Sarkari Yojana Girls: मुलींसाठी महाराष्ट्र सरकारच्या या ’05’ योजना तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर माहिती

Sarkari Yojana Girls: राज्यातील मुलींसाठी सरकार नेहमी नवनवीन योजना राबवत असते. मुलींचे शिक्षण, आरोग्य, त्यांची सुरक्षितता या गोष्टींवर सरकार नेहमी लक्ष देत असते आणि या विषयावर सरकार मार्फत अनेक योजना राबविल्या जातात.

भारतातील संपुर्ण राज्यामध्ये मुलींच्या उन्नतीसाठी तसेच त्यांच्या विकासासाठी भारत सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या विविध प्रकारच्या योजना मुलींच्या कल्याणासाठी तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भरपूर फायद्याच्या ठरतात.

Sarkari Yojana Girls
Sarkari Yojana Girls

आजच्या या लेखामध्ये Sarkari Yojana Girls राज्यातील मुलींसाठी सरकार कोणकोणत्या योजना राबवत असते.तसेच भारत सरकार आणि राज्य सरकारच्या अश्या कोणत्या योजना आहेत ज्या योजनांमुळे राज्यातील मुलींना त्याचा लाभ घेता येईल अश्या या योजनांबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

मुलींसाठी महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या योजना आहेत?(Sarkari Yojana Girls Maharashtra)

चला तर जाणून घेऊयात मुलींसाठी सरकारी योजना कोणत्या आहेत जेणेकरून त्या योजना मुलींना लाभदायक ठरतील. तर या योजनांबद्दल तुम्हाला खालीलप्रमाणे थोडक्यात माहिती दिली आहे-

01- सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samridhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एकप्रकारे छोटी बचत योजना आहे. आपल्या देशातील मुलींचे भविष्य उज्वल बनवण्यासाठी ही योजना मोदी सरकार द्वारे सुरू करण्यात आली. या योजनेची सुरुवात 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सुरू करण्यात आली होती. खासकरून सुकन्या समृद्धी योजना ही मुलीच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठी राबवली जाते. या योजनेचे नाव बेटी बचाव बेटी पढाओ या अंतर्गत ठेवण्यात आले.

सुकन्या समृद्धी ही योजना मुलींच्या भविष्यासाठी एक उत्तम गुंतवणूक आहे. तसेच त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचे काम सुद्धा करते. सुकन्या समृद्धी योजनेची अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

02- बालिका समृद्धी योजना (Balika Samridhi Yojana)

बालिका समृद्धी योजना भारत सरकारची ही एक सामाजिक कल्याण योजना आहे. हि योजना मुलींच्या जन्म आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे. बालिका समृद्धी योजनेची सुरुवात 1997 मध्ये झालेली आहे आणि ही योजना भारतातील सर्व राज्यांमध्ये लागू आहे म्हणजेच भारतातील कोणत्याही राज्यातील मुली या योजनेसाठी पात्र आहे आणि त्या या योजनेसाठी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

बालिका समृद्धी योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) गरीब कुटुंबातील मुलींचे जन्म झाल्यानंतर त्यांना 500 रुपये दिले जाते तसेच मुलींच्या शिक्षणासाठी पहिली ते दहावीपर्यंत त्यांना दरवर्षी 200 रुपये ते 1000 रुपये पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते.

बालिका समृद्धी योजना मुलींच्या भविष्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे मुलींच्या जन्मा तसेच शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच या योजनेमुळे मुलींच्या लैंगिक भेदभावाला कमी करण्यास देखील मदत मिळाली आहे. या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आणि संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घ्या.

03-माझी कन्या भाग्यश्री योजना (Majhi Kanya bhagyashri Yojana)

माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची आहे. या योजनेचा एक उद्देश आहे जो की मुलींचे जन्मदर वाढवणे आणि स्त्री शिक्षणाला चालना देणे.या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना 50 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळते. या योजनेची सुरुवात एक एप्रिल 2016 पासून झालेली आहे. मुलींच्या जन्माच्या आकडेवारीला चालना देण्यासाठी तसेच त्यांना सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार अशा योजना राबवत असते त्यातीलच ही एक माझी कन्या भाग्यश्री योजना आहे.

या योजनेचा लाभ मुलींना तर मिळतोच तसेच या योजनेचा लाभ त्या कुटुंबाला सुद्धा होणार आहे ज्या कुटुंबात दोन मुली आहेत. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. योजनेचे अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता आणि हवी ती माहिती जाणून घेऊ शकता.

04- लेक लाडकी योजना (lek ladki yojana)

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आले या योजनेचा एकच उद्देश आहे तो म्हणजे मुलीच्या जन्मापासून तर तिच्या संपूर्ण शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे. या योजनेअंतर्गत मुलींना समाजात स्वावलंबी बनवण्याची तसेच सन्मानजनक स्थान मिळवण्याची संधी मिळते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.18 वर्षे पूर्ण असलेल्या मुलींना पुढील शिक्षणासाठी 75 हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती देखील मिळते. या योजनेच्या विविध फायद्यांमुळे या योजनेची लोकप्रियता खूपच वाढत चालली आहे त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या. या योजनेसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता आणि याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता.

05- CBSE उडान योजना (cbse udan yojana)

CBSE उडान योजना हि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, मानव संसाधन विकास मंत्रालय तसेच भारत सरकार द्वारे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी तसेच यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी ही सीबीएससई उडाण योजना राबवली जात आहे.

या योजनेअंतर्गत विज्ञान आणि गणित विषयाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच बारावी नंतर अभियांत्रिकी क्षेत्रात (Engineering Field) किंवा वैद्यकीय क्षेत्रात (Medical Field) मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना सीबीएसई (CBSE) उडान या योजनेच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील.

CBSE उडान या योजनेची अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता तेथून तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

निष्कर्ष

आजच्या या लेखामध्ये Sarkari Yojana Girls म्हणजे मुलींसाठी महाराष्ट्र सरकार तर्फे कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहे त्यातील काही ठराविक योजनांबद्दल आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला आमच्या द्वारे या योजनेची माहिती दिलेली उपयुक्त वाटली असल्यास ही माहिती इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद.