Krushi Yojana Maharashtra:नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखात महाराष्ट्र सरकार आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
भारतातील 60 टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट बनवण्यासाठी यात कृषी क्षेत्राचा खूप मोलाचा वाटा आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेळोवेळी शेतीच्या कामातील विविध अडथळे आणि गैरसोय दूर करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते, जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक प्रकारच्या समस्या सोडवता येतील.(Krushi Yojana Maharashtra)
सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश काय आहे?
Krushi Yojana Maharashtra: सरकारने सुरू केलेल्या या विविध प्रकारच्या योजना सामान्यतः भारतात राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी चालवल्या जात आहेत. भारतातील सर्व शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती समतोल नसल्यामुळे काही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून हवे तसे चांगले उत्पादन मिळत नाही आणि त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे खूप कठीण होते. यामुळे अशा समस्या पाहून सरकारने या विविध प्रकारच्या योजना योजना राबविण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना चांगली शेती करून चांगले उत्पादन घेता येईल आणि त्यांची आर्थिक स्थितीही सुधारता येईल या काही कारणांमुळे सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असते.
Krushi Yojana Maharashtra :महाराष्ट्र राज्यातील शेतकरी योजना कोणत्या आहेत?
01) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Solar Pump Yojana)
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने सौर कृषी पंप योजना या योजनेची सुरुवात केली आहे. या कृषी पंप योजने अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचन करण्यासाठी राज्य सरकार कमी दरात सौरपंप उपलब्ध करून देणार आहे.
जर एखाद्या शेतकऱ्याकडे जुने डिझेल किंवा इलेक्ट्रिक पंप असेल तर ते पंप सोलर पंपमध्ये रूपांतरित करून दिले जाणार आहेत. जर तुम्ही शेतकरी आहात आणि शेतीसाठी सौरपंप बसविण्याचा विचार करत असाल तर हि कृषी पंप योजना तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरू शकते.
या योजनेसाठी अर्ज करावयाचा असेल तर तुम्ही आपल्या गावातील CSC सेंटर किंवा महा ई सेवा केंद्राला भेट देऊ शकता.
02) कृषी यांत्रिकीकरण योजना (Krushi Yantrikikaran Scheme)
महाराष्ट्र शासनाद्वारे कृषी यांत्रिकीकरण योजना ही योजना राबविण्यात येते. या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत महाराष्ट्रात राहणार्या सर्व शेतकर्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित मुख्य उपकरणांच्या खरेदीवर त्यांना 80% टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते. कृषी उपकरणे हे अत्यंत महाग असतात आणि या महागाईमुळे अनेक शेतकरी बांधव शेतीसाठी आवश्यक ते उपकरणे खरेदी करण्यापासून वंचित राहतात आणि त्यांना नाईलाजाने पारंपरिक शेती करावी लागते, पारंपरिक शेतीमुळे त्यांचे उत्पादन मध्ये भरपूर प्रमाणात घट होते आणि त्यांचे नुकसान होते.
या योजनेचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना कमी श्रमात अधिक पिके घेता यावी आणि त्यांच्या पिकांचे उत्पादन अधिक प्रमाणात वाढावे यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उपकरण खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी 80% अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना ही सुरु करण्यात आली.
03) ठिबक सिंचन अनुदान योजना
लहान नळीद्वारे झाडाच्या मुळाला थेंबा थेंबाने पाणी देण्याची ही आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजेच ठिबक सिंचन. या आधुनिक सिंचन प्रणालीमुळे कमी पाण्यात सुद्धा चांगले पीक वाढते .थेंबा थेंबाने पाणी दिल्यामुळे पाणी थेट पिकाच्या मुळापर्यंत जाते आणि पिकाच्या पाण्याची गरज पुरेपूर भागली जाते. या सर्व बाबी लक्षात ठेवून राज्य शासनाने याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना करून द्यावा याच उद्देशाने शासनाद्वारे हि ठिबक सिंचन अनुदान योजना राबवली जात आहे.
महाराष्ट्र सरकारद्वारे जलसिंचनाची सूक्ष्म सिंचन ही योजना शेतीसाठी पाण्याचा पुरेपूर वापर करून देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेमुळे कमी पाण्यात सुद्धा शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता येईल यासाठीच राज्य सरकारद्वारे ही ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजना राबवली जात आहे.
04) किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card)
किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक किसान क्रेडिट कार्ड दिले जाते, या किसान क्रेडिट कार्डचा उपयोग शेतकरी बांधव शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी करू शकतात. त्याचप्रमाणे हे Kisan Credit Card शेतकरी बांधवांना ATM मधून पैसे काढण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते.
05) नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना (Namo Shetkari Yojana)
केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षात ६,००० रूपये दिले जातात. याच अनुषंगाने, आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांना एका वर्षात ६,००० रूपये मिळणार आहेत.
आता शेतकरी मित्रांना किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ६,००० रूपये आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेअंतर्गत सुमारे ६,००० रूपये मिळतील, दोन्ही मिळून आता शेतकऱ्यांना १ वर्षात १२,००० रुपयांचा लाभ मिळेल.
