Village Marriage Certificate: गावातील ग्रामपंचायत मधून मॅरेज सर्टिफिकेट कसे काढायचे जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी बातमी या ब्लॉग वरती. तर मित्रांनो आज आपण आजच्या या लेखामध्ये Village Marriage Certificate म्हणजेच आपल्या लग्नाचा लग्न दाखला कसा काढतात या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो तुम्हाला हे तर नक्कीच माहीत असेल की आपले लग्न झाल्यानंतर आपल्याला विवाह नोंदणी करणे किती गरजेचे आहे आणि शक्यतो ग्रामीण भागामध्ये म्हणजेच खेड्या गावांमध्ये या काही कागदी गोष्टीकडे भरपुर प्रमाणात दुर्लक्ष केले जाते. परंतु विवाह नोंदणी वेळोवेळी नाही केली तर आपल्याला त्याचे नुकसान सुध्दा बघायला मिळतात आणि ग्रामीण भागामध्ये भरपुर लोकांना हेच माहित नाही की मॅरेज सर्टिफिकेट काय असते या Marriage Certificate बद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये सविस्तरपणे बघणार आहोत त्यासाठी आमच्याद्वारे लिहिलेला मॅरेज सर्टिफिकेट चा आजचा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे काय? (Marriage Certificate)

चला तर जाणून घेऊयात की मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे काय आहे आणि हे लग्न प्रमाणपत्र काढणे एवढे का आवश्यक आहे-

मित्रांनो मॅरेज सर्टिफिकेट म्हटले की ग्रामीण भागातील लोकांना लवकर कळत नाही Marriage Certificate म्हणजे त्याला आपण शुद्ध मराठी भाषे मध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र असे म्हणतात. विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे लग्न झाल्यानंतर कायदेशीर केलेली एकप्रकारे नोंदणी असते व ही विवाह नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक या नोंदणी चा विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. या विवाह नोंदणी प्रमाणपत्रालाच Marriage Certificate असे म्हटले जाते.

मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे एकप्रकारे लग्न केल्याचा कायदेशीर पुरावा म्हणजे जे दोन व्यक्ती लग्नाच्या बंधनात अडकतात त्यांची गावांमध्ये किंवा शहरांमध्ये विवाह नोंदणी केली जाते त्यानंतर त्यांना कायदेशीर नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. या विवाह नोंदणी प्रमाणपत्र नवरी म्हणजेच मुलीच्या मागचे वडिलांचे नाव काढून त्याच्यापुढे त्यांच्या नवऱ्याचे नाव लावण्यासाठी वापरता येते. त्यानंतर हे विवाह प्रमाणपत्र कोणतेही कागदपत्रात काही बदल करायचा असेल तर हे लग्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.

Village Marriage Certificate (विवाह नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे)

चला जाणून घेऊयात की विवाह नोंदणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे –

  • Husband & Wife Passport Size Photo (वधू आणि वराचे पासपोर्ट आकाराचे फोटो)
  • Husband & Wife Aadhar Card Zerox (वधू वराचे आधार कार्डची झेरॉक्स)
  • Husband & Wife Leaving Certificate Zerox (वधू वराचे शाळेच्या दाखल्याची झेरॉक्स)
  • लग्नात उपस्थित असलेले तीन साक्षीदार व त्यांचे 03 फोटो तसेच त्यांच्या आधार कार्डाची झेरॉक्स प्रत
  • लग्नपत्रिका (लग्नाच्या आमंत्रण साठी बनवलेली आमंत्रण लग्नपत्रिका)
  • लग्नामध्ये उपस्थित असलेल्या ब्राह्मण / मौलाना चा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ब्राह्मणाची / मुस्लिम मौलाना यांची नावासह संपूर्ण माहिती
  • विवाह नोंदणी पत्र इत्यादी.

विवाह नोंदणी करण्याचा अर्ज कुठे मिळेल?

मित्रांनो जर तुमचे सुद्वा लग्न झाले आहे आणि अद्याप तुम्ही विवाह नोंदणी केलेली नाही परंतु तुम्हाला विवाह नोंदणी करायची आहे तर तुम्हाला विवाह नोंदणी साठी लागणारा अर्ज तुम्हाला जर तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असेल तर तुम्हाला विवाह नोंदणी अर्ज तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये मिळून जाईल.

जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला विवाह नोंदणी अर्ज हा शहरातील तहसील कार्यालय मध्ये मिळून जाईल जर तुम्हाला विवाह नोंदणीचा ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करायचा असेल तर आम्ही खाली एक PDF दिलेली आहे त्यावरून तुम्ही विवाह नोंदणीचा फॉर्म डाऊनलोड करू शकता.

विवाह नोंदणी करण्यासाठी पैसे भरावे लागतात का?

हे बघा मित्रांनो विवाह नोंदणी करण्यासाठी जर तुम्ही विवाह झाल्यानंतर एक ते दोन महिन्यांमध्ये विवाह नोंदणी केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही विवाह झाल्यानंतर पाच ते सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असेल आणि तुम्ही विवाह नोंदणी केली तर तुम्हाला विवाह नोंदणीसाठी काही तरी अर्ज शुल्क रक्कम भरावी लागेल.

FAQ’s- Village Marriage Certificate

चला तर जाणून घेऊयात की मॅरेज सर्टिफिकेट बद्दल लोकांद्वारे भरपुर वेळा विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे-

Q.1- विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे काय आहे?

Ans- विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे पती व पत्नीमधील एक संबंध दर्शवणारे एक प्रमाणपत्र आहे. विवाह प्रमाणपत्र हे धार्मिक विवाह तसेच विशेष विवाह कायद्यांनुसार जिल्हा लग्न निबंधक जारी आहे.

Q.2- विवाह नोंदणी प्रमाणपत्र कशासाठी उपयोगी आहे?

Ans- विवाह नोंदणी प्रमाणपत्र खालील निमनलिखित कारणांसाठी उपयोगी ठरतो –
01. माहेरचं नाव बदलून सासर कडील नविन नाव जोडण्यासाठी.
02. बँक खाते उघडण्यासाठी किंवा Passport / Visa प्राप्त करण्यासाठी उपयोग होतो.
03.उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी.
04.विमा रक्कम दावा करण्यासाठी किंवा मालमत्ता दावा करणे किंवा आपले नाव संबंध इत्यदी.
05. शिधापत्रिका वरील नाव कमी करणे आणि सासर कडील शिधापत्रिकेत नाव चढवण्यासाठी.

Q.3- विवाह प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते?

Ans- जोपर्यंत नवरा आणि बायकोचे लग्न संबंध टिकून आहेत तो पर्यंत हा विवाह प्रमाणपत्र म्हणजेच Marriage Certificate वैध असेल.

Q.4- Marriage Certificate बनवताना कोणती काळजी घेतली पाहिजे?

Ans- Marriage Certificate बनवताना आपले नाव, वय, पत्ता, धर्म, वैवाहिक स्थिती, विवाह स्थळ, ज्या दिवशी लग्न झाले ते विवाह दिनांक इत्यादी आवश्यक कागदपत्रांची काळजी घेणे आवश्यक आहे.

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण Village Marriage Certificate कसा काढतात व यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात या सर्व बाबींना लक्षात घेऊन तुम्हाला आजच्या या लेखामध्ये सविस्तरपणे संपुर्ण माहिती समजावून सांगितली आहे.

मित्रांनो जर तुम्हाला आमच्याद्वारे Village Marriage Certificate बद्दल दिलेली माहिती आवडली असल्यास हि माहिती इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुध्दा या मौल्यवान माहितीचा नक्कीच फायदा होईल.