Pm Awas Yojana : सरकारद्वारे सामान्य नागरिकांना करता नेहमीच नवनवीन योजना राबवल्या जात असतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की सामान्यनागरिक तसेच सर्व करिता अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गरजा खूप महत्त्वाच्या आहेत. मात्र अजून अशी काही गरीब जनसंख्या आहे त्यांच्याकडे स्वतःचे घर उपलब्ध नाही. अशा सर्व नागरिकांकरता केंद्र सरकार द्वारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये सुरू केलेली योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना घराची दुरुस्ती व बांधकामासाठी आर्थिक मदत प्रदान करून दिली जाते. ही आर्थिक मदत मैदानी भागांसाठी 1 लाख 20 हजार आणि डोंगराळ भागासाठी 1 लाख 30 हजार रुपये अशी आहे. या योजने करता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईटला विजिट करणे गरजेचे असेल. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याबाबतची संपूर्ण माहिती देणार आहोत.
आपल्या सर्वांना माहिती असेलच की प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब कुटुंबांना पक्की घरे मिळवून दिली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभ सर्व लाभार्थ्यांना एकापाठोपाठ मिळत आहे ज्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने दिलेली आहे. चला तर याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र Pm Awas Yojana
या योजनेच्या माध्यमातून एकूण खर्च 130075 कोटी रुपये आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत येणाऱ्या एकूण खर्च केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्यामध्ये 60-40 अशाप्रकारे विभागला गेला आहे यामध्ये सामायिक क्षेत्रांसाठी 90 आणि डोंगराळ क्षेत्रांसाठी दहा टक्के ठेवण्यात आलेला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पक्के घरे बांधकाम करण्याकरता या योजनेच्या माध्यमातून 2022 पर्यंत सामान्य नागरिकांना पक्के घरे मिळावे अशी योजना केली होती कारण या योजनेच्या अंतर्गत दुर्बल घटकातील लोकांना पक्के घरे बंद करता दिलेली रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये असतं तरी केली जाणार आहे.Pm Awas Yojana
या योजनेचा विस्तार केल्यानंतर उर्वरित 155.75 लाख गरिब घरे बांधली जाणार आहे. यामुळे 2.95 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट आता पुरे होणार आहे. 155.75 लाख घरे बांधण्याकरता सरकार 198581 कोटी रुपये खर्च करणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र संपूर्ण माहिती Pm Awas Yojana
योजनेचे नाव | प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना महाराष्ट्र |
विभाग | ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारे |
योजनेला सुरुवात | 2015 पासून |
योजनेचा उद्देश | सर्व निराधार कुटुंबांना घर देण्यासाठी |
योजनेचा प्रकार | केंद्र सरकार द्वारे ही योजना चालली जात आहे |
लाभार्थ्यांची निवड | SECC-2011 beneficiary list |
अनुदानासाठी ची रक्कम | 120000/- |
अनुदानित राज्य | Maharashtra |
अनुदानित जिल्हे | महाराष्ट्र मधील सर्व जिल्हे |
अधिकृत संकेतस्थळ | pmayg.nic.in |
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
आपल्या देशामध्ये ग्रामीण भागात राहणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील लोक ज्यांना स्वतःचे पक्के घर बांधायचे आहे परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते बनवू शकत नाही. असेना निराधार नागरिकांकरिता आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत स्वतःचे पक्के घर बांधण्याची सरकार हमी देत असून सरकार द्वारे आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासोबतच पक्की स्वच्छालय बांधण्याकरता 12000 रुपयांची मदत सुद्धा केली जाणार आहे. ही योजना ग्रामीण तसेच शहरी भागात सुद्धा राबवली जाते कारण या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना स्वतःचे पक्के घर मिळावे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.Pm Awas Yojana
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
- कुठल्याही जाती धर्मातील लोक
- मध्यमवर्ग एक
- मध्यमवर्ग दोन
- अनुसूचित जाती अनुसूचित जमाती
- कमी उत्पन्न असलेले नागरिक
प्रधानमंत्री आवास योजनेची वैशिष्ट्ये काय आहे?Pm Awas Yojana
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र या योजनेच्या माध्यमातून एक कोटी घरे बांधण्याकरता आर्थिक मदत प्रदान करून दिली जाणार आहे.
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत स्वयंपाक घरासाठी च्या क्षेत्रासह गृहनिर्माण साठी जागा 20 चौरस मीटर वरून 25 चौरस मीटर पर्यंत वाढवण्यात आली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून मैदानी भागात युनिट्स आहे रुपये १.३० लाख आणि डोंगराळ भागामध्ये युनिट्स आहे 1.30 लाख असे आहे.
- पंतप्रधान आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र योजनेची एकूण किंमत ही 130075 कोटी रुपये एवढी आहे. आमचे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार द्वारे ६० ते ४० या प्रमाणात बनवली गेली आहे.
- ग्रामीण भागामधील कुटुंब SECC2011 डेटा च्या माध्यमातून निश्चित केले जाणार आहे.
- राज्यामधील अवघड क्षेत्रांचे वर्गीकरण राज्य सरकार यांना करावे लागेल. अशा प्रकारचे वर्गीकरण राज्यामधील विद्यमान वर्गीकरणाच्या आधारे इतर कुठल्याही तरतुदीनुसार आणि निकषांवर आधारित पद्धतीने वापरून केले जाणार आहे.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना पात्रता काय आहे?Pm Awas Yojana
- अर्जदार व्यक्तीच्या नावावर देशामध्ये कुठेही पक्के घर नसावे.
- खालील BPL धारक असावा किंवा त्याच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे तीन लाख किंवा सहा लाख दरम्यान असावे.
- अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील कमी उत्पन्न गटातील किंवा दारिद्र्य रेषेखालील जगणारा असणे अनिवार्य आहे.
- प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून फक्त एका बांधकामाला परवानगी दिली जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- जात प्रमाणपत्र
- मतदान ओळखपत्र
- योजनेचा अर्ज
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने करता ऑनलाइन अर्ज कशा पद्धतीने करावा?
तुम्हाला सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला भारत सरकार द्वारे दिल्या गेलेल्या अधिकृत वेबसाईटला विजिट करावा लागेल. या वेबसाईटची लिंक आम्ही वरील प्रमाणे दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही स्टेप बाय स्टेप आपले अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.Pm Awas Yojana