svanidhi yojana : दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये बेरोजगारांची संख्याही वाढू लागल्यामुळे देशामध्ये युवा बेरोजगारांची संख्या ही लक्षणीय वाढत आहे. कारण आजची तरुण पिढी शिक्षित तर आहे पण दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे नोकरीची संधी खूप कमी झाली आहे. अशा प्रकारचे सर्व तरुण नोकरी शोधण्याकरता वेळ वाया घालवण्यापेक्षा, स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबला तर अशा तरुणांना भविष्यामध्ये मोठा फायदा होणार आहे. या सोबतच अजून बाकी तरुणांना सुद्धा याच्यामार्फत रोजगार प्राप्त होऊ शकतो.
अशा सर्व तरुणांनी नोकरीच्या शोधात वेळ घालवण्यापेक्षा स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबला तर अशा सर्व तरुणांची बेरोजगारी नाहीशी होईलच इतर तरुणांच्या हाताला सुद्धा काम मिळू शकते.
मात्र यापैकी जवळपास 90 टक्के लोकांकडे व्यवसाय उभारण्याकरता निधी उपलब्ध नसतो. त्यामुळे ही समस्या दूर करण्याकरता केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केलेली आहे. स्वनिधी योजनेच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कारण यामार्फत स्वतःला रोजगार देण्याबरोबरच इतरांनाही सुद्धा संधी मिळू शकते.
प्रधानमंत्री स्वनिधी योजना बाबत माहिती svanidhi yojana
योजनेचे नाव | प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना |
यांच्या माध्यमातून | केंद्र सरकार द्वारे |
योजनेला सुरुवात | 2020 |
लाभार्थी | रस्त्यावरील किरकोळ विक्री करणारे हात गाडीवाले आणि तसेच फेरीवाले |
लाभ | 10 हजार रुपयापर्यंत विनाकारण कर्ज |
अधिकृत वेबसाईट | https://pmsvanidhi.mohua.gov.in/ |
पीएम स्वनिधी ही योजना काय आहे? svanidhi yojana
ही योजना केंद्र अत्यंत महत्त्वकांक्षी योजना मधील एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून रस्त्यावरती किरकोळ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायांवर कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते. विशेष बाब म्हणजे हे कर्ज मिळवण्याकरता लाभार्थ्याला काहीही तारण ठेवण्याची गरज भासत नाही.कोरोना काळामध्ये आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या माध्यमातून ही स्वनिधी स्वयंरोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे.Swanidhi Yoajana
या योजनेच्या माध्यमातून रोड साईड किरकोळ विक्रेत्यांना कुठल्याही कारणाशिवाय कर्ज उपलब्ध करून दिले जात असते. या योजनेला जून 2020 मध्ये करोना महामारीच्या काळामध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे. कारण कोरोना काळामध्ये शहरामध्ये मजुरी करणारे तसेच छोटी मोठी नोकरी करणारे नोकरदार यांनी नोकरी गमावल्यामुळे त्यांचे फार मोठे नुकसान झालेले होते. त्यामुळे अशा सर्व नागरिकांना व्यवसाय सुरू करता यावा याकरताही स्वा निधी योजना सुरू करण्यात आलेली होती. अशा सर्व नागरिकांना सरकार द्वारे कर्जाची उपलब्धता करून देण्यात येत असते.
प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजनेचे मुख्य उद्दिष्टे
ज्यावेळेस भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा कोरोना महामारीचा आहाकार सुरू असताना देशाची अर्थव्यवस्था ही खूप विस्कळीत झालेली होती. कारण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोकांना घराच्या बाहेर पडणे शक्यच होत नव्हते. या सर्व गोष्टींमुळे रोड साईडला असलेले छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले होते.svanidhi yojana
या सर्व समस्यांना लक्षात घेऊन केंद्र सरकार द्वारे प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर फंड ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या उद्योजकांना पुन्हा काम सुरू करण्याकरता विनाकारण लोन प्राप्त करून दिले जाते.Swanidhi Yoajana
या योजनेचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे रस्त्यावर आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांकरता आर्थिक सक्षम बनवल्या जाईल. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये असा कुठलाही प्रसंग आला तर जास्त चिंता करण्याची गरज भासणार नाही.
प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर योजने करता आवश्यक पात्रता svanidhi yojana
- रस्त्यावरती व्यवसाय करणारे विक्रेते ज्यांच्याकडे व्हेडिंग प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असेल ते सर्व विक्रेते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
- सर्वेक्षणांतर्गत अधोरेखित झालेले विक्रेती परंतु त्यांना विक्रीची किंवा ओळखीचा पुरावा अध्याप जारी करण्यात आलेला नसून, अशा सर्व विक्रेत्यांना अंतिम व्हेडिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
- शहरी तसेच स्थानिक भौगोलिक कक्षेमध्ये विक्री करणारे विक्रेते आणि याकरता त्यांना यु एल बी किंवा टीव्हीसीद्वारे शिफारस पत्र जारी केले गेले आहे.
स्वा निधी योजने करता पात्र लाभार्थी कोण असणार?
- न्हाहीची दुकाने
- मोची
- सुपारीची दुकानें
- लॉंड्री
- भाजी विक्रेते
- फळ विक्रेते
- रेडी तो ईट स्ट्रीट फूड
- चहा दुकानदार
- ब्रेड पकोडे अंडी विकणारे
- कपडे विकणारे फेरीवाले
- पुस्तक विक्रेते
- कारागीर
योजने करता आवश्यक कागदपत्रे Swanidhi Yoajana
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर योजनेअंतर्गत कोण कर्ज देणार
- शेड्युल कमर्शियल बँक
- प्रादेशिक ग्रामीण बँक
- स्मॉल फायनान्स बँक
- सहकारी बँक
- नॉन बँकिंग फायनान्स कंपनी
- मायक्रो फायनान्स संस्था
- बचत गट बँका
- महिला निधी इत्यादी
अर्ज कशा पद्धतीने करावा Swanidhi Yoajana
प्रधानमंत्री स्वा निधी योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरता तुम्हाला सर्वात अगोदर दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे. याचबरोबर तुम्ही पीएम स्वा निधी मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून सुद्धा या योजने करता सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
निष्कर्ष : वरील दिलेल्या माहितीनुसार गरजू व होतकरू पात्र नागरिकांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा. जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तुमचा छोटा उद्योग मोठा होण्यास यामुळे खूप मोठे साई होय. आम्ही दिलेले माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल तर कमेंट द्वारे तुमची प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पाठवू शकता.