Matsya palan Yojana : मत्स्य पालन व्यवसायातून कमवा लाखो रुपये! प्रधानमंत्री मत्स्य पालन योजनेमुळे आता शक्य!

Matsya palan Yojana : कोरोना काळामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे 2020 रोजी आत्मनिर्भर भारत मोहीम याची घोषणा केली होती. देशाच्या आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच भारताला स्वावलंबी बनवणे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासाकरता नवीन दिशा मिळवून देणे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत अनेक लहान मोठ्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. यापैकीच एक मुख्य योजना म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपादा योजना होय. भारत हा जगामध्ये तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश मानला जातो. मत्स्यपालन भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच देशात मत्स्य व्यवसाय करता चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे.(Matsya palan Yoajana)

Matsya palan Yoajana
Matsya palan Yojana

जर तुम्हाला सुद्धा मत्स्यपालनासाठी पंतप्रधान योजना काय आहे? याबद्दल इंटरनेटवर माहिती शोधत असला तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. आज आपण प्रधानमंत्री मस्त संपदा योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे मुख्य घटक तसेच या योजनेचा लाभ कशाप्रकारे तुम्ही मिळू शकतात.(Matsya palan Yoajana)

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना योजना काय?

आपल्या देशामध्ये जवळपास 11 लाख पेक्षा अधिक लोकांचा रोजगार व मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणूनच या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना भारत सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे. ज्याच्या माध्यमातून मत्स्यपालन व्यवसायासाठी संबंधित लोकांचे उत्पन्न वाढवण्याकरता तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्याकरता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे.(Matsya palan Yoajana)

सध्या सरकार मच्छी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांकरता प्रोत्साहन देत आहे. भारतामधील मत्स्यपालनाला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केलेली आहे. या योजने करता केंद्रामधील मोदी सरकारने ब्लू रेव्हलेशन असे नाव दिलेले आहे. या योजनेच्या माध्यमातून मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बँक कर्ज, विमा इत्यादी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री मत्स्य पालन संपदा योजना केंद्र सरकार मत्स्यपालन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवून देत आहे. त्याकरता अर्थसंकल्पामध्ये मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून 20 हजार 50 कोटी रुपयांचा निधी तयार करून देण्यात आलेला आहे. ही रक्कम पायाभूत सुविधा सुधारण्याकरता वापरली जाईल. जेवढे या क्षेत्रामध्ये रोजगारांच्या संधी वाढण्यासाठी मोठी मदत होणार आहे.(Matsya palan Yoajana)

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना बाबत माहिती(Matsya palan Yojana)

योजनेचे नाव प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
योजनेला सुरुवात कुणी केली केंद्र सरकार
योजनेचे लाभार्थी मत्स्य व्यवसाय
योजनेला सुरुवात 10 सप्टेंबर 2020
योजना करता एकूण बजेट 20 हजार 50 कोटी रुपये
योजनेच्या कालावधी 2020 ते 2025 पर्यंत
अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने
अधिकारीक वेबसाईट https://pmmsy.dof.gov.in/

योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहे?(Matsya palan Yojana)

  • इकोसिस्टम मध्ये 20050 कोटी ची गुंतवणूक करणे
  • मत्स्य उत्पादन १३.७५ दशलक्ष मॅट्रिक टन वरून 22 लक्ष मॅट्रिक टन पर्यंत वाढवणे
  • मत्स्य निर्यात ४६ हजार कोटी वरून १०० हजार कोटी करण्या बाबत
  • पोस्ट हार्वेस्ट लॉस्ट २०-२५% वरून १० टक्के पर्यंत कमी करणे
  • मच्छीमार आणि मत्स्यपालनाची उत्पन्न दुप्पट करण्याकरता प्रयत्न करणे
  • पंधरा लाखांपर्यंत प्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करणे आणि त्यांच्या तिप्पट अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करणे.
  • मच्छी व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक आणि उद्योजकता वाढीस सुलभ करणे
  • कृषी GVA मध्ये मागचे व्यवसाय क्षेत्राचे योगदान 7.88% वरून सुमारे नऊ टक्के पर्यंत वाढवणे.
  • देशांतर्गत मासळीचा वापर दरोडे पाच किलो वरून बारा किलो पर्यंत करणे.

पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेचे मुख्य उद्दिष्टे Matsya palan Yojana

  • मत्स्य शेती होणाऱ्या भागापासून रिटेल मार्केट पर्यंत सध्या स्थितीत उपलब्ध असलेल्या पुरवठा साखळी मध्ये सुधारणा करणे.
  • देशाच्या GDP मध्ये सुधारणा करण्यासाठी मदत
  • योजनेच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायामध्ये होणारी नासाडी कमी करण्याकरता प्रयत्न केले जातील
  • उपलब्ध जमीन तसेच पाण्याच्या किफायतशीर सक्षम सर्वसमावेशक आणि फायदेशीर वापर करून मत्स्यनिर्मिती आणि कार्यक्षमता सुधारणे

पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेचे लाभार्थी यादी Matsya palan Yojana

  • फिशर
  • मत्स्य शेतकरी
  • मासे कामगार तसेच मासे विक्रेते
  • मत्स्य विकास महामंडळ
  • बचत गटांमध्ये संयुक्तदायित्व गट
  • मासेमारी क्षेत्र
  • मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था
  • मासेमारी संघटना
  • उद्योजक आणि खाजगी कंपन्या
  • मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था
  • अनुसूचित जाती जमाती महिला विविध अपंग व्यक्ती

योजने करता आवश्यक पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व मच्छीमार आणि तसेच शेतकरी अर्ज करू शकतात.
  • नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांना या योजनेचा लाभ देण्यात येईल

योजने करता आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मासेमारी कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते तपशील
  • अर्जदाराचे कास्ट प्रमाणपत्र

योजने करता अर्ज कशा पद्धतीने करावा

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
  • अधिकृत वेबसाईट ची लिंक ही वरील प्रमाणे दिलेली आहे
  • आता तुम्हाला सर्वात अगोदर मुख्य पृष्ठ वरती व्हिजिट केल्यानंतर या योजनेतील विभागामधील PMMSY या पर्यावरण क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला पीएम मत्स्य संपदा योजनेच्या बुकलेटच्या पर्यावरण क्लिक करून द्यायचे आहे.
  • आता योजनेचा अर्ज तुमच्यासमोर उघडेल. यामध्ये सर्व विचारलेली माहिती टाकल्यानंतर दस्तावेज तुम्हाला अपलोड करून फॉर्म ला सबमिट करायचे आहे.
  • तुम्ही अशा प्रकारे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.

निष्कर्ष : तुम्हाला जर प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची संबंधित कुठल्याही प्रकारची माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या येत असेल तर तुम्ही हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक १८००-४२५-१६६० या क्रमांकावर ती संपर्क साधू शकता.