Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाचा मुद्दा हा खूप दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. आणि आपण बघतच आहोत की मराठा आरक्षण आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्व अनुसार लाखो करोडो च्या संख्येने मराठा मावळे मुंबईच्या वेशीवरती येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने याबाबत सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकार द्वारे म्हणून जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आलेल्या असून याबाबतचे अध्यादेश सुद्धा काढण्यात आलेले आहे.
सरकारकडून घेण्यात आलेले अध्यादेश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती सुपूर्द करणार आहेत. या दरम्यान आमचा विरोध कुणालाही वैयक्तिक नसून फक्त आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या यासाठीच होता. असे मनोज जरांगे पाटील यांनी मीडिया सोबत बोलताना सांगितले आहे. दरम्यान या बाबीचा विरोध आता आमचा संपलेला आहे. कारण आमच्या मागण्या मान्य करण्यात आलेले आहे. असे मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. मध्यरात्री पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचे त्यावेळेस बोलतांनी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
नक्कीच लाखो करोडो च्या संख्येने मराठा बांधव एकत्र येऊन मुंबईकडे रवाना झाल्यानंतर सरकारला या गोष्टीवरती निर्णय घेणे भाग पडले. आज मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनामुळे लाखो मराठा बांधवांना याचा फायदा भविष्यात घडून येणार आहे. परंतु मनोज रंगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या? त्यातील कुठल्या मागण्या राज्य सरकार द्वारे पूर्ण केल्या? असा प्रश्न प्रत्येक मराठा बांधवांना तसेच सर्वांनाच पडलेला आहे चला तर याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.(Maratha Aarakshan)
मनोज जरांगे पाटील यांच्या १० मोठ्या प्रमुख मागण्या कोणत्या बघा(Maratha Aarakshan)
- आतापर्यंत 54 लाख लोकांपैकी 37 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. परंतु उर्वरित प्रमाणपत्र त्वरित वितरित करण्यात यावे.
- कुठल्या ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिले. याचा संपूर्ण डेटा आम्हाला द्यावा.
- शिंदे समिती बरखास्त करू नये याचबरोबर नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवण्यात यावे.
- ज्यांनी कुणबी नोंदी मिळालेल्या आहे त्यांच्या सगळ्या सग्या सोयर्यांनाही त्याच आधारावरती प्रमाणपत्र देण्यात यावे. याचा अध्यादेश रात्रीतून काढण्यात यावा.
- ज्यांच्याकडे नोंद सापडलेली नाही त्या मराठा बांधवांनी त्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांच्याशी संबंधित असलेले शपथपत्र देण्यात यावे.
- शपथ पत्र १०० रुपयांच्या स्टॅम्पवर घेऊ नये. तसेच हे शपथपत्र मोफत देण्यात यावे अशी सुविधा करावी.
- अंतरवालीसह महाराष्ट्र मधील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे.
- आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण हे १००% मोफत देण्यात यावे.
- आरक्षण मिळेपर्यंत कुठलीही सरकारी भरती करू नये, तसेच भरती करायची असेल तर जागा राखीव ठेवून भरती करण्यात यावी.
- जिल्हास्तरावर मराठा समाजासाठी शासकीय वस्तीगृहांचा प्रश्न निकाली लावण्यात यावा.
अशाप्रकारे वरील प्रमाणे दिलेल्या दहा मोठ्या मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी मान्य करून घेतलेले आहे.मराठा बांधवांसाठी या 10 मागण्या खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण सध्या स्थितीमध्ये मराठा बांधवांना (Maratha Aarakshan) आरक्षणाच्या मुद्द्यावरून नेहमीच संघर्ष करत यावा लागला आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रत्येक मराठा बांधवाला हात जोडून आरक्षणामध्ये सहभागी होण्याची विनंती केलेली होती.
मनोज जरांगे पाटील यांच्या निरक्षणाखाली हे (Maratha Aarakshan) आंदोलन पार पडलेले असून भविष्यामध्ये याचा सर्वात मोठा फायदा हा प्रत्येक मराठा बांधवांना नक्कीच होणार आहे. कारण हा लढा कुठल्याही एक नागरिकांचा नसून तो पूर्ण समाजाचा आहे. व या आंदोलनामुळे मराठ्यांना याचा पिढ्यानपिढ्या नक्कीच मोठा फायदा होणार आहे. वरील दिलेल्या 10 मागण्या मान्य केलेल्या असून याविषयीचे अध्यादेश विषयी अंमलबजावणी केली जाईल.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरुवात अंतरवाली येथे सुरू झालेली आहे. याचा शेवट मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्यानंतरच झालेला आहे. म्हणून जरांगे पाटील यांनी मीडिया सोबत बोलताना सांगितले आहे की यानंतर सुद्धा मी मराठा समाजासाठी नेहमीच कार्य करत रहा. याकरता मला माझ्या स्वतःची जीवाची बाजी जरी लावावी लागली तर मी मागे सरणार नाही. आणि याचे जिवंत उदाहरण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा दिसून आलेले आहे.(Maratha Aarakshan)
निष्कर्ष : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकरिता स्वतःचा तसेच परिवाराचा विचार न करता निस्वार्थ आंदोलनाला नेहमीच मोठा पाठिंबा दिलेला आहे. या सर्व गोष्टींचा फायदा हा भविष्यामध्ये प्रत्येक मराठ्याला होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मराठ्यांची खरी ताकद सरकारला सुद्धा दिसून आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या योगदानामुळे प्रत्येक मराठ्याच्या मुलाचे भविष्य हे घडवण्यासाठी खूप मोठा फायदा या आंदोलनातून झालेला आहे. (Maratha Aarakshan)