Sarkari Yojana Yadi Maharashtra: सरकारी योजना यादी महाराष्ट्र 2024

नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या या लेखामध्ये महाराष्ट्र सरकारी योजना 2024 यादी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Sarkari Yojana Yadi Maharashtra मध्ये कोणकोणत्या योजना राबविल्या जातात या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, या विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन राज्यातील गरीब नागरिकांसाठी तसेच राज्यातील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध स्तरांवरील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या आरोग्य योजना तसेच आर्थिक सहाय्य, ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवून त्या महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रवृत्त करण्यात येते.

महाराष्ट्र सरकारी योजना 2024 Overview

विषयमहाराष्ट्र सरकारी योजना लिस्ट 2024
योजना कोनाव्दारे सुरु करण्यात आली?महाराष्ट्र शासन (Maharashtra Government)
राज्यमहाराष्ट्र (Maharashtra)
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्याचे नागरिक (Maharashtra State Citizen)
योजनेचा उद्देशआपल्या राज्यातील जनतेसाठी विविध लोकउपयोगी आणि महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी करून सर्व नागरिकांचे हित साधने हा मुख्य उद्देश आहे.
विभागसरकारी योजना शासनच्या विविध विभागांतर्गत राबविल्या जात असतात
श्रेणीया योजना अनेक प्रकारच्या श्रेणीत मोडतात उदाहरणार्थ : विद्यार्थी योजना, आरोग्य योजना, विमा योजना, पेन्शन योजना इत्यादी.
महाराष्ट्र सरकारी योजना 2024 Overview
Sarkari Yojana Yadi Maharashtra
Sarkari Yojana Yadi Maharashtra

महाराष्ट्र सरकारी योजना यादी – सविस्तर माहिती

महाराष्ट्र राज्यातील गरीब व वंचित मागासवर्गीय नागरिकांना घरे बांधण्यासाठी सरकार घरकुल योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते, तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारद्वारे अनेक प्रकारच्या आरोग्य योजना राबविण्यात येतात. राज्यातील उद्योग व्यवसायांना प्रगतशील करण्यासाठी सरकारद्वारे विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात. राज्यातील गरीब आणि वंचित वृध्द नागरिकांना या योजनांच्या माध्यमातून आर्थिक आधार देवून त्या वृद्ध नागरिकांना स्वावलंबी बनविण्याचा सरकार मदत करते. 

Sarkari Yojana Yadi Maharashtra

महाराष्ट्र सरकारी योजना यादी 2024: चला बघुयात महाराष्ट्र सरकारद्वारे कोणकोणत्या योजना राबविल्या जातात याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात-

माझी कन्या-भाग्यश्री योजना (Mazi Kanya Bhagyashri Yojana)

महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आणि सेवा राबवत असते, याच धोरणाला अनुसरून राज्यातील मुलींसाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना ची सुरुवात केली आहे. Mazi Kanya Bhagyashri Yojana या योजनेच्या माध्यामतून महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण तसेच यांचे आरोग्य यांच्या मध्ये सुधारणा करणे, व मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे.

समाजामध्ये मुलींच्या जन्माविषयीचे नकारात्मक विचारांमध्ये सुधारणा करून मुलींच्या विषयी लोकांच्या मनात एकप्रकारे सकारात्मक विचार निर्माण करणे तसेच बाल विवाह रोखणे आणि मुलांइतकाच मुलींचा जन्म दर वाढविणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यात सुकन्या योजनेचा लाभ कायम ठेऊन माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित हि योजना दिनांक 01 ऑगस्ट 2017 पासून सुरु करण्यात आली.

स्वाधार योजना (Swadhar Yojana)

शिक्षण क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे बहुतांश वेळा काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये भरपूर अडचणी निर्माण होतात. त्यामुळेया विद्यार्थ्यांची अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करता यावे. 

श्रावण बाळ योजना महाराष्ट्र (shravan bal yojana)

महाराज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरील जेष्ठ नागरीकांसाठी त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे हि श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे, महाराष्ट्र सरकार नेहमीच राज्याच्या नागरिकांसाठी कल्याणकारी आणि लोक उपयोगी योजना वेळोवेळी राबवित असतात. या योजनेव्दारे समाजातील कमी उत्पन्न असलेले नागरीक, वंचित नागरिक, आर्थिक दुर्बल घटक त्याचबरोर निराधार जेष्ठ नागरिक आणि सामान्य गरीब नागरिक यांचे जीवनमान सुधारणे व त्यांना आर्थिक सुरक्षा देणे तसेच त्यांच्यासाठी आरोग्यविषयक सुविधा निर्माण करून देणे आणि त्यांना समाजात मानाने जीवन जगण्यास पाठबळ देणे हा उद्देश महाराष्ट्र शासनाचा असतो.