06) मागेल त्याला शेततळे शेतकरी योजना
राज्यातील शेती करणाऱ्या बहुतांश शेतकरी बांधवांची पिके ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात, परंतु काही वेळा अतिवृष्टीमुळे किंवा कमी पावसामुळे शेतकऱ्यांची पिके येत नाहीत किंवा आलेली पिके सुद्धा वातावरणात बदल झाल्यामुळे नष्ट होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो व शेतीतून योग्य ते उत्पादन घेता येत नाही. या काही कारणांमुळे राज्यातील बहुतांश गरीब शेतकरी आर्थिक अस्थिरतेने त्रस्त आहेत व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या जात आहेत त्यातील एक योजना म्हणजे मागेल त्याला शेततळे ही योजना.
मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे बांधण्यासाठी ५,००,००० रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. या योजनेची अधिक माहिती तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बघू शकता.
07) मागेल त्याला विहीर योजना
महाराष्ट्र राज्यात नेहमीच दुष्काळ पडतो यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीवर या दुष्काळाचा विपरीत परिणाम होतो. शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादनासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय शेतकऱ्यांची पिके नासाडी होतात. शेतापर्यंत पाणी न पोहोचणे किंवा सिंचनाची कामे करण्यासाठी सिंचनाची साधने खरेदी न करणे हे शेतकरी बांधवांचे प्रमुख कारणे आहेत.
राज्य सरकारद्वारे या सर्व बाबींचा अभ्यास करून दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी मागेल त्याला विहीर योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकारद्वारे विदर्भातील पाच 05 जिल्ह्यात सिंचन विहिरींचा कार्यक्रम घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
08) राष्ट्रीय कृषी विकास योजना
केंद्र सरकारद्वारे 2007 साली राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेद्वारे कृषी आणि यासंबंधित क्षेत्राचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला जाईल. यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचे कृषी आणि संबंधित क्षेत्र विकास उपक्रम निवडू शकतील. या योजनेचा प्रमुख उद्देश कृषी आणि या संबंधित क्षेत्रांचा विकास करण्याचा आहे. यासाठी कृषी व्यवसाय उद्योजकतेला चालना दिली जाईल.
राष्ट्रीय कृषी विकास या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. ज्याद्वारे साठवणूक, बाजारपेठ, सुविधा इत्यादींमध्ये प्रवेश सुनिश्चित केला जाऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध योजना तयार करण्यात येणार आहे.
09) शेतमाल तारण योजना
शेतमाल तारण योजना या योजनेचा मुख्य उद्देश तुम्हाला माहिती आहे का? या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की शेतकरी बांधवांचा शेतमाल हा योग्य ठिकाणी साठवून जेव्हा बाजारात त्या मालाचा चांगला बाजारभाव मिळेल त्या वेळेला बाजारात आणून विकणे हा प्रमुख उद्देश या योजनेचा आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळू शकतो. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधव त्यांचा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत तारण म्हणून ठेऊ शकतात व त्या बदल्यात चालू हंगामातील शेती करण्यासाठी शेतकरी बांधव त्या शेतमालावरून कर्ज मिळवू शकतात.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना पडक्या बाजारभावाने त्यांचा शेतीतील माल विकावा लागणार नाही हाच शेतमाल तारण योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे तसेच शेतीसाठी कर्ज उपलब्ध झाल्यामुळे चालू हंगामातही शेतकरी मित्रांना शेती करता येईल.
10) प्रधानमंत्री फसल बिमा योजना (PM Bima Yojana)
प्रधानमंत्री फसल बिमा या योजनेअंतर्गत दुष्काळामुळे एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले असल्यास, या परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याची तरतूद या योजनेद्वारे करण्यात आली आहे. आत्तापर्यंत पीएम फसल बिमा या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना १.८ लाख कोटी रुपयांची विमा रक्कम देण्यात आली आहे.
पिएम फसल बिमा या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागणाऱ्या शेतकरी बांधवांना एकप्रकारे आर्थिक मदत करून देणे जेणेकरून शेतकरी बांधवांना नवीन आणि आधुनिक पद्धतीने शेती अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यातून त्यांना चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळवता येईल तसेच या योजनेद्वारे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळावा आणि या योजनेद्वारे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना काढता येईल.
Krushi Yojana Maharashtra (इतर शेतकरी योजना:)
- पीएम प्रणाम योजना
- प्रधानमंत्री कृषी सिचाई योजना
- सौर कृषि वाहिनी योजना
- प्रधानमंत्री किसान संपदा योजना
- पॉली हाऊस सबसिडी योजना
शेतकरी बांधवांनो वरती दिलेल्या Krushi Yojana Maharashtra या सर्व योजनांची माहिती आम्ही आपणास थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वरील सर्व योजनांची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता किंवा आपल्या गावातील महा ई सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन वरती दिलेल्या सर्व योजनांची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊ शकता. धन्यवाद…