Business Loan Information In Marathi: व्यवसाय करण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचे असते. परंतु व्यवसाय करणे प्रत्येकाला शक्य नसते. व्यवसाय सुरू करायचा असल्यास तुमच्याजवळ पैसे सुद्धा असेल कोणताही असो तो व्यवसाय यशस्वीपणे पूर्ण करू शकत नाही पैसाच हा आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याचा काम करतो.
आपण आपल्या व्यवसायाला किती गुंतवणूक करतो जेवढे जास्त गुंतवणूक तेवढा जास्त नफा असेही म्हटलं जातं परंतु शेवट प्रश्न येतो तो म्हणजे पैसा नवीन माणूस स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याजवळ भांडवल असणे आवश्यक आहे भांडवल नसल्यावर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करा सर्वात आधी तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःजवळ काहीतरी भांडवल असणे आवश्यक आहे म्हणजेच पैसे असणे आवश्यक आहे.
मित्रांनो आता तुम्ही कोणताही व्यवसाय विना भांडवल कसा करणार जर तुमच्याकडे पैसेच नसतील तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय कसा करणार. व्यवसाय करणे म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी त्या विकत घ्यावी लागतील आधी तुम्हाला तुमच्या स्वतःचे पैसे व्यवसाय सुरू करण्यासाठी लावावे लागतील त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोड्या थोड्या दिवसांनी नफा मिळत जाईल अशाप्रकारे तुम्ही आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात तर आजच्या या लेखात आम्ही आपणास तुम्ही कर्ज कसे घेऊ शकता याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
बिझनेस लोन म्हणजे काय? (Business Loan Information)
तुम्हाला स्वतःचा एक व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा तुम्ही यादी व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहात परंतु तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी काही पैशांची गरज पडली आहे तर तुम्ही हे पैसे खाजगी किंवा सरकारी बँक किंवा वित्तीय संस्थांकडून एक कर्ज म्हणून घेता या कर्जाला व्यवसाय कर्ज म्हणजेच बिजनेस लोन असे म्हटले जाते.
व्यवसाय कर्ज घेण्यासाठी व्याजदर (Interest Rate)
जर तुम्ही व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेत असाल तर प्रत्येक बँक शाखांच्या व्याजदरात बदल असतात तरी साधारणतः तुम्हाला 13 ते 48% व्याजदर द्यावा लागेल. जर तुम्ही कोणतेही योजनेअंतर्गत किंवा सरकारी बँकेद्वारे व्यवसाय कर्ज घेत असाल तर तुम्हाला व्याजदर हा अत्यंत कमी असतो परंतु जर तुम्ही खाजगी बँकेतून लोन घेत असाल तर तुम्हाला खूप जास्त लावला जातो.
व्यवसाय कर्ज किती प्रकारे घेऊ शकता?
- सरकारी योजनेअंतर्गत व्यवसाय कर्ज घेऊ शकता.
- सरकारी किंवा खाजगी बँकांद्वारे सुद्धा तुम्ही व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता.
- सहकारी संस्थांकडून सुद्धा तुम्ही कर्ज घेउ शकता.
व्यवसाय कर्ज घेण्यासाठी सिबील स्कोर असणे आवश्यक आहे का?
व्यवसाय कर्ज घेण्यासाठी किंवा इतर कोणताही छोटा मोठा कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर हे एक महत्त्वाचा आहे सिबिल स्कोरशिवाय तुम्हाला कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देणार नाही. तुमचा सिबिल स्कोर हा 600 ते 750 पर्यंत असणे आवश्यकच आहे. सिबिल स्कोर हा तुमचे मागील झालेले व्यवहार दर्शविते म्हणजे तुम्ही मागे कोणते सरकारी किंवा खाजगी बँकेद्वारे किंवा वित्तीय संस्थेद्वारे कर्ज घेतलेले असल्यास ते तुम्ही कर्ज खरंच वेळेवर जमा केलेत का किंवा तुम्ही ते घेतलेले कर्ज त्या बँकेला परत केलेच नाही हे सिबिल स्कोरच्या माध्यमातून कळते त्यामुळे कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था क्रेडिट स्कोर तपासल्या शिवाय तुम्हाला कर्ज देत नाही. आपला सिबिल स्कोर तपासण्यासाठी येथे क्लिक करा
व्यवसाय कर्ज घेण्यासाठी पात्रता (Business Loan Eligibility)
व्यवसाय कर्ज घेण्यासाठी खालील पात्रता तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे-
- कर्ज घेणारी व्यक्ती ही भारतीय नागरीक असणे आवश्यक आहे.
- व्यवसाय तुम्ही कोणता करणार आहे त्याचा संपूर्ण आराखडा बनवलेला असला पाहिजे.
- कर्ज व्यवसाय घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही यादी व्यवसाय करत असाल आणि त्यावेळेस मला कर्ज घ्यायचे असल्यास तो व्यवसाय तीन वर्षे जुने व्यवसाय असले पाहिजे.
- यापूर्वी जर तुम्ही व्यवसाय कर्ज घेण्यासाठी कुठे अर्ज केला असेल त्या बँकेने डिफॉल्टर म्हणून तुम्हाला घोषित केला आहे तर तुम्हाला कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
व्यवसाय कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Business Loan Documents)
जर तुम्ही कोणत्याही सरकारी खाजगी बँक शाखेतून किंवा वित्तीय संस्था मार्फत कर्ज घेत असाल तर खालील कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे-
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- ओळखपत्र
- रेशन कार्ड
- पासपोर्ट
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जर मोठा व्यवसाय करायचा आहे आणि जास्त रकमेत कर्ज घ्यायचा असल्यास तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे सारखे आर्थिक कागदपत्रे लागतील.
व्यवसाय कर्ज घेण्याचे फायदे (Business Loan Benefits)
व्यवसाय कर्ज म्हणजे बिजनेस लोन घेण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत-
- व्यवसाय कर्ज घेतल्यामुळे व्यवसायिकांजवळ पैसे उपलब्ध होतात. हे पैसे त्यांच्या व्यवसायाला वाढवण्यासाठीकिंवा व्यवसायाच्या विकासासाठी त्यांना उपयोगी पडतात.
- बिझनेस लोन घेतल्यामुळे व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी आवश्यक गुंतवणूक करण्यासाठी पैसे प्राप्त होतात.
- बिझनेस लोन घेतल्यामुळे व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यास मदत होते.
निष्कर्ष
आजच्या या लेखामध्ये आम्ही Business Loan Information (व्यवसाय कर्ज) याबद्दल संपूर्ण माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या या लेखात तुम्ही व्यवसाय कर्ज कसे घ्याल याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. व्यवसाय कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, यासाठी पात्रता काय हवी असते, व्यवसाय कर्ज घेण्याचे फायदे काय आहेत इत्यादी गोष्टी आजच्या या लेखाद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
जर आमच्याद्वारे व्यवसाय कर्ज कसे घेतात याबद्दल दिलेली माहिती उपयुक्त वाटली असल्यास हि माहिती खाली दिलेल्या शेअर बटन वरती क्लिक करून इतरांना देखील शेअर करा.