श्रावण बाळ योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹600/- रुपये वृद्धापकाळ निवृत्ती वेतन देत आहे. या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केली आहे.

रमाई आवास योजना (Ramai Awas Yojana)

महाराष्ट्र सरकारव्दारे जनकल्याणासाठी आणि राज्यातील आर्थिक दुर्बल, वंचित आणि गरीब सामान्य नागरिकांसाठी लोक उपयोगी व कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात, रमाई घरकुल योजना हि एक अत्यंत महत्वाची आणि महत्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना आहे, देशामध्ये मोठयाप्रमाणात नागरिक  दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात तसेच हे नागरिक कमी उत्पन्न गटातील नागरीक म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंची कमतरता त्याचबरोबर कमी उत्पन्न असल्यामुळे त्यांच्याकडे निवाऱ्याची सुद्धा व्यवस्था नसते.

उत्पन्न कमी असल्यामुळे हे नागरिक स्वतःची जागा घेऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीत या नागरिकांना कच्चे मकान किंवा झोपडी अशा प्रकारची निवाऱ्याची व्यवस्था करावी लागते. या काही कारणांसाठी महाराष्ट्र सरकारने रमाई आवास हि योजना सुरु केली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Solar Pump Yojana)

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबवीत असते, याच धोरणांचा अवलंब करून सौर कृषी पंप योजना, शेततळे योजना यांसारख्या योजना शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या काही योजनांची अंमलबजावणी करत आहे.

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी solar pump yojana ही योजना जाहीर केली आहे. सौर उर्जा ही एक उर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे. भारत सारख्या देशामध्ये 08 महिने कडक उन असते आणि बाकी पावसाळा आणि हिवाळा, त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या निरंतर सौर उर्जेच्या स्त्रोताचा परिपुर्ण वापर व सौर कृषी पंपच्या माध्यमातून सौर उर्जा वापरून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायद्याची ठरू शकते.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) 

राज्य सरकार राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने अनेक प्रकारच्या योजना राबवून तरुणांना आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न करत राहते. राज्यातील तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा उद्योगधंदे , व्यवसाय इत्यादी क्षेत्रांकडे यावे व स्वतःचा उद्योग धंदा उभा करून स्वावलंबी व्हावे याचबरोबर स्वतःचे उद्योग उभे करून राज्यात रोजगार निर्माण करावा या उद्देशाने शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राज्यातील नागरिकांसाठी सुरु केली आहे.

मागेल त्याला शेततळे योजना (Shettale Yojana)

शेतकऱ्यांना शेती करतांना नेहमी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते, या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि पिकांना वेळेवर पाणी न दिल्याने शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होते. शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करून आणि सततच्या पाणी टंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी शेततळे हे अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे ठरले जाते. राज्यातील शेतकरी पावसावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवण्यासाठी तसेच संरक्षित व स्थायी सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला शेततळे योजना सुरु केली आहे.

महास्वयम् रोजगार योजना (Mahaswayam Rojgar Yojana)

राज्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार असलेले तरुणवर्ग आहेत जे रोजगाराच्या शोधात असतात परंतु त्यांना रोजगार मिळण्यासाठी अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांच्या अडचणी व समस्या विचारात घेऊन राज्य शासनाने Mahaswayam Rojgar Nondni Portal सुरु केले आहे. या रोजगार नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करून देणार आहेत. या माध्यमातून बेरोजगार तरुण तरुणींना स्वावलंबी बनण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहित करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना (Mahila Sashaktikaran Yojana)

स्त्रियांचे निर्धन तसेच निरक्षर असण्याचे राज्यात अजूनही खूप मोठे प्रमाण आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण अति प्रमाणात दिसत आहेत आणि ग्रामीण भागांमध्ये अजूनही महिला आत्मनिर्भर नाहीत म्हणजेच स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही. स्त्रियांची निर्णय क्षमता वाढविणे खूप आवश्यक आहे. भारतीय घटनेने स्त्रियांना अनेक अधिकार दिलेले आहे परंतु ग्रामीण भागातील महिलांना या सर्व गोष्टी माहीतच नसतात.

महाराष्ट्र शासन नेहमी जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते, तसेच वरील सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्र शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच विविध मार्गाने त्यांची मदत करते. महाराष्ट्रातील महिलांचे सशक्तिकरण करण्याच्या उद्देशाने शासनाने महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना राज्यामध्ये राबविण्याचे ठरविले आहे.

शिवभोजन योजना (Shivbhojan Yojana)

शिवभोजन योजना हि ग्रामीण भागातील गरीब लोकांना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते, त्यामुळे या लोकांना स्वस्त दरात जेवण कोठे मिळेल याचा शोध घ्यावा लागतो, या सर्व नागरिकांची गरज ओळखून त्यांच्या समस्येचे निवारण करण्याच्या उद्देशाने तसेच या नागरिकांना एकवेळचे पोटभर जेवण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने Shiv Bhojan Yojna या योजनेची सुरुवात केली आहे.

शासनाच्या शिवभोजन योजना या योजनेमुळे समाजातील गरीब आणि कष्टकरी नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. शिवभोजन या योजने द्वारे नागरिकांना 10/- रुपये प्रती थाळी याप्रमाणे भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन योजना (Pandit Dindayal Yojana)

सहकारी पतसंस्थांचा राज्याच्या अर्थ व्यवस्थेत मोठा वाटा असतो. राज्यात सुमारे 9,000 च्या जवळपास पतसंस्था कार्यरत आहेत या सर्व पतसंस्था सर्व राज्यात, ग्रामीण भागात आणि शहरी भागात आहे. या पतसंस्था सूक्ष्म वित्त संस्था म्हणून काम करतात. ग्रामीण भागात पतसंस्थांचा मोठ्या प्रमाणात अर्थ व्यवसाय सुरू असतो त्याचप्रमाणे शहरी भागात सुद्धा सहकारी पतसंस्थांचा मोठा अर्थ व्यवसाय असतो.

या पतसंस्था छोटे व्यावसायिकांना, किराणा दुकानदारांना , मजूरांना तसेच निन्म मध्यमवर्गीय यांना वित्तीय सेवा देत असतात. त्यामूळे पंडित दिनदयाल योजना सुरू करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Jyotirav Phule Kisan Karjmukti Yojana)

शेतकऱ्यांचे कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते तर कधी शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकांचे नुकसान होते या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी राजा हैराण होतो, या सततच्या नुकसानामुळे आणि त्यांच्या पिकांना योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना नेहमी नवीन पिक घेण्यासाठी कर्ज काढावे लागते, प्रत्येक वेळी शेतकरी कर्ज काढून काढून कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना थोडा फार आधार देण्यासाठी व कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची सुरुवात केली आहे.

महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना (MahaDBT Scholarship Scheme)

MahaDBT: महाडीबीटी हे पोर्टल महाराष्ट्र सरकारद्वारे सुरु करण्यात आले आहे. महाडीबीटी पोर्टल हे महाराष्ट्र शासनाचा एक मुख्य आणि महत्वपूर्ण उपक्रम आहे, या पोर्टलव्दारे सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने या पोर्टलची सुरुवात केली आहे. या पोर्टलच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी व त्यांच्या महत्त्वपूर्ण आणि आवश्यक शिष्यवृत्त्या एकाच Web Portal वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

महाराष्ट्र शासनाचा एकच उद्देश आहे की महाडीबीटी शिष्यवृत्ती मुळे राज्यातील आर्थिक कमकुवत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारा खर्च शिष्यवृत्तीच्या सहाय्याने आर्थिक मदत देऊन कमी करावा.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotiba Phule Jan Aarogya Yojana)

महाराष्ट्र सरकारची मुख्य आणि महत्वाकांक्षी आरोग्य योजना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि आहे, महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील जनतेसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात, या योजना अत्यंत लोक उपयोगी असून राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिकांसाठी त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या वाईट वेळेत आर्थिक मदत देऊन त्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्याचे काम या योजनांव्दारे शासन पुर्ण करत असते.

