Sheli Palan Yojana: आजच्या या लेखामध्ये आपण शेळी पालन अनुदान योजना या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा यात सर्व मुद्दे सविस्तरपणे आपणास समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.Sheli Palan Yojana
कृषी प्रधान असलेला आपला देश आणि या देशाच्या उत्पन्नात सर्वात मोठा वाटा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये पशुपालन, शेळीपालन, मेंढी पालन इत्यादी व्यवसाय दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसत आहे.शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात शेळीपालन, मेंढीपालन तसेच पशुपालन इत्यादी शेती पूरक व्यवसाय हे शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी हा व्यवसाय चांगल्या प्रमाणात करतात. चांगले उत्पन्न देणाऱ्या या शेळीपालन सारख्या व्यवसायाला सरकारद्वारे 50% ते 75% अनुदान दिले जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.Sheli Palan Yojana
Sheli Palan Yojana Details
योजनेचे नाव | शेळीपालन योजना (Sheli Palan Yojana Maharashtra) |
अनुदान | 50 ते 75% |
विभाग | पशुपालन विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन पद्धत |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी किती अनुदान मिळणार आहे?
- शेळी किंवा मेंढी पालन हा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून 50 ते 75% अनुदान मिळणार आहे.
- हा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून 100 मादी आणि 05 नर यांकरिता 10 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच 200 मादी आणि 10 नर करिता 20 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
शेळी पालन योजना कधी सुरू करण्यात आली?
शेळी पालन ही योजना केंद्र सरकारद्वारे २०२१-२२ मध्ये या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच २७ डिसेंबर २०१९ रोजी मंत्रिमंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने या निर्णयाच्या माध्यमातून शेळी पालन, मेंढी पालन आणि कुक्कुटपालन साठी 50 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे अशी घोषणा केली.
शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता (Eligibility Criteria)
शेळी पालन योजनेचा तुम्हाला सुद्धा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ खाली दिलेली निम्नलिखित पात्रता असणे आवश्यक आहे –
- शेळी पालन या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला शेळी पालन येणे आवश्यक आहे किंवा याबद्दलचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराला बँक किंवा वित्तीय संस्थांकडून प्रकल्पासाठी मंजुरी कर्ज मिळालेले असावे तेव्हाच हे शेळी पालन अनुदान प्राप्त करून दिले जाते.
- लाभार्थी अर्जदाराकडे मॉडेल प्रोजेक्ट अहवाल असावा आणि त्या अहवालात बकरी विकत घेतल्याबद्दल त्या बकरीची खरेदी किंमत, घर खर्च इत्यादी गोष्टी दर्शविणे आवश्यक आहे.
- लाभार्थी अर्जदाराकडे १०० बकऱ्या साठी ९००० चौ.मी. एवढी जागा असणे आवश्यक आहे.
- जमीन भाड्याची पावती, एलपीसी, लिज कागदपत्रे किंवा जागेचा नकाशा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी अर्जदाराला सर्वप्रथम स्वतः 2 लाख रुपये खर्च करावी लागतील.
- जर लाभार्थी कर्ज घेण्यास तयार असेल तर त्याचाकडे १लाख रुपयांचा चेक, एफडी, पासबुक किंवा कर्ज घेण्याकरिता इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे असणे आवश्यक आहे.
- KYC Registration करण्यासाठी अर्जदाराला आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतील.
शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ खाली दिलेले निम्नलिखित कागदपत्रे असणे आवश्यक आहे –
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- प्रकल्प अहवाल
- शेळी पालन अनुभव प्रमाणपत्र
- कॅन्सल चेक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जमिनीचे कागदपत्रे
- GST नंबर असेल तर GST नंबर द्यावा लागेल
शेळी पालन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी वरती दिलेले सर्व आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
शेळी पालन अनुदान योजना अर्ज प्रक्रिया (Sheli Palan Yojana Apply Process)
जर तुम्हाला सुद्धा या Sheli Palan Yojana योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या माहितीनुसार या योजनेसाठी अर्ज करु शकता –
- शेळी पालन योजना महाराष्ट्र या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. अधिकृत संकेतस्थळाची लिंक तुम्हाला वरती दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
- शेळी पालन अर्ज करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्याजवळ १० अंकी मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे त्या मोबाईल नंबरने तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.
- मोबाईल नंबर ने रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ०६ अंकी OTP मिळेल त्या ओटीपी ला तेथे टाका आणि व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या.
- यानंतर तुम्हाला अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरायची आहे.
- यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा.
- अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करु शकता.
- अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळाला उजव्या बाजूला तपासू शकता.
- जर तुम्हाला अर्ज करण्यास काही समस्या येत असेल तर तुम्ही आपल्या गावातील सीएससी सेंटर अथवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन चौकशी करून तेथे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.
या योजनेसाठी अर्ज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
- अर्ज करताना आपली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
- अर्धवट माहिती भरू नये अन्यथा आपला जो अर्ज असेल तो बाद करण्यात येईल.
- कागदपत्रे सादर करताना ती कागदपत्रे बरोबर आहे की नाही हे आधी तपासावे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचा १०अंकी मोबाईल नंबर हात चालू असला पाहिजे आणि त्यासोबतच तुम्हाला ईमेल आयडी सुद्धा द्यायची आहे
- अर्ज सादर केल्यानंतर त्याची छायांकित प्रत आपल्या सोबत ठेवावी.
निष्कर्ष
आजच्या या लेखा मध्ये आम्ही आपल्यासोबत Sheli Palan Yojana या योजने संबंधित संपूर्ण माहिती समजावून सांगितलेली आहे जसे की: या योजनेसाठी अर्ज कसा करावा, यासाठी पात्रता काय आहे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात ई. सर्व आवश्यक ती माहिती आम्ही आजच्या या लेखामध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
जर तुम्हाला शेळी पालन अनुदान योजना या योजनेसंदर्भात आमच्या द्वारे दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही ही माहिती आपल्या गावातील ग्रुपमध्ये नक्की शेअर करा खाली शेअर बटन दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हि माहिती शेअर करू शकता.