंत्री वय वंदना योजना
प्रधानमंत्री वय वंदना योजना

Pradhanmantri Vaya Vanadana Yojana Details

योजना नावप्रधानमंत्री वय वंदना योजना (pm vaya vandana yojana)
योजनेची सुरुवातभारत सरकार द्वारे
योजना कधी सुरू झाली2017 मध्ये
योजनेचे लाभ60 वर्षांवरील नागरिकांना दरमहा पेंशन
अर्ज पद्धतऑनलाइन / ऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळhttps://licindia.in/
Pradhanmantri Vaya Vanadana Yojana Details

वय वंदना योजना काय आहे?

वय वंदना योजना ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना सरकार मार्फत पेन्शन मिळते. ही पेन्शन तुमच्या पॉलीसीच्या आधारे निश्चित करण्यात येते. तसेच जर एखाद्या व्यक्तीची 10 वर्षाची पॉलिसी असेल तर त्या व्यक्तीला 8% व्याजदराने कर्ज देखील मिळते.

प्रधानमंत्री वय वंदना योजना अर्ज प्रक्रिया

वय वंदना योजना साठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता –

प्रधानमंत्री वय वंदना योजना ऑनलाईन पद्धत-

PM Vaya Vandana Yojana ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –

  • पीएम वय वंदना योजना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. अधिकृत संकेतस्थळाची लिंक तुम्हाला वरती दिलेली आहे.
  • अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्या होम पेज वरती या योजनेची लिंक तुम्हाला तेथे मिळून जाईल.
  • यानंतर तुमच्यासमोर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी एक अर्ज दिसेल. तेथे तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याअगोदर सर्वप्रथम तुम्हाला तेथे दिलेली सर्व माहिती लक्षपूर्वक वाचायची आहे. त्यानंतरच अर्ज भरायचा आहे.
  • यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक ती माहिती अचूक भरावी.
  • अर्ज भरल्यानंतर त्यासोबत तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे सुध्दा तेथे Upload करावी लागतील.
  • या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते सर्व कागदपत्रे खाली दिलेले आहे त्यानुसार तुम्ही ते कागदपत्रे तिथे अपलोड करु शकता.
  • यानंतर अर्ज एकदा तपसावा की काही माहिती भरायची राहिली की नाही सर्व माहिती बरोबर असल्यास अर्ज Submit बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करुन द्यायचा आहे.
  • अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने प्रधानमंत्री वय वंदना योजना साठी अर्ज करू शकता.

प्रधानमंत्री वय वंदना योजना ऑफलाईन पध्दत –

PM Vaya Vandana Yojana ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –

  • पीएम वय वंदना योजना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळील LIC च्या शाखेत भेट द्यावी लागेल.
  • LIC कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला तेथील अधिकाऱ्याशी संपर्क साधावा लागेल.
  • कार्यालयातील कर्मचारीला तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या संबधित माहिती विचारा. तेथील कर्मचारी तुम्हाला या योजनेसंबंधीत संपुर्ण माहिती समजावून सांगतील.
  • यानंतर तूम्ही त्याना सांगू शकता की या योजनेसाठी अर्ज करायचा आहे की नाही.
  • जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास ते कर्मचारी तुम्हाला अर्ज करण्यासाठी पुढील पद्धत सांगतील. त्यानुसार तुम्ही अर्ज करु शकता.
  • अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने प्रधानमंत्री वय वंदना योजना साठी अर्ज करू शकता.

पीएम वय वंदना योजना अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-

वय वंदना योजना अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता लागेल-

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वय प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • 10 अंकी मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • इत्यादि कागदपत्रे अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत.

प्रधानमंत्री वय वंदना योजना पात्रता

प्रधानमंत्री वय वंदना योजना अर्ज करण्यासाठी तुमच्याजवळ खालील पात्रता आवश्यक आहे-

  • पीएम वाय वंदना योजना अर्ज करण्यासाठी उमेदवार हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी उमेदवाराचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत तयार केलेल्या पॉलिसीचा कालावधी हा 10 वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेचे फायदे

प्रधानमंत्री वय वंदना योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत –

  • प्रधानमंत्री वय वंदना योजना ही खास करून 60 वर्षे व 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी सुरू केलेली योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना 9250 रूपये मासिक पेंशन देण्यात येते.
  • या योजने अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचे जे काही पैसे आहेत ते त्याच्या नॉमीनी सदस्याला मिळते.
  • ही योजना 60 वर्ष वयोगटातील लोकांसाठी खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे

FAQ’S- Pradhanmantri Vaya Vandana Yojana

चला तर जाणून घेऊयात प्रधानमंत्री वय वंदना योजना बद्दल लोकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे –

प्रश्न.01- पिएम वय वंदना योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

उत्तर: पिएम वय वंदना योजनेचा मुख्य उद्देश वृद्ध नागरीकांना आर्थिक मदत करणे आहे.

प्रश्न.02- प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा कालावधी किती दिवसांचा आहे?

उत्तर: प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा कालावधी हा 10 वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे.

प्रश्न.03- वय वंदना योजना कोणी सुरू केली?

उत्तर: ही योजना केंद्र सरकार मार्फत सूरू करण्यात आली आहे.

प्रश्न.04- प्रधानमंत्री वय वंदना योजना साठी अर्ज कसा करायचा?

उत्तर: या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.अर्याज करण्याची संपुर्ण माहिती आम्ही या लेखामध्ये सविस्तरपणे सांगितली आहे.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आम्ही प्रधानमंत्री वय वंदना योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे तूम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो इत्यादी सर्व माहिती आजच्या या लेखात सांगितली आहे. जर तुम्हाला आमच्याद्वारे Pradhanmantri Vaya Vandana Yojana बद्दल दिलेली माहिती उपयुक्त वाटल्यास हि माहिती इतरांना देखील शेअर करा.