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना (Apghat Bima Yojana)

राज्यातील रस्त्यावर वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे शहरातील रस्त्यांवर अथवा मोठ मोठ्या महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात, त्याचप्रमाणे या अपघातांमध्ये काही नागरिकांना कायमच्या अपंगत्वाला देखील सामोरे जावे लागते, या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्वाची योजना सुरू केली आहे त्या योजनेचे नाव म्हणजेच स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना आहे.

अस्मिता योजना (Asmita Yojana)

महाराष्ट्र सरकार वेळोवेळी समाजातील संपूर्ण घटकांचा सारखा विकास व्हावा म्हणून विविध प्रकारच्या लोक कल्याणकारी उपयोगी अशा योजना राबवीत असते, या धोरणाचा अवलंब करून महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी आणि मुलींसाठी अस्मिता योजना सुरू केली आहे. अस्मिता योजना या योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी झाली.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) (Kamgar Yojana)

शासनाने शहरी भागातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांच्या निवासाच्या समस्येकडे लक्ष देऊन कामगारांकरिता प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना समाविष्ट केले नव्हते, परंतु केंद्र सरकारने जून 2015 मध्ये देशातील प्रत्येक कुटुंबांना राहण्यासाठी स्वतःचे हक्काचे घरकुल असावे या धोरणावर आधारित PM Awas Yojana सुरु केली.

या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत ग्रामीण भागातील कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना या बांधकाम योजनेस मंजुरी आणि अर्थ सहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Maharashtra Construction Worker Registration

महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार हा राज्यातील सर्वात मोठा एक असंघटित विभाग आहे. रोजगार आणि सेवेच्या शर्तीचे नियमन करण्यासाठी आणि याचप्रमाणे बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा व आरोग्य आणि कामगारांसाठी कल्याणकारी योजना व उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे.

बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत इमारत आणि इतर बांधकाम कामगार अशा प्रकारच्या कामांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवून तसेच विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांच्या अंतर्गत कामगारांना आरोग्य व शैक्षणिक तसेच आर्थिक लाभ देऊन कामगारांचे जीवनमान सुधारणे त्यांच्या जीवनाचा दर्जा उंच करणे हा महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना महाराष्ट्र (Mukyamantri Krushi Anna Prakriya Yojana)

आपला भारत देश आधुनिक देश होत आहे. शासनाच्या विवीध धोरणांमुळे देश जलदगतीने विकसित होत आहे, भारतातून सर्वात जास्त औद्योगिकरण महाराष्ट्र राज्यात झालेले आहे त्यामुळे परदेशातून आणि देशांतर्गत मोठ्याप्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. देशात वाढते आधुनिकीकरण आणि शहरीकरण यामुळे राज्यातील नागरिकांचे उत्पन्न स्त्रोतात वाढ निर्माण होत आहे, तसेच वेगाने होत असलेले नागरीकरण आणि वाढते उत्पन्न यामुळे महाराष्ट्र राज्यात रिटेल उद्योगाच्या विकासाला मोठ्याप्रमाणात चालना मिळत आहे.

आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेत वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे उत्पन्नातील वाढीमुळे सुधारलेले जीवनमान आणि सध्याच्या कुटुंब व्यवस्थेत दुहेरी उत्पन्न असण्याकडे असलेला कल आणि तसेच लोकांच्या खाण्याच्या सवयींमध्ये होत असलेला बदल या सर्व बाबींमुळे महाराष्ट्र राज्यात कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. या कारणांमुळे मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सूरू करण्यात आली आहे.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana)

राज्यातील प्रत्येक कुटंबातील आई वडिलांना त्यांच्या मुलांची अत्यंत काळजी असते मुलांच्या संपूर्ण पालन पोषणाची जबाबदारी आई वडील यांच्यावर अवलंबून असते, आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांनी भविष्यात मोठी प्रगती करावी यासाठी सर्व पालक त्यांच्या कुवतीप्रमाणे जिवतोड प्रयत्न करत असतात. पालकांना जशी मुलांच्या शिक्षणाची काळजी असते त्याचप्रकारे मुलांच्या लग्नाची सुद्धा काळजी असते कारण लग्न कार्य म्हंटले की लग्नांमध्ये मोठ्याप्रमाणात खर्च होतो. गरीब पालकांना त्यांच्या मुलांचे पालनपोषण करणे त्यांच्या कमकुवत आर्थिक परस्थितीमुळे योग्य रीतीने करता येत नाही तसेच त्यांच्या मुला मुलींचे पालनपोषण करतांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

देशातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी तसेच त्या मुलीला तिच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनविण्यासाठी आणि नंतर मुलगी सज्ञान झाल्यावर तिला तिच्या लग्नासाठी हक्काचे पैसे मिळावे या संपूर्ण गोष्टीचे अभ्यास करून केंद्र शासनाने सन 2015 पासून Sukanya Samruddhi Yojana या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरु केली आहे. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत

महाराष्ट्र सरकारने जेष्ठ नागरिकांना मोफत एस टी प्रवास देऊन मोठा दिलासा दिला आहे त्यामुळे राज्यातील जेष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्र राज्यात या अगोदर जेष्ठ नागरिकांना प्रवासात 50% टक्के सूट दिली जात होती, परंतु आता शासनाच्या नियमानुसार वयाची 75 वर्षे पार केलेल्या नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. या सबंधित निर्णयाची योग्य रीतीने अंमलबजावणी करण्यासाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चन्ने यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मोफत एस टी बसचा प्रवास या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षे वयाच्या जेष्ठ नागरिकांना एसटी बसमधून विनामुल्य प्रवास करता येणार आहे. शासनाच्या या योजनेचा फायदा जवळपास राज्यातील 15 लाख जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या शिवनेरी या एसटी बस सह इतर सर्व प्रकारच्या एसटी सेवांसाठी हि जेष्ठ नागरिकांची मोफत प्रवास योजना लागू असेल हि माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री किसान योजना (Mukhyamantri Kisan Yojana)

मानवी जीवनात शेती हा एक अविभाज्य भाग बनला आहे, भारतामधील नैसर्गिक किंवा प्राकृतिक हे वर्ष सालाबादप्रमाणे बदलत नाही यातील सर्वात महत्वाचा मुख्य भाग म्हणजे हवामान तसेच जमीन आणि जमिनीची रचना आहे. एखाद्या विशिष्ट स्थितीत कोणते पिक येऊ शकते हे पूर्णपणे हवामानावर अवलंबून असते. तसेच पिक आणि शेतीचा प्रकार हे जमीन आणि जमिनीची रचना या सर्व बाबींवर अवलंबून असतात.

राज्यातील शेतकरी शेतीला व्यवसाय म्हणून करतात परंतू शेती हा व्यवसाय अनेक घटकांवर आधारित असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कधी फायद्याची ठरते तर बहुतांश वेळा शेतकऱ्यांचे शेतीत भरपुर नुकसान होते. महाराष्ट्र सरकार नेहमीच राज्यातील नागरिकांच्या दृष्टीने व त्यांच्या हिताच्या दृषटीकोनाने विविध कार्यक्रम तसेच अनेक कल्याणकारी योजना राबवीत असते. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (krushi sanjivani yojana)

शेती करत असताना शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारभावात झालेली घसरण, सावकार किंवा बँकांकडून घेतलेले कर्ज, अशा अनेक आकस्मिक संकटांना सामोरे जावे लागतात.जसे की कर्ज परतफेडीचा कालावधी, निर्यातमधील सरकारी बदल, आणि हवामानातील अचानक बदलामुळे शेतातील पिकांचे भरपुर नुकसान होते. शेतकरी हजारो रुपये खर्च करून आपल्या शेतमालाची काळजी घेतो पण प्रत्येक वेळी त्याच्या मेहनतीला फळ येत नाही. शेतकरी निसर्गावर अवलंबून असल्याने शाश्वत उत्पन्नाचा अचूक अंदाज लावणे कठीण होते आणि हमीभावाचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. शेतकऱ्यांचे शेती संबंधित संपूर्ण समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने Krushi Sanjivani Yojana या योजनेची अंमलबजावणी सुरु केली. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अल्प व मध्यम शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने मिळणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 4000/- कोटी किती रुपयांचा खर्च करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कृषी संजीवनी या योजनेत राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची लागवड करण्यावर भर दिला जाईल आणि शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होईल.

राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन योजना

मुलांच्या आरोग्याचे रक्षण आणि सुधारणा करणे हे मूलभूत महत्वाचे कर्तव्य आहे. देशात गेल्या अनेक दशकांमध्ये, आपण आरोग्य सुधारण्यात आणि बालमृत्यू कमी करण्यात नाट्यमय प्रगती बघितली आहे. तसेच इतर उत्साहवर्धक आकडेवारीत, सन 2000 ते 2017 दरम्यान, 5 वर्षापूर्वी मरण पावलेल्या मुलांची संख्या निम्मी झाली आहे आणि आज पूर्वीपेक्षा जास्त माता आणि मुले जिवंत आहेत.

मुलांमध्ये एक चांगले भविष्य घडवण्यासाठी समाज करू शकणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांमध्ये गुंतवणूक करणे.राज्यातील बालकांचे योग्य पोषण सुनिश्चित करण्यासाठी मिशन स्थापन करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण अभियान हे 2005 साली स्थापन करण्यात आले आहे. पहिला टप्पा पाच वर्षांचा होता. आता मिशनचा दुसरा टप्पा नोव्हेंबर 2011 मध्ये सुरू करण्यात आला होता. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (Krushi Swavlambi Yojana)

महाराष्ट्र सरकार नेहमीच राज्यातील जनतेसाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवून त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बळकट करण्याचा यशस्वी प्रयत्न करत असते. या योजनांच्या माध्यमातून विशेषतः समाजातील मागासवर्गीयांसाठी आणि तळागाळातील नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात.

या धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरु केली आहे, या योजनेच्या सहाय्याने सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहे.

बाल संगोपन योजना (Bal Sangopan Yojana)

राज्यातील बहुसंख्य समाजात मुलांचा मोठा वर्ग दिसायला येत असतो आणि त्यांना देशाची सर्वात मौल्यवान संपत्ती मानली जाते. वंचित मुलांसाठी संरक्षण आणि विकास कार्यक्रम सर्व मुलांसाठी समान संधी प्रदान करणे आवश्यक आहे जेणेकरून वैयक्तिक विकास होईल. कुटुंबाची सामाजिक-आर्थिक परिस्थिती वारंवार कौटुंबिक निराशा, मुलाची निराधारता दर्शवत असते. संकटात असलेल्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारद्वारे विशेष कार्यक्रम विकसित केले गेले आहेत.असुरक्षित मुलांच्या कल्याणाचा प्रचार करून, त्यांचे दुर्लक्ष, शोषण आणि अत्याचारापासून संरक्षण करून आणि वंचित मुलांना काळजी आणि आश्रय प्रदान करणे या विशेष सेवा पालकांच्या काळजी आणि पर्यवेक्षणाला पूरक किंवा बदलत असतात.

महाराष्ट्र सरकार राज्यातील जनतेसाठी आणि राज्यातील उद्योग व्यवसायांसाठी विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करत राहते, या सर्व योजनांच्या माध्यमातून सरकार नागरिकांचे आणि त्याचबरोबर राज्यातील उद्योग व्यवसायांचे अनेक प्रकारच्या आर्थिक सुविधा देवून हित साधायचा प्रयत्न करत असते. तसेच या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक मदत तसेच अनेक प्रकारच्या आरोग्य सुविधा व जेष्ठ नागरिकांसाठी तसेच ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि राज्यातील विद्यार्थी व लहान मुलांसाठी विविध योजना महाराष्ट्र सरकार राबवत असते, या योजनांचा पात्र नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा.

FAQ’S- Sarkari Yojana Yadi Maharashtra

Q.1- महाराष्ट्र सरकारी नवीन योजनांची माहिती कुठे मिळेल?

Ans- महाराष्ट्र शासनाच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती त्या-त्या योजनाच्या संबंधित अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते तसेच वेळोवेळी शासनाकडून या योजनांना वेळोवेळी अपडेट सुद्धा केले जाते.

निष्कर्ष

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासोबत Maharashtra Sarkari Yojana Yadi बद्दल माहिती शेअर केली आहे तसेच या योजना कोणासाठी उपलब्ध आहेत यासाठी कोण कोण अर्ज करू शकतात या सर्वांची माहिती तुम्हाला आजच्या या लेखामध्ये सविस्तरपणे मिळून जाईल.

जर आमच्या द्वारे दिलेली Sarkari Yojana Yadi Maharashtra बद्दल माहिती उपयुक्त वाटल्यास हि माहिती इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुध्दा या योजनांचा लाभ घेता येईल.